प्रस्तावना:
आमच्या भारत भूमीला महान संतांची भूमी मानली जाते. या भूमीवर अनेक संतांचा जन्म झाला आहे. या सर्व संतांपैकी एक आहेत – संत तुकाराम.
संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी चार महान संतांपैकी एक शेवटचे संतकवी होते. संत तुकाराम यांना तुकोबा या नावाने संबोधले जायचे. हे इ.स च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते.
अखंड कीर्तनामुळे ज्यांचे शरीर ब्रह्मभूत झाले असे साक्षात्कारी सत्पुरुष तसेच जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अर्पण करणारे आणि जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगदगुरु व भागवत धर्माचा कळस रचणारे संतश्रेष्ठ. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे एक साक्षात्कारी, निर्भीड आणि एका अर्थाने बंडखोर असे संत होते.
जन्म
संत तुकाराम यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घरातील मूळ पुरुष विश्वंभरबुवा महान विठ्ठलभक्त होते. पंढरपूचा विठ्ठल (विठोबा) हे तुकारामांचे आराध्य दैवत होते.
सावजी हा त्यांचा मोठा भाऊ आणि कान्होबा हा भाऊ होता. त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी संत तुकारामांवर होती. संत तुकाराम हे १७ – १८ वर्षाचे असताना त्यांच्या आई – वडिलांचे निधन झाले.
संत तुकाराम यांचा मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थ यात्रेला गेला. त्यांच्या मोठ्या मुलाला दुष्काळाचा सामना करावा लागला. गुरे – ढोरे गेली आणि त्याच्या घरावर अठरा विश्वे दारिद्र्य आले.
अभंगरचना
संत तुकाराम यांनी कवित्वाचा स्वपन दृष्टांत पूर्ण झाल्यानंतर अभंग रचना करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य ध्यान आणि चिंतन यामध्ये घालवल्याने त्यांनी आपल्या मधुर आणि रसाळ वाणीतून अभंग रचना केल्या.
अभंग हे संत तुकाराम महाराजांचे मुख्य वैशिट्य आहे. जसे कि श्लोक रामदास स्वामींचे, “ज्ञानेश्वरांची” ओवी तसेच संत तुकाराम यांचे अभंग.
प्रवचन आणि कीर्तन
त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज कि जय’ तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज कि जय असा जयघोष करतात. संत तुकाराम हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये अभंग रूपाने स्थिरावले होते.
विठ्ठल भक्ती
त्यांनी आपल्या अभंगामध्ये असे लिहिले आहे की,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच रत्ने शास्त्र करू ।।
असे म्हणत त्यांनी शब्दांवर प्रभुत्व ठेवून समाजातील सर्व लोकांना मार्गदर्शन केले. जातीभेदावर टीका केली आणि विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली.
त्यांनी अध्यात्माचे सार लोकांना सांगितले. संत तुकारामांनी सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला ठेऊन ऐक्यभाव आणि संत कि भावना समाजामध्ये निर्माण केली.
भागवत धर्माचा कळस
संत तुकाराम यांचे अभंग मगांजे अक्षर वाङ्मय आहे. त्यांच्या काव्यातील मधुरता आणि भाषेची सरलता अतुलनीय आहे.
निष्कर्ष:
संत तुकाराम हे एक महान संत कवी होते. संत तुकाराम यांनी आपल्या अभंगामुळे मराठी साहित्यात महत्वाचे स्थान मिळवले आहे.
तुकारामांचा देह फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठ – गमन झाला, असे मानले जाते. म्हणून हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम यांचे अभंग आजही गायिले जातात
मराठीवरील संत तुकाराम निबंधासंबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.