प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे उत्सव हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांमध्ये तीन उत्सव हे राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले जातात. जसे कि १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिवस), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), महात्मा गांधी जयंती इत्याद .
या तीन उत्सवांपैकी प्रजासत्ताक दिन हा भारत देशाचा राष्ट्रीय उत्सव आहे. या दिवशी भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला होता. म्हणून हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी सर्वात महत्वाचा आहे.
भारताचा इतिहास
आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यामागे देशाचा स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांचा अहिंसेच्या मार्गातून केलेला संघर्ष याचा सर्वात मोठा वाटा आहे.
परंतु या स्वतंत्र झालेल्या भारत देशाचे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून २८ ऑगस्ट, १९४७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारत देशाचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्ष परिश्रम घेऊन भारताचे संविधान तयार केले आणि २६ जानेवारी, १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले.
भारत एक लोकशाही राष्ट्र
भारत हे एक सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही राज्य म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य होय. हा अधिकार भारताच्या राज्य घटनेनुसार २६ जानेवारी, १९५० ला मिळाला. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व
कारण हा दिवस आपल्याला संविधानाचे महत्त्व समजून देतो. जेव्हा आपल्या भारत देशाची राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा भारत देश हा जगातील पातळीवर एक लोकशाही देश म्हणून स्थापित झाला.
आजच्या काळात आपण स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या अत्याचार व गैरवर्तनाविरोधात आवाज उठवू शकलो हे केवळ आपल्या देशाची राज्य घटनेमुळे आणि लोकशाही स्वभावामुळे.
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
तसेच देशाच्या स्वातंत्र्यसाठी आपल्या परणांचे बलिदान देणाऱ्या आणि भारत भूमीचे सीमेवर जाऊन रक्षण करताना शाहिद झालेल्या शूरवीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्याच बरोबर देशाच्या राष्ट्रपतींद्वारा भाषण दिले जाते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. त्याच बरोबर शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्था यामध्ये सुद्धा ध्वजारोहण केले जाते.
ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, भाषणे आणि प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. लहान – मोठी मुले ही तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करत प्रभात फेऱ्यांमध्ये सहभागी होतात.
उत्साहाचे वातावरण
प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस आहे. तसेच लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस आहे.
निष्कर्ष:
प्रजासत्ताक दिन हा आपल्याला प्रजासत्ताकाचे महत्त्व जाणवतो. तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. म्हणून आपण सर्वानी आपल्या स्वातंत्र्याची रक्षा केली पाहिजे.
कारण भरपूर वर्षे संघर्ष करून आणि अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.