प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. जसे कि, पोपट, मैना, कोकीळ, घार, इत्यादि। अनेक पक्षी दिसून येतात. त्या सर्वांपैकी कबुतर हा एक सर्वसामान्य पक्षी आहे.
कबुतर हा एक सुंदर पक्षी आहे आणि संपूर्ण जगात आढळून येतो. कबुतर हा उडणारा पक्षी आहे. कबुतर या पक्ष्याला पारवा या नावाने सुद्धा ओळखले जाते.
कबुतर पक्ष्याची शरीर रचना
कबुतर पक्ष्याच्या पंखांवर दोन काळे आणि रुंद पत्ते असतात. तर शेपटीच्या भागावर काळा रंग असतो. त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर हिरव्या व जांभळ्या रंगाचे चमकदार ठिपके असतात. कबुतराच्या पंखाखाली पंधरा रंग असतो आणि चोच ही काळ्या रंगाची असते.
कबुतर पक्ष्याचे डोळे आणि पाय हे लाल रंगाचे असतात. नर आणि मादी हे दोन्ही दिसायला सारखेच असतात. कबुतर हा पक्षी गुटूर – गू, गुटूर – गू असा आवाज काढतो.
कबुतराचे अन्न
कबुतर हा पक्षी प्रामुख्याने धान्य खातो. जसे कि ज्वारी, पांढरी करडी, काळे हरभरे, शेंगदाणे आणि गहू सुद्धा खातो.
शांतीचे प्रतीक
कबुतर हा पक्षी भरपूर शांत स्वभावाचा असतो. म्हणून या पक्ष्याला ‘शांतीचे प्रतीक’ असे म्हटले जाते. तसेच प्राचीन काळी कबुतरांचा उपयोग हा संदेशवहन करण्यासाठी केला जातो. जसे कि पत्र आणि चिट्ठी नेऊन पोहचवणे. युद्धाच्या वेळी सुद्धा कबुतरांचा उपयोग केला जात असे.
प्रजनन काळ
कबुतर या पक्ष्याचा प्रजनन काळ हा लगबग संपूर्ण वर्षभर असतो. हा पक्षी मिळतील त्या वस्तू एकत्र करून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेले घरटे हे पक्षी वापरतात.
कबुतर म्हणजेच पारवा
कबुतर हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबुतर किंवा पारव्याच्या रंगाचा असल्यामुळे त्याला ‘पारवा’ असे म्हटले जाते.
कबुतराचे मूळ स्थान
कबुतर हा पक्षी मुल स्वरुपाने युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.
तसेच हा पक्षी लहान – मोठीशहरे,खेड्यात,शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती व किल्ले याठिकाणी सहज पाहायला मिळतात.
कबुतराची प्रजाती
कबुतर या पक्ष्याच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील कोलंबा येथील लिव्हिया डोमेस्टिका ही प्रजाती सर्वात जास्त माणसाळलेली आहे.
ही प्रजाती पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. म्हणून यांच्यावर आधारलेल्या जगातील अनेक भाषांमध्ये कथा, कविता आणि गाणी आहेत.
आह काही लोक कबुतरांचे पालन – पोषण करतात, ज्याला ‘कबुतर खाना’ असे म्हटले जाते. तसेच या ठिकाणी त्यांचे खाद्य सुद्धा उपलब्ध करून दिले जाते.
निष्कर्ष:
कबुतर हा एक सुंदर पक्षी आहे. तसेच त्यांना संस्कृतीचा भाग आणि धर्माचा भाग मानले जाते. काही कवींनी अतिशय सुंदर प्रकारे आपल्या कवितांमध्ये कबुतर पक्ष्याचे वर्णन केले आहे.