स्वतःवर मराठी निबंध – वाचा येथे Essay on Myself in Marathi

प्रस्तावना:

प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेमध्ये स्वतः बद्दल निबंध लिहायला दिला जातो. जेणेकरून प्रत्येक मुलाला स्वतः बद्दल माहिती सांगण्यासाठी संकोच वाटणार नाही आणि मन मोकळेपणाने स्वतः बद्दल सांगू शकतात.

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. त्याच प्रमाणे मी सुद्धा एक मुलगी आहे आणि मी या निबंधात स्वतः बद्दल माहिती सांगणार आहे.

माझा परिचय

माझे नाव अंजली चौधरी आहे. माझ्या कुटुंबातील आणि माझ्या मैत्रिणी मला परी म्हणतात. माझ्या गावात एक शाळा आहे आणि मी त्या शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.

माझ्या शाळेचे पूर्ण नाव ‘शारदा विद्यामंदिर’ असे आहे. मी एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. अगदी सुरुवातीपासूनच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेत आणि मला चांगली नैतिक मूल्ये सुद्धा शिकवली आहेत.

जसे की आई – वडिलांचा आदर करणे, असहाय्य लोकांना मदत करणे आणि प्रत्येक व्यक्तीशी नम्रतेने वागणे व बोलणे इ.

माझे कुटुंब

माझ्या कुटुंबात एकूण ८ सदस्य आहेत. ज्यात माझे आई -वडील, आजी – आजोबा, काका – काकी, आम्ही दोघे भाऊ – बहिणी इ सर्व प्रेमळ भावनेने एकत्र राहतो. माझे बाबा हे कर विभागात एक सरकारी अधिकारी आहेत.

जे अतिशय शिस्तबद्ध व्यक्ती आहेत. माझे बाबा माझ्यासाठी एक आदर्श आणि मूर्ती देखील आहेत. तसेच माझी आई ही सरकारी शाळेत शिक्षिका आहे. जी आपल्या कामाबरोबर आम्हा सर्वांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेते. त्याच बरोबर मजाही एक छोटा भाऊ आहे. जो माझ्या बरोबर माझ्या शाळेत इयत्ता ३ मध्ये शिकत आहे.

याशिवाय माझ्या घरी आजी – आजोबा आहेत. ज्यांच्याशी माझे एक विशेष बंधन आहे. माझ्या आजी – आजोबांबरोबर मला वेळ घालवायला आवडतो. ते मला नेहमी माहितीपूर्वक गोष्टी सांगतात. माझ्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करतात.

माझे व्यक्तिमत्व

मी एक शांत आणि सौम्य मुलगी आहे. मी सर्वांसाठी एक आदरणीय आणि सुसंस्कृत मुलगी आहे. मला नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदत करायला खूप आवडते.

मी नेहमीच काळजी घेते की, माझ्या बोलण्याने किंवा माझ्या केलेल्या कामामुळे इतर कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ नये.

माझ्या सवयी

माझी अशी एक सवय आहे की, मला माझी सर्व कामे ही वेळेतच पूर्ण करायला आवडतात. मला झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे, त्यांना खत – पाणी घालणे या सर्व गोष्टी करायला आवडतात. मला माझा नियमित दिनक्रम पाळायला आवडतो.

माझे स्वप्न

मला माझ्या जीवनामध्ये एक डॉक्टर बनायच आहे. डॉक्टर बनणे हे माझे स्वप्न आहे. मला डॉक्टर बनून गरीब, पीडित आहि असहाय्य लोकांवर मोफत उपचार करायच आहे. जेणेकरून लोकांना नवीन जीवन मिळू शकेल. तसेच ते आपले जीवन हे आनंदाने जगू शकतील.

माझा आवडता छंद

मला रिकाम्या वेळेत पुस्तके वाचते. मला गोष्टींची पुस्तके वाचायला खूप आवडतात. तसेच मला संगीत ऐकणे, टीव्ही पाहणे आणि अन्य प्रकारचे खेळ सुद्धा खेळायला आवडतात. मी आणि माझी भावंडे सुट्टीच्या दिवशी नदीच्या काठी फिरायला देखील जातो.

माझ्या आवडत्या गोष्टी

मला सर्वात जास्त आईस्क्रीम आणि डोसा खायला वाढतो. तसेच मला माझ्या आजीच्या हातच्या पुरण पोळ्या खायला खूप आवडतात.

माझी आजी मला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालते. तसेच माझे आजोबा कधी – कधी आईस्क्रीम खायला घेऊन जातात.

निष्कर्ष:

मी नेहमी एक आदर्श आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याच बरोबर मी समाजात एक चांगली व्यक्तिरेखा म्हणून आपली प्रतिमा निर्माण करेन.

Updated: December 14, 2019 — 9:17 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *