निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Essay on Nature My Best Friend in Marathi

प्रस्तावना:

आपण सर्वजण खूप सुंदर ग्रहावर राहतो आणि तो ग्रह म्हणजे पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यमालेतील सर्वात महतवाचा ग्रह आहे. कारण जो खूपच सुंदर आणि हिरवीगार पालवीसह आकर्षक आहे.

निसर्ग हा मानवाचाही चांगला साथीगर आहे. तसेच निसर्ग आणि मानव या दोघांचा पुराना संबंध आहे. जो मानवाला आपले जीवन जगण्यासाठी अनेक संसाधने उपलब्ध करतो. या निसर्गाने मानवाला पिण्यासाठी पाणी, राहण्यासाठी जागा श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा दिली.

तसेच पोटासाठी अन्न दिले आणि या धरतीवर राहणाऱ्या इतर सजीवांना जसे की प्राणी, पक्षी आणि जीव – जंतू यांना राहण्यासाठी निवारा दिला.

निसर्ग म्हणजे काय  –

निसर्गाची

निसर्ग म्हणजे सृष्टी होय. ही सृष्टी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पाच तत्त्वांनी बनलेली आहे. मानवाचा जन्म याच निसर्गाच्या पाच तत्वांमधून झाला आहे.

तसेच या पाच तत्त्वांमध्ये विलीन सुद्धा झाला आहे. आपण या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि शेवटी विलीन सुद्धा होतो. म्हणून या निसर्गाचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.

निसर्गाचे सौंदर्य

निसर्गातून

या निर्सगाचे अफाट सौंदर्य आहे. जे मानवतेसाठी एक वरदान म्हणून मिळाले आहे. वाहणाऱ्या नद्या, वाहणारे वारे, धबधबे, उंच – उंच पर्वत, पठार, डोंगर, फेसाळणारा समुद्र हे सर्व निसर्गाला एकदम चार चांद लावतात. निसर्ग आपले वास्तविक जीवन, आनंद आणि चांगुलपणाने भरते.

निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी

netural

या निसर्गातून मानवाला अनेक संसाधने ही प्राप्त होतात. त्या संसाधनांचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. या निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते.

झाडे निसर्गाचा महत्वाचा घटक

neture

झाडे ही निसर्गाचा महत्वाचा घटक आहे. कारण झाडे मानवाला आणि सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन प्रदान करतात. तसेच झाडे स्वतः मानवाला हानिकारक असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडला अवशोषित करतात.

या झाडांपासून मानव आपल्या उद्योगांना लागणारा कच्चा माल तयार करतो. तसेच मानव झाडाच्या लाकडांचा उपयोग हा इंधनाच्या रूपाने करतो.

त्याच प्रमाणे मानव या झाडांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी देखील तयार करतो. तसेच मानव झाडांपासून कागद, रबर, गोंड आणि औषधे तयार करतो.

परंत्तू आज मानव आपल्या स्वार्थापायी इतका आंधळा झाला आहे की, तो दिवसेंदिवस झाडांची तोड करत आहे. तो विसरून गेला आहे की झाडे तोडताना आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.

विविध समस्या

प्रकृति का रूप

या निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे. परंतु त्या बदल्यात त्याच्याकडे काहीच मागितले नाही. परंतु मानव निसर्गाचे संरक्षण करण्याऐवजी नेहमीच त्याचा नाश करत आहे.

मानवाने आपल्या फायद्यासाठी पर्यावरणीय प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, ग्रीनहाऊस यांसारखी विनाशकारी करणे तयार केली आहेत. आज मानवाने आपल्या स्वार्थासाठी विज्ञानाच्या साहाय्याने अनेक शोध लावले आहेत. परंतु या सर्वच परिणाम निसर्गावर काय होईल याचा विचार नाही केला.

निसर्गाची रक्षा

प्रकृति का स्वरुप

झाडे ही जमिनीची धूप रोखण्याचे कार्य करतात. त्यामुळे मानवाने झाडांची तोड करणे बंद केले पाहिजे.

तसेच आपल्या सभोवतालचे निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत.

मानवाने आपल्या स्वार्थासाठी निर्सार्गाचा समतोल बिघडू नये. कारण मानवी विनाशाचे सर्वात मोठे कारण बनू शकते.

तसेच मानवाने जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत.

निसर्ग हा पशु – पक्ष्यांचे घर आहे. म्हणून मानवाने त्यांचे घर नष्ट करू नये.

निष्कर्ष:

निसर्ग हि मानवाला ईश्वराकडून मिळलेली सर्वात मोठी देणगी आहे. तसेच निसर्गाच्या देणगीचा आदर केला पाहिजे आणि मानवाने निसर्गाच्या नियमानुसार उपयोग केला पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *