essay on teacher 2

निसर्ग माझा सोबती, मित्र, गुरु, निसर्गाचे महत्व मराठी निबंध – येथे वाचा Essay on Nature in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. कारण याच निसर्गातून मानवाचा जन्म झाला आहे आणि त्यातूनच त्याचा विकास झाला आहे. या निसर्गाशिवाय मानव आपले जीवन जगू शकत नाही. कारण मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सर्व वस्तू या निसर्गातून प्राप्त होतात.

सर्व ग्रहांमधील पृथ्वी हा असा ग्रह आहे ज्यावर मानवाचे अस्तित्व आहे. या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग. अशा या सौरमंडळात आपण सर्व या अमूल्य ठिकाणी राहत आहोत. आपलं संपूर्ण अस्तित्व या निसर्गानेच मांडले आहे.

निसर्गातून मिळणारी संसाधने

निसर्गातूनया निसर्गातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि लाकडाच्या रूपाने इंधन प्राप्त होते. या सर्वच उपयोग मनुष्य आपल्या जीवनामध्ये करतो.

तसेच मानवाला निसर्गातून शुद्ध हवा आणि जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो. तसेच हा निसर्ग मानवाला पिण्यासाठी पाणी देतो, राहण्यासाठी जमीन देतो आणि घर बांधण्यासाठी लाकूड देतो.

त्याच बरोबर मानवाला निसर्गातून विविध प्रकारची खनिज संपत्ती सुद्धा मिळते. मानव याच निर्सगाच्या अंगाखांद्यावर खेळून प्रगत होऊ लागला.

पूर्वीचे मानवी जीवन

पूर्वीचेपूर्वीच्या काळी मानवाला विविध प्रकारच्या वस्तू या अवगत नव्हत्या. कारण त्यावेळी मानव जीवन हे जास्त प्रमाणात प्रगत झाले नाही होते.

मानवाने दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला, हत्यारे बनवली आणि चाकाचा शोध लावला. यामुळे मानवाचे संपूर्ण जीवन बदलून गेले.

दगडांच्या हत्याराने तो शिकार करू लागला आणि आगीच्या साहाय्याने तो शिकार शिजवून खायला लागला. तसेच चाकाच्या शोधामुळे अनेक ठिकाणी  पोहचू लागला. या सर्वामुळे मानवाच्या जीवनात बदल होऊ लागला.

मानवाची प्रगती

मानवता का उद्देश्य

हजारो वर्ष नंतर मानवाचे जीवन सुधारू लागले. मानव निसर्गातून मिळणाऱ्या झाडांची तोड करून इमारती व घरे बांधू लागला. तसेच मानवाला निसरगातून विविध प्रकारची औषधे मिळू लागली. त्यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढू लागले.

मृत्युदर कमी होऊन जीवन काळ वाढू लागला. या सर्वामुळे लोकसंख्या हि जास्त प्रमाणात वाढू लागली. समाजाची निर्मिती होऊ लागली आणि माणसाला भाषेची आणि लिपीची गरज भासू लागली. त्यातूनच संस्कृती आणि परंपरा निर्माण होऊ लागली.

या निसर्गाने मानवाच्या प्रत्येक प्रगती पथावर साथ दिली. त्यानंतर मानवाने विजेचा शोध लावला, रस्ते  बांधले, नौका बनवल्या आणि समुद्र प्रवास सुद्धा करू लागला. यामागची प्रेरणा आणि कल्पना हि मानवाला निसर्गाकडूनच मिळाली.

निर्सगाला हानी

निर्सगाला हानी आज मानव मोठं – मोठी स्वप्न पाहू लागला. त्याच्या मूलभूत गरज या साजह भागू लागल्या. मनुष्य भौतिक सुखायच्या मागे पळू लागला.

मानवाला राहण्यासाठी मोठे घर आणि गाडी तसेच त्यांना लागणारी साधन सामग्री हि निसर्गाकडूनच मिळू लागली. आज मानवाच्या प्रगती बरोबर महत्वाकांक्षा सुद्धा वाढली.

म्हणून मानव आपल्या सुख – सुविधा व मूलभूत गरज भागवण्यासाठी या सुंदर निसर्गाचा ऱ्हास करत आहे. दिवसेंदिवस मानव झाडांची तोड करत आहे. त्यामुळे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्या निर्मण होत आहेत.

यावर एकच उपाय म्हणजे निसर्गाचे संगोपन करणे हेच आहे. या निसर्गाने आपल्या सर्व काही दिले आहे. परंतु त्या बदल्यात निसर्गाने मानवाकडे काहीच मागितले नाही. म्हणून आज आपल्याला या निसर्गाला जपण्याची खूप गरज आहे. ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला,

निष्कर्ष:

संगोपन केले आणि आपला सोबती सुद्धा झाला. टाच निसर्गाकडे विनाश करण्याची ताकद सुद्धा आहे. या निसर्गावर आपण आपलं वर्चस्व गाजवत आहोत. जर आपण असेच करत राहिलो तर निसर्ग एक दिवस आपला विनाश करेल.

म्हणून येणाऱ्या पिढीला जर एक सुंदर निसर्ग द्यावा असेल तर जास्तीत जास्त झाडे लावून तसेच त्याचे संगोपन आणि जतन केले पाहिजे.

Leave a Comment