प्रस्तावना:
मोर हा पक्षी सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर पक्षी आहे. मोर हा एक असा पक्षी आहे जो सर्व मानव जातीला आकर्षित करतो. मोर हा पक्षी भारत देशाच्या विविध भागांमध्ये आढळून येतो.
तसेच मोर या पक्ष्याला त्याच्या रंगीबिरंगी पंखांकरिता ओळखले जाते. मोर हा पक्षी मोहक सौंदर्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहे.
मोराची शरीर रचना
मोर हा दिसायला हिरवट – निळ्या रंगाचे असतात. त्यांना सुंदर अशी लांब मान असते. मोराच्या पिसाऱ्यावर चंद्रासारखे असंख्य ठिपके असतात.
ते हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंगछटांचे असतात. मोराचे पाय खूप लांब असतात आणि त्यांच्या डोक्यावर तुरा असतो. मोराची मान हि गडद निळ्या रंगाची असते.
मोराचे खाद्य
मोर हा पक्षी मुख्यतः धान्याचे दाणे आणि कीटक यावर जगतात. तसेच मोर हा पक्षी शेतकऱ्याचा चांगला मित्र असतो.
कारण मोर शेतीचा नाश करणारे प्राणी जसे कि, उंदीर, बेडूक आणि साप यांना खातो आणि शेतीची रक्षा करतो.
मोराचे निवास स्थान
मोर हा पक्षी जास्त वृक्ष असलेल्या ठिकाणी राहतो. तसेच हा पक्षी शेतात, पहाडावर आणि जंगलात राहतात.
मोर हा पक्षी पाण्याजवळील जागा शोधतात. मोर जमिनीवर विश्रांती करतात. तर काही मोर हे झाडांवर आणि फांदीच्या शाखांवर झोपतात.
पावसाळी हवामान
मोर या पक्ष्याला पावसाळी हवामान आवडते. मोराची विविध प्रकारच्या हवामानाच्या परिस्थितीत राहण्याची क्षमता असते. ते अत्यंत हवामानात जगू शकतात.
त्याच प्रकारे मोर हा पक्षी वाळवंटी प्रदेशात व हिम वर्षात आढळून येतात.तसेच मोराला पाऊस हा खूप पसंद असतो. कारण मोर हा पक्षी पाऊस पडताच आपला रंगबिरंगी पिसारा फुलवून नृत्य करतो.
मोराचा स्वभाव
मोर या पक्ष्याचा स्वभाव अत्यंत शांत आणि लाजाळू आहे. मोर हा पक्षी मनुष्यापासून खूप दूर पळतात आणि प्राण्यांना सुद्धा घाबरतात. मोराला त्यांच्या समूहामध्ये फिरणे आवडते. तसेच मोर हा अतिशय सावध पक्षी आहे.
मोराला दुरूनच धोक्याची जाणीव होते. मोर हा पक्षी आपल्या जीवनासाठी लपत आणि धावत नाही तर त्यांचे सहकारी मोर आणि इतर पक्षी सुरक्षित आहेत हे देखील सुनिश्चित करतात.
मोराचे प्रकार
मोर या पक्ष्याचे मुख्य तीन प्रकार आणि प्रजाती आहेत. जसे कि भारतीय मोर, ग्रीन मोर आणि कांगो मोर.
भारतीय मोर
भारतीय मोराची कोणतीही उप प्रजाती नाही आहे. भारतीय मोर भारत, पाकिस्तान , नेपाळ आणि बांगलादेश तसेच श्रीलंका या देशात आढळून येतो. या मोराची प्रजाती हि सर्वात सुंदर प्रजाती आहे. हा मोर कोणत्याही अन्य भागात आढळून येत नाही.
ग्रीन मोर
परंतु ग्रीन मोर हे त्यांच्या नैसर्गिकरित्या दिसून येतात. ग्रीन मोरांच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाच्या ऐवजी हिरव्या रंगाचे पंख दिसून येतात.
कांगो मोर
या मोराला भारतीय आणि ग्रीन मोरासारखा लांब पिसारा नसतो. कांगो मोराचा आकार देखील छोटा असतो आणि हा मोर आकर्षक दिसत नाही.
हिंदू धर्मात मोराचे स्थान
हिंदू धर्मात मोराचे पीस अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपंख सुशोभित केले आहेत. मोर हा पक्षी देवी सरस्वतीचे वाहन आहे.
निष्कर्ष:
मोर हा पक्षी देवाच्या सर्वात सुंदर निर्मितीपैकी एक आहे. तसेच मोर या पक्ष्याने प्राचीन काळापासून त्याच्या सौंदर्याने कवींचे, सम्राटांचे आणि योद्ध्यांचे मन आकर्षित केले आहे.
मोराच्या सौंदर्यामुळे भारत सरकारने त्याला २६ जानेवारी, १९६३ साली ‘राष्ट्रीय पक्षी’ म्हणून घोषित केले आहे.