प्रस्तावना:
निसर्ग हा आपल्याला मिळालेला एक दुवा आहे. जी आपण आपल्या जन्म जात पाहत आलो आहोत. या निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. आणि त्याचा कोप जर झाला तर या जगाचे नुकसान हि होऊ शकते.
निसर्गाचे फायदा नुकसान
निसर्गाने आपल्या जीवनात जेवढ्या पण आवश्यक गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लाकूड, अन्न धान्य, कपडे, जमीन, जीवन जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, आणि निवारा. ह्या निसर्गाने दिलेल्या वस्तू आहेत. ज्याचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो. पण ह्या निसर्गाला सुद्धा सांभाळण्याची गरज आपल्याला आहे.
जर निसर्गाचा आपण अपमान केला तर त्याचा कोप हि होऊ शकतो. जसे सुनामी, भूकंप , अतिवृष्टी दुष्काळ काहीही होऊ शकते. निसर्ग आपला गुरु आहे. त्याने हे जग इतके सुंदर बनविले आहे कि, आपण त्याचा नेहमीच्या जीवनात उपयोग करतो.
आदिमानव आणि निसर्ग
आधी आदिमानव जन्माला आले त्यांनी निसर्गाचा पुरे पूर फायदा घेतला आणि त्याचे फायदे आपल्याला सुद्धा दाखवीन दिले. ज्याचा आणखी त्यात आपले परिश्रम घालून नव नवीन शोध लावले.
आदिमानवाचे शोध
त्यांना जीवन जगणे अशक्य होते कारण तेव्हा असे तंत्रज्ञान न्हवते. पण त्यांना जीवन जगण्यासाठी काही तरी कार्याचे होते म्हणून त्यांनी नेहमी प्रयत्न केले. दगडावर दगड घासून आग निर्माण केली. जंगलामध्ये मिळणारी फळे खाऊन आपला उदरनिर्वाह केला.
झाडाच्या फांद्या, सुक्या काठ्या यांच्या पासून धारदार हत्यारे बनविली ज्याच्याने ते शिकार करत आपल्या भोजना साठी. पाण्यातून प्रवास करण्यासाठी झाडापासून छोट्या छोट्या नाव बनविल्या, त्याच झाडांपासून चाके बनविली आणि लाकडाच्या गाड्या बनविल्या ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपयोगी होत्या.
दगडापासून पण त्यांनी हत्यारे बनविली. जी काठी ला बांधून भाला सारखी हत्यारे बनली.
निसर्गाचे वरदान
निसर्गाने आपल्याला खूप सारे वरदान दिले आहेत. त्याला मी माझा गुरु मानते. कारण निसर्गपासून मिळणारे लाकूड याचा उपयोग आपण आपल्याला घर बनविण्यासाठी, स्वयंपाक घरातील वस्तू. या साठी आणि पेपर वही पुस्तके हि सुद्धा लाकडा पासूनच बनतात. जर झाडे नसती तर ह्या वस्तू आपल्याला नसत्या मिळाल्या.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या ऋतू जर नसत्या तर सर्व निसर्ग ओस पडला असता. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असती.
निसर्गाची किमया
या निसर्गाने आपल्याला खूप छान जग दिले आहे. ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे. पण आज आपण झाडे तोडून इमारतही उभ्या केल्या. गटारे नाले बंद करून कारखाने उभे केले. पण या धरती वर आपण इतके गलिच्छ प्रकार केले तरी निसर्ग आपले काम काही विसरत नाही. तो त्याची कामे वेळेवर करत असतो.
या जमिनीवर एवढ्या मोठं मोठ्या इमारती उभ्या करून जमिनीची झीज होते हे आपणास कधी कळणार. झाडे तोडून वातावरणावर किती वाईट परिणाम होत आहेत. आपल्याला काही दिवसांनी श्वास घेणे मुश्किल होईल. म्हणून आज सर्वत्र झाडे लावा झाडे जगवा चे कार्यक्रम राबवतात.
चार महिने पावसाळा असतो पण जमीन आपल्या पोटात पाणी साठवून ठेवते म्हणून झाडे बाराही महिने हिरवीगार असतात. जमिनीचे पाणी सुकले तर जमीन दुष्काळ ग्रस्त होईल आणि जीवित हानी लवकरच होईल त्याने. हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.
निसर्ग आपला पिता आहे
निसर्गाची आपण मुले आहोत. कारण त्याने आपल्याला निर्माण केले. आपल्याला लागणाऱ्या जीवनउपयोगी वस्तू निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत. एक आई जसे आपल्या मुलाला जपते तसे हि जमीन आपल्याला जपते.
सारांश:
निसर्ग माझा गुरु आहे कारण तो जसे प्रत्येक ऋतू प्रमाणे आपले रूप बदलून आपल्याला आनंदी ठेवतो. आणि उपयोगी वस्तूंचे आपल्याला योगदान देतो. तो कधी थकत नाही नियमित चंद्र सूर्य झाडे झुडपे आपली कामे करतात. म्हणून मी त्याला आपला गुरु मानते.