प्रस्तावना:
आमचा भारत देश हा ऋतूंचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये मुख्य सहा ऋतू हे एका मागून एक येतात आणि या निसर्गाची शोभा वाढवतात.
परंतु भारतात तीन ऋतू हे महत्वाचे मानले जातात. जसे की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिन्हीं ऋतूंमध्ये पावसाळा हा एक असा ऋतू आहे ज्याची सगळी खूप आतुरतेने वाट बघत असतात.
साध्या आणि सोप्या भाषेत याला ‘पावसाळी हंगाम’ देखील म्हटले जाते. तसेच पावसाळा या ऋतूला पर्यटन संस्थेने ‘हिरवा ऋतू’ असे म्हटले आहे.
पावसाची सुरुवात
आपल्या भारत देशामध्ये पाऊस हा जून महिन्यापासून सुरु होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. पावसाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असतो.
जेव्हा भारत देशात मान्सून अरबी समुद्राकडून केरळ राज्यात प्रवेश करतो आणि हळूहळू उत्तर भारतात पोहचतो तेव्हा पावसाची सुरुवात होते.
सुख – दुःखाचे चक्र
ज्या प्रमाणे मानवाच्या जीवनात सुख – दुःखाचे चक्र चालत असते. त्याच प्रमाणे निसरगाचे चक्र सुद्धा फिरत असते.
निसर्ग हा नेहमी मानवाला निरनिराळ्या रूपात सुख – दुःखाची भावना देत राहतो. उन्हाळ्यात सर्व ठिकाणी पाण्याची कमतरता भासते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे सर्व लोक हे त्रस्त झालेले असतात. मानवाबरोबर प्राणी, पक्षी, आणि इतर सजीव देखील त्रस्त झालेले असतात.
तसेच उन्हाळ्यामध्ये सर्व झाडे, वनस्पती सुकुन जातात. पाण्याचे सर्व स्रोत सुखतात. त्यामुले मानव, प्राणी आणि पक्षी हे सर्व पाण्याच्या शोधात असतात.
पावसाळ्याचे अनोखे सौंदर्य
पावसाळ्यात सगळीकडे पाणीच – पाणी होते. पावसाळा या ऋतूचे वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते. पावसाळा हा ऋतू सुरु होताच सगळीकडे हिरवळ पसरते. बगीचे आणि मैदाने सुंदर आणि आकर्षक दिसतात.
तसेच हिरवळ न्हाळताना माणूस, प्राणी आणि पक्षी खूप आनंदित होतात. पाऊस पडताच पक्षी आनंदित होऊन क्रीडा करू लागतात. तसेच मोर हा पक्षी आपला सुंदर आणि रंगीबिरंगी पिसारा फुलवून नृत्य करू लागतो. त्याच प्रमाणे पाण्याचे सर्व स्रोत हे तुडुंब भरून वाहू लागतात. पावसाळ्यात सर्व झाडांना नवीन जीवनदान मिळते.
पावसाचे पाणी झाडांवर पडल्याने झाडे हिरवीगार दिसू लागतात. तसेच त्यांना नवीन पाने सुद्धा येतात. पाऊस आला कि हत्ती जोरात ओरडतात.पावसाळ्यात संपूर्ण वातावरण हिरवेगार होते आणि डोळ्यांना शांती मिळते.
पावसाळ्याचे महत्त्व
पावसाळा हा ऋतू भारत देशासाठी सर्वात महत्वाचा आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक हे खेड्यात राहतात आणि शेती हा व्यवसाय करतात. भारत देशातील शेती ही पावसावरच अवलंबून असते.
म्हणून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्या वर्षी चांगला पाऊस पडतो त्या वर्षी पीक सुद्धा चांगले येते. परंतु कधी – कधी पावसाळ्यात शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
पावसाळ्या ऋतूत येणारे सण
आपल्या भारत देशात पावसाळा या ऋतूचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खूप आहे. श्रावण महिना हा शुभ आणि पवित्र मानला जातो. जसा पाऊस पडायला लागतो तसेच आपल्या भारत देशात अनेक सण एका मागून एक येतात. जसे कि १५ ऑगस्ट, नाग पंचमी, रक्षाबंधन, शिवरात्री, गुरु पौर्णिमा, कजरी तीज, गणेश चतुर्थी, जन्माष्टमी असे अनेक सण येतात.
निष्कर्ष:
पावसाळा हा ऋतू संपूर्ण सृष्टीचा आणि जगाचा पोशिंदा आहे. हा ऋतू येताच संपूर्ण चराचरात चैतन्य निर्माण करतो. तसेच हा ऋतू धरणी मातेला सुजलाम – सुफलाम बनवतो. पावसाळा हा ऋतू सर्व सजीवांसाठी मौल्यवान वरदान आहे.
या ऋतूमुळे सर्व सजीवांना आणि मानवाला उष्णतेपासून आराम मिळतो. म्हणून आपण सर्वांनी देवाचे आभार मानले पाहिजेत की, आम्हाला पावसाळा हा ऋतू ही सुंदर भेट दिली आहे.