प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये आढळणाऱ्या सर्व पक्ष्यांमध्ये पोपट हा एक अतिशय सुंदर आणि रंगीबिरंगी पक्षी आहे. तसेच हा एक पाळीव पक्षी सुद्धा आहे.
पोपट हा पक्षी सगळ्या देशामध्ये आढळून येतो. पोपट हा पक्षी माध्यम आकाराचा आहे आणि हा पक्षी उबदार भागात जास्त प्रमाणात आढळतो. काही लोक पोपटाला आपल्या घरामध्ये पाळतात.
त्याच बरोबरआपल्या भारत देशामध्ये पोपट हा पक्षी हिरव्या रंगामध्ये आढळून येतो. तर इतर देशांमध्ये तो पांढरा, निळा, पिवळा आणि लाल या रंगांमध्ये आढळतो.
“पोपटाची” शरीर रचना
पोपटाचा रंग हा हिरवा असतो. त्याचे पंख सुद्धा हिरवे असतात. पोपटाचाही चोच हि लाल रंगाची असते अंडी हि चोच वाकलेली असते. पोपटाला चार नख्या असणारे मजबूत पाय असतात.
पोपटाच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वलय असते. पोपट हे रंगीत असतात परंतु त्याची अंडी ही पांढरी असतात. पोपटाचे वय हे लगभग १५ ते २० वर्ष असते.
पोपटाचे खाद्य
पोपट हा एक असा पक्षी आहे जो आपल्या पंज्यांमध्ये अन्न पकडू शकतो. पोपट हा पक्षी मिरची, फळे आणि बियाणे खातो.
तसेच त्याला पेरू हे फळ हे सर्वात जास्त आवडते. काही पोपट हे मांसाहारी सुद्धा असतात. ते लहान – लहान कीटक खातात.
पोपट बोलणारा पक्षी
प्राचीन काळापासून मानव पोपट या पक्ष्याचे पालन करत आहे. पोपट हा एक बोलणारा पक्षी आहे. हा पक्षी मानवी आवाज काढून बोलू शकतो. तसेच हा सहज मानवी बोलणे शिकतो. बाजारात बरेच काही पोपट हे बोलणारे दिसतात.
भारत देशामध्ये पोपटांना राम – राम आणि सीताराम हे शब्द बोलण्यास शिकवले जातात. जेव्हा घरात कोणी पाहुणे येतात तेव्हा पोपट हा पक्षी राम – राम किंवा सीताराम बोलून त्यांचे स्वागत असतो.
पोपट कुठे आढळतात –
पोपट हा पक्षी जवळजवळ उबदार देशामध्ये आढळतात. त्याला थंड ठिकाणी राहायला आवडत नाही. पोपट हा पक्षी झाडांमध्ये आपले घरे बांधून राहतात.
तसेच पोपट या पक्ष्याला कळपांमध्ये राहायला आवडते. पोपटाला सहसा कळपात राहण्यास आवडते. जेव्हा जेव्हा ते अन्नाच्या शोधात जातात तेव्हा ते १० ते १५ पोपटांच्या कळपाने जातात.
पोपटाच्या प्रजाती
पोपट या पक्ष्याच्या जगभरात ऐकूण ३५० हुन अधिक प्रजाती आढळून येतात. हा एक असा पक्षी आहे ज्याच्या बऱ्याच प्रजाती आहेत. पोपट हा पक्षी जंगल, शेतात आणि खेड्यांमध्ये आढळून येतात.
पोपटाचे मुख्य निवासस्थान
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे पोपटांचे मुख्य निवासस्थान आहे. याठिकाणी पोपट हा पक्षी विविध रंगांमध्ये आढळून येतो. तसेच यांना इथून पकडले जाते आणि इतर देशांमध्ये पाठवले जाते.
भारत देशात आढळणारा पोपट
आमच्या भारत देशामध्ये आढळणाऱ्या लहान पोपटाचे शास्त्रीय नाव ‘लोरिक्युलस व्हर्नॅलिस’ असे आहे. हा पोपट साधारणतः चिमणी एवढा असतो. हा पोपट लहान झाडे, कळकांची वने, फळांच्या बागा आणि मळ्यात राहतो.
या पोपटाची शेपटी मोठ्या पोपटांच्या तुलनेत आखूड असते म्हणून याला ‘लांडा पोपट’ असे सुद्धा म्हटले जाते. हा पोपट हिरव्या झाडांच्या फांदीवर बसला तरी ओळखता येत नाही.
निष्कर्ष:
पोपट हा एक अत्यंत सुंदर पक्षी आहे. तसेच काही लोक अद्भुत गोष्टी करण्यासाठी पोपटांचा शो लावून आपले जीवन जगतात. परंतु मानव मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करत आहे.
त्यामुळे त्यांची प्रजाती विलुप्त होत आहे. यासाठी पोपटांच्या प्रजाती वाचविण्यासाठी मानवाला झाडांची तोड करणे थांबवले पाहिजे. तसेच त्यांचे रक्षण केले पाहिजे.
मराठी भाषेत पोपटावरील निबंधाविषयी काही शंका असल्यास आपण खाली आपली प्रतिक्रिया देऊ शकता.