प्रस्तावना:
आजच्या युगात प्रदूषणाची समस्या ही एक मोठी समस्या बनली आहे. मानवाने आपल्या विकासासाठी विज्ञानच्या साहाय्याने अनेक आविष्कार केले आहेत.
त्यामुळे मानवाचे जीवन सुखी आणि समृद्ध झाले आहे. या विज्ञानामुळे मानवाला अनेक वरदान मिळाले आहेत. तसेच काही अभिशाप सुद्धा मिळाले आहेत.
प्रदूषण हा एक असा अभिशाप आहे जो मानवाच्या क्रांतीतूनच जन्माला आला आहे आणि यामुळे भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांपासून प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
प्रदूषणाची व्याख्या
प्रदूषण म्हणजेच जीवन नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे दुषित घटक जेव्हा वातावरणामध्ये मिसळले जातात, तेव्हा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.
प्रदूषणाचे प्रकार
प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. जसे कि पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण इ.
पाणी प्रदूषण
पाणी प्रदूषण म्हणजे –
परंतु आज तो पाण्याचे मूल्य विसरून गेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित करत आहे. मानव कारखान्यातील रसायने मिसळलेले अशुद्ध पाणी नदी – नाले, तलाव, समुद्र इ. मध्ये सोडले जाते.
त्यामुळे पाण्याचे प्रमाण होऊ लागले आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी दुषित होत आहे. या सगळ्याला मानव कारणीभूत आहे. तसेच माणसाचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दुषित पाण्यामुळे अन्य प्रकारची रोगराई पसरत आहे आणि आजार होत आहेत. त्यामुळे भरपूर लोक ही मृत्युमुखी पडत आहेत.
हवा प्रदूषण
हवा प्रदूषण म्हणजे –
उद्योग, वाहने, लोकसंख्या वाढ हे सर्व घटक हवा प्रदूषणास कारणीभूत आहेत. हवा दुषित झाल्यामुळे लोकांना श्वास घेणे अवघड जाते. मानव आपल्याच हाताने प्रदूषणाची समस्या वाढवून ठेवतो.
ध्वनी प्रदूषण
ध्वनी प्रदूषण म्हणजे –
ध्वनी प्रदूषणामुळे फक्त चिडचीडापण किंवा रागच येत नाही तर रक्त वाहिन्या सुद्धा संकुचित होतात. त्याच बरोबर मानवाला बहरेपनाला शिकार व्हावे लागते.
मृदा प्रदूषण
जेव्हा मातीमध्ये अनेक विषारी पदार्थ व दुषित घटक मिसळे जातात त्यामुळे मातीची सुपीकता कमी होते तेव्हा मृदा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.
मानव दुषित पाणी प्रक्रिया न करता जमिनीमध्ये सोडतो त्यामुळे जमीन नापीक बनते आणि मातीचे प्रदूषण होते. तसेच मनुष्य आपला स्वार्थ पुरा करण्यासाठी झाडांची तोड करतो. त्यामुळे जमिनीची मोठ्या परणात धूप होते.
प्रदूषणाचे परिणाम
या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवाच्या शरीरावर वाईट परिणाम होत आहे. त्याचे आरोग्य बिघडत आहे. एवढेच नव्हे तर त्याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे.
निष्कर्ष:
प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. या प्रदूषणामुळे अनेकांचे जीवन नष्ट होत आहे. त्यामुळे मानवाला प्रदूषणाच्या संकटातून सुटका करण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच सर्वात प्रथम मानवाने प्लास्टिकचा उपयोग कमी प्रमाणात केला पाहिजे.
देशातील प्रत्येक व्यक्तीने जास्तीत – जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. जर देशातील प्रत्येक व्यक्ती प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करेल तरच आपला देश प्रगतीच्या मागार्वर जाऊ शकतो. त्याच बरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून सगळ्या लोकांपर्यंत जागृती निर्माण केली पाहिजे.