प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान नेत्यांचा देश मानला जातो. या देशामध्ये बरेच काही महान नेता होऊन गेले. त्यापैकी एक आहेत – डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. कलाम यांनी वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारत देशाचे राष्ट्रपती इ. सर्व पदावर कार्य केले.
त्यांनी इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य केले म्हणून ते सर्व लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदाच्या ५ वर्षाच्या काळात भारतीय लोकांच्या मनामध्ये मानाचे स्थान मिळवले.
जन्म–
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे माध्यम वर्गात झाला. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन अब्दुल होते.
त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे – आणण्याचे काम करत होते. परंतु लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले. त्यावेळी त्यांनी वर्तमान पत्रे विकून आणि लहान – मोठी काम करून घरी हातभार लावला. त्यांचे बालपण कठीण प्रसंगातून गेले.
शिक्षण
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपले प्राथमिक शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत असताना त्यांना गणित या विषयी भरपूर आवड होती. त्यानंतर त्यांनी तिरुचिपल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.
कलाम यांनी भौतिक शास्त्रात बी. एस्सी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी चेन्नई मधील इंस्टीट्यूट ऑफ टेकनोलोजि मध्ये प्रवेश घेतला. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याचे स्वपन होते.
कलाम यांचे कार्य
डॉ. ए पी जे पाबद्दल कलाम यांचा संबंध सन १९५८ ते १९६३ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी आला. कलाम यांनी भारतीय सेनेसाठी छोटे – छोटे हेलीकॉप्टर बनवण्यास सुरुवात केली. सन १९६३ मध्ये त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासाच्या कामामध्ये सहभागी होऊ लागले. कलाम पुन्हा इंदिरा गांधीच्या काळात क्षेपणास्त्र विकासासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये आले.
तेव्हा पासून त्यांनी स्वदेशात सुद्धा क्षेपणास्त्र बनवण्याचा ध्यास घेतला. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्रच्या यशस्वी चाचणीमुळे कलाम यांचे संपूर्ण जगभरात कौतुक झाले. कलाम यांना स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्याची जिद्द तेव्हापासून होती..
राष्ट्रपती पदावर कार्य
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना १० जून, २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी यांचे नाव सुचवण्यात आले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे ते भारत देशाचे राष्ट्रपती बनले. ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्यांनी हे पद २५ जुलै, २००२ पासून २५ जुलै २००७ पर्यंत निभावले.
पुरस्कार
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अन्य पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांना सन १९८१ मध्ये पदमभूषण, सन १९९० मध्ये पदमविभूषण आणि सन १९९७ मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.
स्विझर्लंडने हि त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दाखल घेऊन ज्या दिवशी त्यांनी स्विझर्लंडला भेट दिली तो दिवस ‘विज्ञान दिवसच्या‘ रूपाने साजरा केला जातो.
निष्कर्ष:
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला अवकाश क्षेत्रात पुढे नेणारे तसेच मिसाईल आणि क्षेपणास्त्र स्वयं बनवणारे, देशाच्या तरुणांना – युवकांना देशकार्यासाठी जोडणारे, विद्यार्थ्यांमध्ये रमणारे त्यांना मार्ग दाखवणारे कलाम चाचा होते. डॉ कलाम हे देशाच्या युवकांसाठी सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.