मेरा गाँव

माझे गाव मराठी निबंध – येथे वाचा Essay on My Village in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येक मुलाला परीक्षा संपली किंवा उन्हाळी सुट्टी पडली कि गावी जाण्याचे वेड लागते. काही मुलांचे आई – बाबा हे मुलांची सुट्टी लागण्यापूर्वीच गावी जाण्यासाठी तिकिटे काढून ठेवलेली असतात. तसेच आई – बाबांची लगबग सुद्धा चालू असते.

गावातील आजी – आजोबांसाठी, काका – काकी, आत्यासाठी आणि सर्व चुलत भावंडांसाठी काही ना काहीतरी घेतलेले असते. फक्त वात बघत असतो हे गावी जायची तारीख कधी जवळ येते त्याची.

माझे गाव

गाँव की सुंदरतागावाला जायची उत्सुकता ही सगळ्यांचा लागलेली असते. गाव हे इतके सुंदर असते कि, एकदा का गावाला गेले कि, शहरात परत येऊ नको असे वाटते. त्याच प्रमाणे माझे गाव हे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एका डोंगरावर माझे छोटस गाव आंबोली हे वसलेल आहे.

आंबोली हे आमचे गाव एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध सुद्धा आहे. त्यांमुळे गाव आणि शहर यांचा संगम झाल्यासारखा वाटतो. आमचे गाव हे बेळगाव आणि गोवा महामार्गावर लागते. आम्हाला गावी जाताना नागमोडी वळणांचा घाट चढावा लागतो.

बसमधून ही नागमोडी वळणे पाहताना खूप छान वाटते. हा घाट चढून गेल्यावर एक छोटास देऊळ लागत. त्याला ‘पूर्वीचा वस’ असे म्हटले जाते. गावातील लोकांचे म्हणणे आहे कि, हा देव या घाटातून येणाऱ्या – जाणाऱ्या माणसांची रक्षा करतो.

तसेच या गावातील लोक कोणत्याही शुभ कार्याला जाताना या देवाच्या पाया पडून पुढे जातात. आम्हाला आईने शिकवले आहे कि, कोणतेही मंदिर दिसले तरी आपण सर्वात प्रथम त्या देवाला हात जोडले पाहिजेत.

गावचे वर्णन

गाँव की पंचायत घाट संपताच थोड्या वेळाने आमचे गाव येते. बस येण्या आधीच सर्वजण आमची बस स्टँडवर वाट बघत असतात. आमचे मन सर्वाना भेटण्यासाठी खूप आतुर झालेले असते. घरी गेल्यानंतर काकू माठातील थंडगार पाणी प्यायला घेऊन येते.

त्याच बरोबर आम्ही हात – पाय धुवून नष्ट करून सर्व भावंडे गावात फिरायला जातो. सर्वांच्या घरी जाऊन भेटतो. तसेच सर्वांच्या घरी काही ना काही काहीतरी खायला दिले जाते.

हिरण्यकेशी ( महादेवाचे मंदिर )

हिरण्यकेशीदुसऱ्या दिवशी आम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत ठरवतो. आमच्या काकाला माहित असते कि, आम्हाला फिरायला खूप आवडते. माझी आई सांगते कि सर्वात आधी देवाचे दर्शन घ्यायचे मग कुठे ते फिरा.

आमच्या गावामध्ये खूप देवळे आहेत. पण त्या सर्वांमध्ये हिरण्यकेशी हे महादेवाचे मंदिर सर्वात महत्वाचे आहे. या मंदिरासमोर एक पाण्याचे कुंड आहे.

त्यात नेहमी पाणी भरलेले असते. या पाण्यात डुबकी मारून त्यानंतर देवाचे दर्शन घेणे ही प्रथा आहे. हे एक छोटस देऊळ आहे पण त्यामधील सर्व मुर्त्या या पाण्यामध्ये असतात.

या मंदिराच्या बाजूला एक मोठी गुहा आहे आणि त्या गुहेत एकामध्ये एक अशा सात गुहा आहेत. त्या सर्व निमुळत्या आहेत आणि सातव्या गुहेपर्यंत कोणीही व्यक्ती पोहचू शकत नाही.

आंबोली थंड हवेचे ठिकाण

आंबोलीआमचे आंबोली हे गाव हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. कोकणातील इतर गावांपेक्षा आमचे आंबोली हे गाव खूप थंड गाव आहे. इथे उन्हाळ्यात सुद्धा पंखा लावायची गरज भासत नाही.

कारण माझ्या गावात पावसाळ्यात वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. तसेच या आंबोली घाटात सुंदर हिरव्यागार दऱ्या आणि लाल तोंडाची माकडे सुद्धा पाहायला मिळतात.

कावळे शेतचे ठिकाण

माझे सर्वात आवडते स्थान म्हणजे – कावळे शेतचे ठिकाण. इथे उभे राहून खोल दरी पाहायला मिळते. ही दरी पाहताना असे वाटते कि, आपण कोणत्यातरी दुसऱ्या विश्वातच आलो आहे.

पावसाळ्यात इथे खूप मजा येते. इथून पाण्याचे मोठ – मोठे प्रवाह वाहताना दिसतात. त्यानंतर आम्ही गावातल्या मोठ्या धबधब्यावर जातो. तिथे अनेक पर्यटक फिरायला येतात.

जेव्हा आम्ही त्यांना सांगतो कि हे आमचे गाव आहे तेव्हा ते म्हणतात कि, खरच तुम्ही खूप भाग्यवान आहात जे इतक्या सुंदर गावात जन्माला आलात.

असे माझे सुंदर आणि आकर्षक गाव आहे. म्हणून मला माझे आंबोली हे गाव खूप खूप आवडते.

Leave a Comment