प्रस्तावना:
आपल्या भारत देशात अनेक महान खेळाडू होऊन गेलेत. त्यांनी आपल्या खेळाच्या कारकिर्दीतून महत्वाची भूमिका निभावली आहे.
त्या सर्वांपैकी क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचे नाव भारत देशात मोठ्या आदराने घेतले जाते. सचिन तेंडुलकर हे एक महान खेळाडू होते. म्हणून त्यांना लिटल मास्तर या नावाने देखील ओळखले जाते.
सचिन तेंडुलकर हे एक उत्तम क्रिकेटर म्हणून मानले जातात. त्यांचे क्रिकेट या खेळामध्ये एक महत्वाचे स्थान होते. तसेच ते एक सरळमार्गी आणि तत्वनिष्ठ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात.
जन्म
सचिन तेंडुलकर यांचा जन्म २४ एप्रिल, १९७३ साली राजापूर येथील या ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव सचिन रमेश तंदुलकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर आणि आईचे नाव रजनी तेंडुलकर असे होते.
सचिन देव बर्मन हे संगीत दिग्दर्शक सचिनच्या तेंडुलकर यांच्या कुटुंबात सर्वांचे आवडते होते. म्हणून रमेश तेंडुलकर यांनी आपल्या मुलाचे नाव सचिन असे ठेवले.
शिक्षण
सचिन तेंडुलकर यांना लहानपणापासून क्रिकेट या खेळाचे अत्यंत प्रचंड वेड होते. म्हणून त्यांनी क्रिकेटलाच आपले करियर बनविण्याचे ठरविले.
त्यांच्या मोठा भाऊ अजित ह्याने सचिनला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले आणि रमाकांत आचरेकर क्रिकेटचे शिक्षण देत असलेल्या अकादमीत भरती केले. तसेच त्यांनी रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर येथे प्रवेश घेतला.
त्या शाळेला क्रिकेटची चांगली परंपरा होती आणि त्या शाळेमध्ये सचिन तेंडुलकर हे ‘क्रिकेटचा तारा’ म्हणून चमकले.
क्रिकेट खेळामध्ये कामगिरी
सचिन तेंडुलकरने आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सन १९८८ साली मुंबईसाठी खेळून त्यांनी पहिल्याच सामन्यात शतक बनवून प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तसेच सचिन तेंडुलकर हे सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू ठरले.
त्यांची प्रथम सामन्यातील कामगिरी उत्तम होती त्यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय संघात करण्यात आली. सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर १९८९ मध्ये आपल्या वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तनाच्या विरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
सचिनच्या प्रसिद्ध दौऱ्यापैकी एक म्हणजे सन १९९८ चा भारताचा शारजा दौरा. सचिनच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतील शतकामुळे या विजयात भारताच्या दौऱ्यात सचिन यांचा महत्वाचा वाटा होता. सन १९९६ साली प्रथम कर्णधार झाला. पण संघाच्या वाईट कामगिरीमुळे त्याने सन १९९७ साली राजीनामा दिला.
तसेच त्यांना सन १९९९ पुन्हा कर्णधार बनवले. त्यानंतर सन २००३ साली जागतिक क्रिकेट कपमध्ये ११ सामन्यांमध्ये ६७३ धाव करून उत्तम प्रकारे खेळला. तसेच सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर शतके केलेला एकमेव खेळाडू आहेत.
पुरस्कार आणि यश
सचिन तेंडुलकर यांना अनेक पुरस्कार मिळाले. तसेच त्यांनी आपल्या नावाबरोबर अनेक विक्रम देखील केले आहेत.
१०० शतक पूर्ण करणारे एकमेव खेळाडू.
ओडीआय मध्ये सर्वप्रथम द्विशतक प्राप्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेत या खेळात ३०००० पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू.
तसेच २०० कसोटी सामने खेळणारा सर्वात प्रथम खेळाडू.
पुरस्कार
सचिन तेंडुलकरला सरकार मार्फत दिल्या जाणाऱ्या अन्य पुरस्कारांचा मानकरी ठरले आहेत. सन १९९७ – ९८ मध्ये ‘राजीव गांधी खेलरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
तसेच सन २०१४ माह्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले. तसेच हा पुरस्कार मिळवणारे हे सर्वात प्रथम खेळाडू होते.
निष्कर्ष:
सचिन तेंडुलकर हे एक सर्वात चांगले खेळाडू होण्याबरोबर एक महान नागरिक सुद्धा आहेत. तसेच ते सर्व युवा वर्गासाठी एक प्रेरणास्रोत सुद्धा आहेत.