मोर मराठी निबंध – येथे वाचा Essay on Peacock in Marathi Language

प्रस्तावना:

मोर हा पक्षी सर्व पक्ष्यांतील सर्वात सुंदर पक्षी आहे. मोर हा त्याच्या रंगीबिरंगी पंखांकरिता ओळखला जातो. मोर हा पक्षी त्याच्या मोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

मोर या पक्ष्याला ‘मयूर’ सुद्धा म्हटले जाते. तसेच आकर्षक रंगाच्या सुंदर पक्ष्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली. भारतीय इतिहासात मोराला विशेष स्थान आहे.

मोराचे वर्णन

सर्व पक्ष्यांमध्ये मोराचा आकार सर्वात मोठा असतो. मोर चमकदार हिरवट – निळ्या रंगाचे असतात. मोराची लांब अशी सुंदर मान असते. मोराच्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे एक सुंदर तुरा असतो.

मोराला लांब रंगीबिरंगी पिसारा असतो आणि या पिसाऱ्यावर अर्ध्या चंद्राची प्रतिमा असते. मोराचा जीवन काळ १५ ते २५ वर्ष इतका असतो. मोर हा पक्षी भारत देशाच्या विभिन्न भागात आढळतो.

मोराचे खाद्य

मोर हा पक्षी मुख्यतः धान्याचे दाणे आणि कीटक यावर आपले जीवन जगतात. तसेच मोर हा पक्षी फळे सुद्धा खातो.

मोर किडे, साप, अळी आणि शेतीला नुकसान पोहचवणारे कीटक खातात. म्हणून मोराला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले जाते.

मोरांचा निवास

मोर हा पक्षी मोठ्या संख्येने वृक्ष असलेल्या ठिकाणी, शेतात, पहाडावर आणि जंगलात राहतात. ते नेहमी जवळील पाण्याची जागा शोधात असतात.

मोर हा पक्षी मुख्यतः जमिनीवर विश्रांती करतात. बरेच मोर हे झाडांवर तर काही मोर हे झाडाच्या फांदीच्या शाखांवर झोपतात.

मोराचे नृत्य

मोराचे मुख्य आकर्षण म्हणजे – पाऊस. जेव्हा भारतात पावसाचे आगमन होते तेव्हा मोर खूप आनंदी होतो. त्याला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करतो.

हिंदू धर्मामध्ये महत्त्व

हिंदू धर्मात मोरांचे धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये मोराचा संबंध हा देवी – देवतांशी संबंधित आहे. मोर हा पक्षी भगवान विष्णू आणि भगवान कार्तिकेय यांच वाहन आहे.

हिंदू धर्मात मोराचे पीस पवित्र मानले जाते. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या डोक्यावर मोराचे सुंदर पंख सुशोभित आहेत.

भारताचा राष्ट्रीय पक्षी घोषित

मोर हा पक्षी भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. मोराला भारत सरकारने २६ जानेवारी, १९६३ साली राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले.

कारण मोर हा पक्षी भारत देशातील सर्व भागात आढळतो आणि भारतीय संस्कृतीमध्ये त्याची झलक पाहायला मिळते. मोर हा पक्षी इतका सुंदर आहे कि. कोणीही त्याला एकदा पाहिल्यावर त्याच्या सौंदर्याने मनमोहीत होते.

मोराच्या पंखांचा उपयोग

मोर हा अत्यंत सुंदर पक्षी आहे. मोराला दरवर्षी नवीन पंख येतात आणि जुने पंख पडतात. त्याच्या पंखांचा उपयोग घरगुती सजावटीसाठी केला जातो. मोराच्या पंखांपासून कानातले आणि इतर दागिने सुद्धा बनवले जातात.

त्याच बरोबर पुष्पगुच्छ बनविण्यासाठी, उन्हाळ्यात हवेसाठी हात पंख तयार केला जातो. आजकाल मोराचे पंख हे विविध प्रकारच्या डिजाईन मध्ये वापरले जातात. म्हणून आज बाजारात त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

तसेच मोराच्या होऊन मुघल बादशाह शाहजहानने मोराच्या पंखासारखे सिंहासन बनवण्याचा आदेश दिला. हे सिंहासन बनवण्यास ऐकून ६ वर्ष लागली. याला देश व परदेशातून अनमोल रत्न लावून हे सिंहासन तयार केले.

मोर संरक्षण कायदा

भारत देशामध्ये मोरांची शिकार केली जात असल्यामुळे त्यांची प्रजाती नष्ट होत आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने सन १९७२ साली मोरांच्या संरक्षणासाठी ‘मोर संरक्षण कायदा’ लागू केला.

मोरांच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी हा एक अत्यंत चांगला कायदा आहे. तसेच मोरांची संख्या वाढविण्यासाठी भारत सरकारने ही मोहीम राबवली आहे.

निष्कर्ष:

मोर हा पक्षी आपल्या देशाचा अभिमान आहे. अनेक कवींनी मोराच्या मोहक सौंदर्याचे वर्णन आपल्या कवितांमध्ये केले आहे. या सर्वांचे प्रतिबिंब भारतीय जुन्या संस्कृतीत उमटते.

Updated: नवम्बर 9, 2019 — 10:46 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *