प्रस्तावना:
रक्षाबंधन हा सण हिंदू सणांपैकी एक महत्वपूर्ण सण आहे. हा सण भारत देशाबरोबर अन्य देशांमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भावा – बहिणीच्या प्रेमाचे बंधन मानले जाते.
रक्षाबंधन हा शब्द ‘संरक्षणाचे बंधन’ आहे. रक्षाबंधन या सणाला राखी पूर्णिमा या नावाने पण ओळखले जाते. रक्षाबंधन हा सण म्हणजे प्रेम, पराक्रम, साहस आणि संयमाचा संयोग आहे.
रक्षाबंधन हा सण कधी साजरा केला जातो –
रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण मासच्या पूर्णिमाला साजरा केला जातो. हा सण मुख्यतः ऑगस्ट महिन्या मध्ये येतों. संपूर्ण भारतामध्ये श्रावण महिना हा हिंदू धर्माप्रमाणे शुभ मानला जातो.
देशभरात हा सण विविध नावांनी ओळखला जातो. हा सण उत्तर भारतात ‘कजरी पूर्णिमा’ आणि पश्चिम भारतात ‘नारळी पूर्णिमा’ या नावाने साजरा केला जातो.
रक्षाबंधनचा इतिहास
या दिवशी लक्ष्मीने पाताळातल्या बळीराजाच्या हाताला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानला आणि नारायनाची मुक्तता केली. आणि तो दिवस श्रावण पूर्णिमेचा दिवस होता.
दुसर म्हणजे इंद्र आणि दैत्य यांच्यामध्ये १२ वर्ष युद्ध सुरु होते.आपली १२ वर्ष म्हणजे त्यांचे १२ दिवस होते. या युद्धात इंद्र थकून गेला होता आणि दैत्यांची संख्या भरपूर होती. इंद्राने या युद्धातून पळून जाण्याचा संकल्प केला. परंतु इंद्राची ही व्यव्था ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली.
गुरु बृहस्पति इंद्राणीला म्हणाले कि, जर तू आपल्या पातिव्रत्य बाळाचा वापर करून संकल्प केलास कि माझे पतीदेव सुरक्षित राहावेत आणि इंद्राच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक धागा बांधलास तर इंद्र हे युद्ध जिंकेल. यामुळे इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.
रक्षाबंधन सणाची तयारी
या दिवशी बहीण आणि भाऊ नवीन कपडे घालतात. त्यानंतर राखी बांधण्याची तयारी केली जाते. बहीण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकुवाचा टिळक लावतात आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात. त्यानंतर मिठाईची देवाण – घेवाण करतात.
बहीण आपल्या भावाला राखी बांधून झाल्यावर त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी आणि त्याला सुख मिळण्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिची रक्षण करण्याचे वचन देतो. या दिवशी बहीण – भाऊ उपवास सुद्धा राहतात.
राखी का महत्व
त्याच्यामुळे भावनांना ओलावा मिळतो आणि मन प्रसन्न होते. रक्षाबंधन हा सण एकमेकांना जोडणारा असा सण आहे जो कोणत्याही धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये नाही.
सुरक्षिततेचे स्मारक
राखी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आठवण करून देते. राखी बांधताना बहीण भावाचे रक्षण आणि ध्येयाचे रक्षण करण्यासाठी सूचना देते.
बाजाराची सुंदरता
त्याचबरोबर या दिवशी मिठाईच्या दुकानात पण भरपूर गर्दी असते. बरेच काही लोक भेटवस्तू म्हणून द्यायला मिठाई खरेदी करतात.
निष्कर्ष:
देशातील सर्व लोकांना स्त्रीकडे विकृत नजरेने न पाहता तिच्याकडे पवित्र दृष्टीने पाहिले पाहिजे. रक्षाबंधन सण म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे तसेच भावाने बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे आणि बहीण – भावाच्या पवित्र प्रेमाचा वाहता निर्झर झरा आहे. रक्षाबंधन हा पवित्र सण हमारी भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे.
मराठीवरील रक्षाबंधन निबंधासंबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.