Rain

पावसाळा मराठी निबंध – वाचा येथे Essay on Rain in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमच्या भारत देशामध्ये सहा ऋतू हे एकापाठोपाठ एक येत असतात आणि या निसर्गाची शोभा वाढवत असतात. या सर्व ऋतूपैकी पावसाळा हा सर्वात महत्वाचा ऋतू आहे.

तसेच सर्व ऋतूंचा राजा आहे. पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो. पाऊस हा माणसाचा मित्र, त्यांचा पोशिंदा आणि सर्व सृष्टीचा जीवनदाता आहे. पावसाळा या ऋतूची वाट मानव, पशु – पक्षी बघत असतात.

कारण हे सगळे जास्त उकाडत्या उन्हामुळे खूप त्रास झालेले असतात. म्हणून पावसाची आतुरतने वाट पाहतात.

पावसाच्या आधीची स्थिती

Rainwater पाऊस पडण्या अगोदर सर्व माणसे, जीव – जंतू, पशु – पक्षी हे सर्व तापत्या उन्हामुळे खूप त्रस्त झालेले असतात. तसेच उन्हाळ्यात सगळी झाडे – झुडपे, वनस्पती सुकून जातात.

पाण्याचे सर्व स्त्रोत सुकतात. जसे कि नदी – नाले, तलाव, विहीर इत्यादि. त्यामुळे सगळे पशु – पक्षी पाण्याच्या शोधात असतात.

पावसाचे आगमन

Rainy Season 1 लहान मुलांना, थोरांना आणि वयोवृद्ध माणसाना आवडणारा हा पाऊस जून महिन्याच्या आठवड्यात सुरु होतो आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो.

शेतकरी पाऊस सुरु व्हायच्या आधी आपली जमीन नांगरून ठेवतो. त्याचे डोळे हे आकाशाकडे लागलेले असतात. मग अचानक वातावरण बदल होतो. सूर्य नारायण अदृश्य होतो.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते. वातावरण अंधारून येते आणि पाऊस पडू लागतो. अस वाटत कि ढगांना खाली यायची घाई झाली आहे.

हा पाऊस कधी – कधी मेघगर्जना आणि विद्युत कडाडत येतो. हा कधी – कधी रिमझिम कोसळतो तर कधी – कधी धो – धो कोसळतो.

पहिला पाऊस

वर्षा ऋतु के कुछ दुष्परिणाम पहिला पाऊस पडताच मातीतून सुगंध दरवळतो. पाऊस हा अगदी सगळ्यांचा लाडका आहे. म्हणून या पावसाची सगळीजण आतुरतेने वाट बघत असतात. पाऊस पडताच लहान मुले चिखलात खेळत आणि पावसाच्या पाण्यात होड्या सोडून तसेच पावसात चिंब भिजून मजा करतात.

आई आपल्या मुलांना ओरडून – ओरडून थकते. पण ही मुले पावसाचा आनंद लुटण्यात खूप दंग असतात. त्याच बरोबर सगळ्या झाडा – झुडपांना, पशु – पक्ष्यांना नवीन जीवनदान मिळते. पशु – पक्षी आनंदित होऊन क्रीडा करू लागतात. सर्व झाडे ही हिरवीगार दिसू लागतात. ही झाडे टवटवीत होऊन आपला आनंद व्यक्त करतात.

पाण्याचे स्त्रोत हे तुडुंब भरून वाहू लागतात. जसे कि, नद्या – नाले, विहिरी, तलाव इत्यादि. सर्व मैदाने ही हिरवळ दिसू लागतात आणि पावसाळ्यात सगळीकडेच पाणीच पाणी असते. अस वाटत कि, जणू काही या धरतीने हिरवा शालू पांघरला आहे.

पावसात इंद्रधनुष्य

Rainbow पावसाळ्यामध्ये कधी – कधी सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो. जेव्हा आकाश साफ, सुंदर आणि निळे दिसू लागते तेव्हा हा सप्त सप्तरंगाची उधळण करणारा इंद्रधनुष्य दिसू लागतो.

इंद्रधनुष्याला बघण्यासाठी सर्वजण खूप आतुर झालेले असतात. पावसाळ्यात दिसणारा हा इंद्रधनुष्य जणू काही आपल्या डोळ्यांना मिळणारा निसर्गाचा एक अनमोल देणच आहे.

पावसामुळे नुकसान

वर्षा का वर्णन संक्षिप्त मेंपावसळ्यात खळखळून वाहणारे झरे, तुडुंब भरून वाहणाऱ्या विहिरी किंवा नद्या, फेसाळणारा समुद्र व त्याच्या उंच – उंच लाटा हे सर्व अगदी पाहण्यासारख असत. परंतु या पावसाने जर काही आपले रौद्र रूप धारण केले तर ते महाभयंकर होऊ शकते.

पुराची शक्यता उद्दभवू शकते. तसेच जीवित हानी आणि वित्त हानी प्रचंड प्रमाणात होऊ शकते. तसेच शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याच प्रमाणे दरड कोसळणे, वीज कोसळून अपघात होणे इत्यादि. दुष्परिणाम होऊ शकतात.

निष्कर्ष:

पाऊस हा सगळ्यांच्या मनाला शांती आणि प्रसन्नता देणारा सगळ्यांना हवा – हवासा वाटतो. परंतु पावसावर अनेक कवींनी आपल्या कवितांमध्ये सुंदर प्रकारे वर्णन केले आहे.

जसे कि “श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे.” म्हणून पावसाळा हा ऋतू सर्वात सुंदर आणि महत्वाचा ऋतू आहे.

मराठीवरील पावसावरील निबंधासंबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment