पोपट मराठी निबंध – वाचा येथे Essay on Parrot in Marathi for Kids

प्रस्तावना:

आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे पक्षी आढळून येतात. त्या सर्व पक्ष्यांमध्ये पोपट हा एक छोटासा सुंदर आणि रंगबिरंगी पक्षी आहे. पोपट हा पक्षी दिसायला खुप सुंदर असतो.

पोपट हा उबदार असलेल्या सर्व प्रदेशांमध्ये आढळून येतो. पोपट हा एक समजदार म्हणजेच शहाणा पक्षी आहे. तसेच हा पाळीव पक्षी सुद्धा आहे. काही लोक हे आपल्या घरामध्ये या पक्ष्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतात.

पोपटाची शरीर रचना

Parrot

पोपट हा पक्षी हिरव्या रंगाचा असतो आणि त्याची चोच ही लाल रंगाची असते. त्याची चोच ही वक्र असते आणि तीक्ष्ण देखील असते. पोपटाच्या गळ्याभोवती एक काळ्या रंगाचे वलय असते.

पोपट हे रंगीत असतात. पण पोपटांची अंडी ही सफेद रंगाची असतात. पोपटांचे वय सरासरी १५ – २० वर्ष इतके असते. परंतु पोपटाच्या अशा काही प्रजाती आहेत ज्या ६० वर्षापर्यंत जगू शकतात.

पोटाचे खाद्य

Parrot

पोपट हा एक शाकाहारी पक्षी आहे. पोपट या पक्ष्याला मुख्यतः मिरची आणि पेरू खायला आवडते. तसेच तो दाणे, फळे, बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो. तसेच पोपटाला कठीण कवचाची फळे खायला आवडतात.

पोपट हा एक असा एकमेव पक्षी आहे जो आपल्या पंज्यात अन्न पकडून ठेवतो. काही पोपट हे मांसाहार देखील करतात. ते लहान कीटक खातात.

पोपट या पक्ष्याला सहसा कळपात राहणे आवडते. जेव्हा – जेव्हा पोपट यांच्या शोधात जातात तेव्हा ते १० ते १५ पोपटांच्या कळपाने जातात. तसेच पोपट हा पक्षी उंच झाडांवर आपला घरटा बांधून राहतात.

पोपटाचे पालन

Parrots

प्राचीन काळापासून मानव पोपट या पक्ष्याचे पालन – पोषण करत आला आहे. जर पोपट हा पक्षी काही दिवस माणसांमध्ये राहिला तर तो त्याची भाषा बोलू शकतो.

त्याचप्रमाणे त्याची नक्कल देखील उतारू शकतो. तो मानवी बोलणे सहज शिकतो. तसेच बाजारात सुद्धा बोलणारे पोपट पाहायला मिळतात. भारत देशात पोपट या पक्ष्याला राम – राम आणि सीताराम हे शब्द बोलायला शिकवले जातात.

जेव्हा आपल्या घरात कोणी येत तेव्हा पोपट राम – राम आणि सीताराम हे शब्द बोलून त्यांचे स्वागत करतो. म्हणून काही लोक हे पोपटांचे पालन करतात. तसेच पोपट या पक्ष्याला अनेक नावानी ओळखले जाते. जसे की पोपट, रावा, मिट्टू इत्यादि.

पोपटाच्या प्रजाती

संपूर्ण जगात सुंदर आणि चंदर पिसे असणाऱ्या पोपट या पक्ष्याच्या ऐकून ३५० हुन अधिक प्रजाती आहेत. पोपट या पक्ष्याच्या बऱ्याच प्रजातींपैकी नर आणि मादा हे सारखेच दिसतात.

पोपटाचे निवास स्थान

parrot

पोपट हा पक्षी भारत देशात जंगलात किंवा शेतात आढळून येतो. कधी – कधी ते घराच्या छतांवर सुद्धा बसलेले असतात. पोपट या पक्ष्याचे मुख्य निवास स्थान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे आहे.

येथे पोपट हा पक्षी रंगीबिरंगी रंगात आढळून येतो. येथून पोपट हा पक्षी पकडून इतर देशांमध्ये पाठवले जातात. पोपट या पक्ष्याला थंड हवामानात राहायला आवडत नाही.

तसेच बरेच लोक हे अद्भुत गोष्टी करण्यासाठी पक्ष्यांचा शो लावतात आणि त्यावर आपले जीवन जगतात.

झाडांची तोड

परंतु आज मानव आपला स्वार्थासाठी झाडांची तोड करत आहे. त्यामुळे सर्व पक्ष्यांना राहायला स्थान मिळत नाही. तसेच झाडांची तोड झाल्याने पोपट या पक्ष्याच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

निष्कर्ष:

पोपट हा एक विचित्र आणि सुंदर पक्षी आहे. या सुंदर पक्ष्याच्या प्रजाती वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाडांची तोड न करता जास्तीत – जास्त झाडे लावण्याची आवश्यकता आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *