Rainy Season1

पावसाळा मराठी निबंध – वाचा येथे Essay on Rainy Season in Marathi Wikipedia

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमच्या भारत देशाला ऋतूंचा देश असे म्हटले जाते. या देशात प्रत्येक ऋतू एका मागून एक येत असतो आणि निसर्गाची सुंदरता व शोभा वाढवत असतो. जसे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू प्रामुख्याने येतात.

या बदलत्या ऋतूमुलेच या धरतीवर सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली. या सर्व ऋतुमुळे निसर्गात परिवर्तन घडून येते.

त्याच प्रमाणे पावसाळा हा ऋतू सगळ्यांना हवाहवासा वाटतो. कारण सगळी सजीव सृष्टी उन्हामुळे त्रस्त झालेली असते. त्यामुळे सगळीजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात.

पावसाची पूर्व स्थिती

वर्षा ऋतु के कुछ दुष्परिणाम पावसाच्या आधी सर्व झाडे उन्हामुळे सुकून जातात. तसेच पशु – पक्षी पाण्याच्या शोधात असतात. उन्हाळ्यात सर्व पाण्याचे स्त्रोत सुकतात. त्यामुळे मानवाला आणि पशु – पक्ष्यांना पाणी मिळत नाही.

मानव दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे हैराण होतो. उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायले तरी त्याची तहान भागत नाही. उन्हाळ्यात माणसाला बाहेर पडणे सुद्धा मुश्कील होते.

पावसाचे आगमन

वर्षा ऋतु से पूर्व की दशापावसाची सुरुवात ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते आणि हा पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा मातीतून सुगंध वास येतो.

तसेच वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो. पाऊस हा कधी – कधी रिमझिम पडतो. तर कधी – कधी धो – धो कोसळतो. पावसाळा हा फक्त कवींच्या मनाला प्रसन्नता देत नाही तर संपूर्ण धरिला तृप्त करतो.

ज्यावेळी खऱ्या अर्थाने पावसाळा सुरुवात होते तेव्हा उन्हामुळे सुकून गेलेली सर्व झाडे – झुडपे, वनस्पती आकाशातून पडलेले अमृत पिऊन खुश होतात आणि हिरवीगार होतात. त्या सर्व प्रकारच्या झाडांना – झुडपाना नवीन जीवन दान मिळते. पाण्याचे सगळे स्त्रोत जलयुक्त होऊन जातात. नदी – नाले हे तुडुंब भरून वाहू लागतात. सगळीकडे पाणीच – पाणी होते.

पावसाची मज्जा

वर्षा ऋतु के फायदे पाऊस हा अगदी सगळ्यांचा लाडका असतो. तसेच त्याला सगळ्या ऋतुंचा राजा असे म्हटले जाते. जेव्हा पावसाचे आगमन होते तेव्हा प्रत्येकाची आनंद घेण्याची पद्धत वेगवेगळी असते.

पावसाळ्यात लहान मुले चिखलात खेळतात आणि पाण्यात होडी सोडून व पावसात चिंब भिजून मजा करतात.

त्यांना आई ही ओरडून – ओरडून कंटाळते पण ती चिमुकली मुले आनंद घेण्यात मग्न असतात. पावसाची मज्जा घेण्याची कल्पना ही निराचीच असते.

शेतीसाठी पाण्याची आवश्यकता

वर्षा ऋतु से लाभआमचा भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशी संबंधित आहे. कारण शेतीसाठी पाण्याची गरज भासते.

म्हणून शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. म्हणून सर्व शेतकरी हे आपल्या पिकांसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहतात.

पावसात इंद्रधनुष्य

Rainbow पावसाळ्यामध्ये जेव्हा आक्श साफ, सुंदर आणि आकर्षक दिसते तेव्हा सात रंगांचा इंद्रधनुष्य दिसतो. लहान मुले हा इंद्रधनुष्य पाहताना खूप खुश होतात.

लहान – थोरांना मोहित करणारा हा इंद्रधनुष्य म्हणजे जसे आपल्या डोळ्यांना मिळणारा निसर्गाचा एक अद्भुत तोहफाच आहे.

पावसामुळे नुकसान

प्राकृतिक आपदा के प्रकारकधी – कधी हा पाऊस एवढा पडतो कि थांबता थांबतच नाही. त्यामुळे जीवित हानी आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. पुराची श्याकता वाढते. तसेच अति प्रमाणात वृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. कधी दरड कोसळते, कधी वाहतूक ठप्प होते, तर वीज कोसळून अपघात होतात. हे सर्व पावसाचे दुष्परिणाम होतात.

निष्कर्ष:

पावसाळा हा ऋतू आम्हा सर्वाना आणि निसर्गाला नवीन जीवन जगण्याची आशा देतो. पावसाळा हा सर्वात महत्वाचा आणि सुंदर ऋतू आहे.

तसेच अन्य कवींनी पावसाळा या ऋतूचे वर्णन आपल्या कवितांमध्ये अत्यंत सुंदर प्रकारे केले आहे. म्हणून म्हटले आहे कि “श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे” अशी रचना केली आहे.

मराठीवरील पावसावरील निबंधासंबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment