प्रस्तावना :
गुलाब ज्याला इंग्रजी मद्धे रोझ असे म्हणतात. हे अतिशय सुन्दर असे फुल आहे. जे प्रत्येकाला आवडते. हे फुल विविध रंगामंध्ये आढळते. याचा सुवास खूप मन लुभावणारा असतो.
गुलाबाचे प्रकार
गुलाबाचे बघायला गेले तर १०० जाती आहेत. गुलाब हे लाल, पिवळ्या, गुलाबी आणि सफेद रंगामध्ये उमललेले आपणास माहित आहेत. आपण गुलाबचे झाड घरामध्ये कुंडी मध्ये सुद्धा उगवू शकतो.
याचे तीन प्रकार म्हणजे देशी, रानटी, आणि कलमी असे तीन प्रकार आहेत. गुलाब हे संऊष्णते मध्ये उगवते फुल आहे. याचे देठ ७ मीटर उंची पर्यंत वाढू शकते.
गुलाबाचे उपयोग
आता आपण पाहू कि गुलाब हे फुल किती उपयोगी आहे. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. कारण आपण आपले प्रेम गुलाब देऊन व्यक्त करतो. कोणाला काय उपहार द्यायचा हे सुचत नसेल तर आपण गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम दाखवितो. लग्न समारंभ या मध्ये गुलाबाचे गुलदस्ते उपहार म्हणून देतो.
तसेच, गुलाबाच्या रंगावर पण एक छान समजूत आहे कि, सफेद गुलाब हे शांती चे प्रतीक आहे, पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक आहे तर लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
गुलाब हे अंतर बनविण्यासाठी पण वापरले जाते. याचा सुवास इतका सुंदर असतो कि मन मोहक करून टाकतो. गुलाबाला फुलांचा राजा म्हंटले जाते. हे काही खोटे नाही.
गुलाबाचे घरगुती उपयोग
गुलाब हे आपण खाण्यामध्ये सुद्धा वापरतो.याचा गुलकंद बनविला जातो. जो पान खाण्यामध्ये पण आपण वापरतो. तसेच सुगंधी द्रव म्हणजे अत्तर, परफ्युम बनविण्यात पण गुलाबाचा उपयोग केला जातो. गोड पण जे बनविले जाते त्यात खासकरून गुलकंद मिसळला जातो.
तसेच गुलाब हे सौंदयाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या पाकळ्या आपण अश्याच पण खाऊ शकतो. ज्याने त्वचा उजाळ होण्यास मदत होते.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाब जल बनविले जाते, जे डोळ्यात घालण्यास उपयुक्त असते. त्याने डोळे साफ होतात आणि डोळ्यातील घाण निघून जाते. इतके हे गुलाब गुणकारी आहे.
गुलाबाची किमया
गुलाब हे फुल इतके सुंदर आहे कि देवाच्या पायाशी सुद्धा आहे. देवाला गुलाबाचे फुल चढविले जाते. गुलाब हे फुल दिसायला जितके सुंदर आहे तितकेच ते उपयोगी पण आहे. या गुलाबाच्या फुलावर मधमाश्या आपले मध गोळा करतात, तर भवरा त्यावर सारखा फिरत राहतो.
इतके त्याचे रूप सुंदर आहे. या गुलाबाच्या फुलावर कित्येक कवींनी आपल्या कविता रचल्या आहेत. तर सिनेमा मध्ये या गुलाबाच्या फुलाला आपल्या प्रेयसीची उपमा दिली जाते. खरंच हा फुलांचा राजा मानतात हे खरे आहे.
या गुलाबाला काटे असतात पण देवाने कदाचित याच्या सुंदरतेचा कोणी नुकसान करू नये म्हणून याला काटे दिले असतील.
नेहरू आणि गुलाब
आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा गुलाबाचे फुल फार आवडायचे. आपण त्यांच्या फोटो मध्ये पहिले असेल कि, त्यांच्या खादि कुर्त्यावर नेहमी गुलाबाचे फुल ते लावत असे.
स्त्रियांचे आवडते गुलाब
पूर्वीच्या काळात सुद्धा आणि आता सुद्धा स्त्रिया, मुली आपल्या केसात नेहमी गुलाबाचे फुल मळतात. त्याचा सुवासच इतका सुंदर आहे कि आपण त्यांच्या बाजूने गेलो तरी गुलाबाचा सुवास मागे वळून पाहण्यास मजबूर करतो.
आयुर्वेद आणि गुलाब
योगी आणि मुनी यांनी गुलाबाचे फुल हे नेहमी आपल्या आयुर्वेदात उपयोगी आहे हे सांगितले आहे.
गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्याची पूड करून ठेवली आणि रोज सकाळी पाण्यासोबत घेतली तर त्वचा विकार आणि आपले हृदय स्वस्थ राहू शकते. इतके गुणकारी असे हे गुलाबाचे फुल आहे.
सारांश:
गुलाब हे प्रेमाचे प्रतीक तर आहेच, पण आयुर्वेदात सुद्धा त्याचा मान मोठा आहे.