प्रस्तावना:
आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक सहा ऋतू एका मागून एक येतात. प्रत्येक ऋतूचे आपले विशेष महत्व आणि वैशिष्ट्य आहे. त्यापैकी तीन ऋतू हे सर्वात महत्वाचे आहेत.
जसे कि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हे सर्व ऋतू म्हणजेच निसर्गाची एक अजब जादूच असावी. या सर्वांपैकी पावसाळा हा ऋतू सर्वानाच आवडता ऋतू आहे.
पावसाची सुरुवात
पाऊस जून किंवा जुलै महिन्यापासून सुरु होऊन तीन महिने टिकतो. प्रत्येकासाठी हा हंगाम सर्वात चांगला असतो आणि सर्वजण याचा खूप आनंद घेतात.
पावसाळ्यात सगळ्यांना पिकलेल्या ताज्या आंब्यांचा स्वाद घ्यायला मिळतो. पावसाची वाट सगळीजण खूप आतुरतेने बघत असतात.
पावसाळा ऋतूचे चक्र
बदल हा निसर्गाचा एक नियम आहे. तसेच पावसाळ्यामुळे निसर्गात अनेक बदल झालेले दिसून येतात. उन्हाळ्यानंतर पाऊस येतो. जसा काळ बदलत असतो तसेच ऋतूंचे चक्र सुद्धा बदलत असते.
निसर्ग हा कोणत्याही ठिकाणी कधीच स्थिर नसतो. तो नेहमी बदलत असतो. मानवाच्या जीवनात जसे सुख आणि दुःख यांचे चक्र चालू असते. त्याच प्रमाणे हा निसर्ग सुद्धा निरनिराळ्या रूपात मानवाला सुख आणि दुःखाची भावना देत राहतो.
उन्हाळा ऋतू आल्यावर सगळीकडे पाण्याची कमतरता भासू लागते. वाढत्या उन्हामुळे सर्व लोक खूप त्रस्त झालेली असतात. मानवाबरोबर प्राणी, पक्षी आणि इतर जनावरे सुद्धा त्रस्त होतात.
निसर्गाचे सौंदर्य
पावसाळा ऋतू सुरु होताच सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते. ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते. तसेच हिरवळ नहाळताना माणूस प्राणी आणि पक्ष्यांसह आनंदित होतो. पाऊस सुरु होताच मोर आपला सुंदर आणि रंगीबिरंगी पिसारा फुलवून रानात नाचू लागतो.
तसेच नदी – नाले, विहिरी, तलाव हे सर्व तुडुंब भरले जातात. शेतकरी सुद्धा पावसाळयात आपल्या कामाला सुरुवात करतात. पावसाळयात सगळीकडे पाणीच पाणी दिसते. हा हंगामात वातावरण अनुकूल असल्यामुळे कामे करणे देखी सोपे जाते. त्याच प्रमाणे झाडे सुद्धा हिरवीगार आणि आकर्षक दिसतात.
पावसाळयात झाडांवर नवीन पालवी येते. पावसाच्या पाण्यामुळे झाडांना, वनस्पतींना नवीन जीवनदान मिळते. पावसाळा आल्यावर हत्ती सुद्धा जोरजोराने ओरडतात. तसेच पशु – पक्षी आनन्दाने क्रीडा करू लागतात.
पावसाळ्याचे महत्त्व
आमचा भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारत देशातील काही लोक हे खेड्यात राहतात आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे बरेचसे लोक हे शेतीवर अवलंबून असतात.
तसेच आपल्या भारत देशातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. म्हणून सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहतात. पावसाळ्यात शेतकरी पिकाची पेरणी करतात.
पावसाळा हा ऋतू लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो आणि त्यांचे पोट भरतो. ज्या वर्षी चांगला पाऊस पडतो त्या वर्षी चांगले पीक सुद्धा येते. परंतु काही वेळा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो.
कवितांमध्ये पावसाळ्याचे वर्णन
पावसाळा या ऋतूमुळे लोकांना आनंद मिळतो. तसेच काही कवींनी आपल्या साहित्यात आणि कवितांमध्ये पावसाळा या ऋतूचे वर्णन अत्यंत सुंदर प्रकारे केले आहे. संत तुलसीदास यांनी रामचरितमानस यामध्ये पावसाचे वर्णन असे केले आहे की,
वर्षा काल मेघ नभ छाये ।
गर्जत लागत परम सुहाये ।।
दामिनी दमक रही घन माहीं ।
खल की प्रीति यथा थिर नाहीं ।।
ज्याचा अर्थ असा होतो की, काळे ढग पाहणे हे चांगले असते. विजा या चांदीसारख्या चमकत असतात. ढग तहानलेल्या झाडांची तहान शांत करतात. तसेच पाऊस न पडल्यास सर्व ठिकाणी हादरे बसतील.
निष्कर्ष:
आपल्या जीवनामध्ये सर्व ऋतूंचे महत्त्व आहे.परंतु त्या सर्वात जास्त महत्त्व पावसाळा या ऋतूचे आहे. पावसाळा या ऋतूमुळे पृथ्वीची संपूर्ण जीवन प्रणाली चालू आहे. आपल्या सर्वासाठी पाऊसाचे खूप महत्त्व आहे. म्हणून सर्व लोकांनी पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे.