प्रस्तावना:
निसर्ग आणि मानव यांचा अतूट संबंध आहे. कारण या निसर्गातून मानवाला बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. निसर्ग हा खूप दानशूर आहे.
तो मानवाला भरपूर काही देतो पण त्या बदल्यात तो मानवाकडून कधीच काही मागत नाही. निसर्ग कधी बोलत नाही पण कृती करतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही.
निसर्ग म्हणजे काय –
निसर्ग ही मानवाला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. निसर्ग म्हणजे – पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पाच तत्त्वांनी बनलेली सृष्टी होय. मानवाचा जन्म या पाच तत्वांमधून झाला आहे.
याच पाच तत्त्वात माणूस विलीन झाला आहे. आपण या निसर्गात जन्मतो, वाढतो आणि विलीन सुद्धा होतो. त्यामुळे आपण या निसर्गाचे जातं करणे आणि संरक्षण करणे गरजेचे आहे.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी
या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त झालाय आहेत. जसे की मानवाला निसर्गातून शुद्ध हवा मिळाली. तसेच फळ, फुल, भोजन आणि इंधन सुद्धा मिळाले आहे.
तसेच सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन मिळतो. मानव निसर्गातून मिळणाऱ्या झाडांच्या लाकडाच्या उपयोग इंधनाच्या रूपाने करतो. तसेच झाडांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.
त्याच प्रमाणे उद्योगांना लागणाराकच्चा मला तयार करतो. झाडांपासून रबर, माचीस, गोंद आणि औषधे सुद्धा तयार केली जातात.
निसर्ग आपला गुरु
त्याच प्रमाणे निसर्ग सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान देतो, शिकवण देतो, बोधप्रद धडे शिकवतो. निसर्ग हा आपल्याला काहीच संगत नाही परंतु तो आपल्या कृतीतून बरेच काही शिकवतो. म्हणून आपण सर्वानी निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे. म्हणून निसर्ग हा आपला गुरु असतो.
निसर्ग एक चित्रकार
निसर्ग प्राण्यांचे घर
निसर्गाचे महत्त्व
या निसर्गाने आपल्याला अनेक प्रकारची फुले, फळे, प्राणी, पक्षी, निळे आकाश, जमीन, नद्या, समुद्र इत्यादी सर्व काही दिले. मानवाच्या जीवनाचा विकास होण्यासाठी देवाने या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत.
या निसर्गाने मानवाला खूप काही दिले. परंतु मानव या निसर्गाचा नाश करत आहे. मानव आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी झाडांची दिवसेंदिवस तोड करत आहे.
त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग,अनेक प्रदूषणाच्या समस्या, ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून आपण सर्वानी जितके शक्य होईल तितके वातावरण स्वच्छ ठेवले पाहिजे.
निष्कर्ष:
हा निसर्ग आपल्याला खूप काही देतो. म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, या निसर्गाचे आपण सर्वानी संरक्षण केले पाहिजे. या निसर्गातून आपल्याला खूप काही शिकायला सुद्धा मिळते म्हणून हा निसर्ग आपला मित्र, सोबती, सखा आणि गुरु सुद्धा आहे.