Nature

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथै Essay on Nature My Friend in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे. ही पृथ्वी खूपच सुंदर आणि हिरवीगार पालवीसह आकर्षक आहे. या सुंदर ग्रहावर आपण सर्व राहतो. कारण पृथ्वीवर प्रत्येक सजीवाला आणि मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध संसाधने उपलब्ध आहेत.

वाचे येथै निसर्ग मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Nature

ईश्वराने या निसर्गाची खूप अत्यंत चांगल्या प्रकारे निर्मिती केली आहे. म्हणून निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. निसर्ग हा मानवाचा चांगलाच साथीगर आहे.

निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी

netural या निसर्गाकडून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच फळे, फुले, भाज्या, भोजन, इंधन इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतात. त्याच बरोबर हा निसर्ग आपल्याला पिण्यासाठी पाणी देतो, राहण्यासाठी जागा किंवा जमीन देतो, पोटासाठी अन्न देतो आणि प्राणी, पक्षी वनस्पती इत्यादी सुविधा पुरवितो.

हा निसर्ग खूप सुंदर आहे ज्यामध्ये अशा अनेक महत्वपूर्ण शक्ती आहेत. ज्या आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन देतात. म्हणून देवाने दिलेली ही सर्वात सुंदर भेट आहे.

मानवाच्या जीवनात महत्त्व

neture माणसाचे संपूर्ण जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. कारण मानवाला लागणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गातूनच मिळते. कोट्यावधी वर्षांपूर्वी मानवाचे ज्ञान हे एखाद्या प्राण्यांपेक्षा जास्त नव्हते तेव्हा मानवाला लागणाऱ्या सर्व वस्तू या निसर्गातूनच मिळाल्या.

वाचे येथै  निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Nature My Friend Essay in Marathi

मानव या निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळून प्रगत होऊ लागला. त्याने पूर्वीच्या काळी हत्यारे बनवली, आग पेटवली आणि चाकाचा शोध लावला. या सर्व शोधांमुळे मानवाचे जीवन संपूर्णपणे बदलून गेले.

मानव दगडाच्या साहाय्याने शिकार करू लागला आणि आगीच्या साहाय्याने शिजवून खाऊ लागला. त्याने चाकाचा शोध लावल्यामुळे चाकाच्या साहाय्याने अन्य ठिकाणी वेगाने पोचू लागला. हे सर्व मानवाला या निसर्गाकडूनच मिळाले.

निसर्गाचे महत्त्व

Prakriti या निसर्गाने मानवाला अनेक प्रकारची फुले, पक्षी, प्राणी, झाडे, निळे आकाश, जमीन, नद्या – नाले, समुद्र, पर्वत, डोंगर इत्यादी सर्व दिले आहे. मानवाचे जीवन सुधारण्यासाठी या सर्व गोष्टी देवाने मानवाला निर्माण केल्या आहेत.

हजारो वर्षांच्या प्रगतीनंतर मानवाचे जीवन सुधारू लागले आहे. मनुष्य उंच – उंच इमारती आणि रस्ते बांधू लागला आहे. तसेच विमाने आणि शास्त्रे तयार करू लागला आहे. आज मनुष्य मोठं – मोठी स्वप्ने पाहू लागला आहे. तो मूलभूत गरज भागवू लागल्या आहेत. आज मानव भौतिक सुखांच्या मागे पळत आहे.

या निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे परंतु त्या बदल्यात मानवाकडून काहीच मागितले नाही आहे. परंतु आज मानव नेहमीच त्याचा नाश करण्यात गुंतलेला आहे.

निसर्गाला नुकसान

भूमि प्रदूषणमानव आज आपला स्वार्थ आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी या निसर्गाचे संतुलन बिघडवत आहे. निसर्गात असणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करत आहे. त्यामुळे सर्व जंगले आणि वने संपुष्ट चालली आहेत.

वाचे येथै :निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Nisarg Maza Mitra Essay in Marathi

झाडांची तोड केल्यामुळे प्रदूषण, ग्रीन हाऊस, ग्लोबल वॉर्मिंग यासारखी समस्या निर्माण होत आहे. तसेच मानवाने तंत्रज्ञानाच्या युगात बरेच शोध लावले आहेत. परंतु या सर्वाचा निसर्गावर सर्वात जास्त परिणाम होत आहे. म्हणून मानवाने निसर्गाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

निसर्ग संवर्धन

प्रकृति संसारअशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो.

आपण सर्वानी आपल्या सभोवतालचे निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

तसेच सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

मानवाने आपल्या स्वार्थासाठी कधीही निसर्गाचा समतोल बिघडू नये. कारण मानवाच्या जीवनाचे हे सर्वात मोठे कारण बनू शकते.

आपण सर्वानी निसर्गाच्या देणगीचा आदर केला पाहिजे. तसेच निसर्गाच्या नियमांनुसार उपयोग केला पाहिजे.

निष्कर्ष:

निसर्गाने या मानव जातील जन्म दिला आहे. म्हणून त्याचे आपण संगोपन केले पाहिजे. तसेच निसर्गाचे संतुलन राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणूनच निसर्ग हा आपला मित्र, सोबती आणि सखा सुद्धा आहे.

Leave a Comment