प्रस्तावना:
अनेक खेळ खेळले जातात. पण सर्वानाच सर्व खेळ आवडतातच नाही. क्रिकेट, कब्बडी, खो-खो, फुटबॉल , टेनिस खेळ खेळले जातात. पण माझा आवडता खेळ आहे कबड्डी.
कबड्डी खालच्या मैदानाची माहिती
हा खेळ भारतात खेळाला जायचा पण आता तो इतका जगप्रसिद्ध झाला आहे कि, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. आणि खूप आवडीने खेळाला जातो. हा खेळ फक्त मुले खेळत असत. पण आता मुलीसुद्धा या खेळ मध्ये खूप पुढे आल्या आहेत. हा मैदानी खेळ आहे, जो मातीत एक विशिष्ट चौकोनात खेळाला जातो, १२.५० मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.
या मध्ये मध्यभागी एक सामान अंतराची रेघ असते ज्या मध्ये दोन गट सामना खेळू शकतात. आणि त्याच्या बाजूलाच १ मीटर अंतराची रेघ असते ज्याला लॉबी म्हणतात. या खेळाचे पण काही नियम आहेत.
दोन्ही गटात १२-१२ खेळाडू असतात, ज्यात सामन्यांमध्ये फक्त ७-७ खेळाडू फक्त खेळू शकतात. जर ७ खेळाडू पैकी कोणाला इजा झाली तर बाहेरील खेळाडू ला त्याच्या जागी खेळायला आत घेतले जाते. खेळाला पंच निवडलेले असतात जे गुण लिहण्याचे व मोजण्याचे काम करत असतात.
खेळाची माहिती
त्यातील एक पंच नाणे फेक करून खेळ सुरवात करतात. या मध्ये जो नाणे फेक जिंकेल त्याला कोट निवडण्याची व कोणता बाजू खेळायची मुन्हा असते. दोन्ही गटामध्ये प्रत्येक खेळाडू ला रेड दिली जाते, ज्यात तो आपला एक खेळाडू दुसऱ्या गटात जाऊन जास्तीस जास्त गन आणण्याचा व दुसऱ्या गटातील खेळाडू त्याला गुण नाही मिळावे म्हणून करतात.
हा खेळ २०-२० असतो. दोन्ही गटाला २०-२० मिनिटांची वेळ दिलेली असते. जर या खेळात दोन्ही गटाचे गुण सारखे झाले तर पुन्हा दोनी गटाला ५-५ डाव दिले जातात आणि त्यातून विजेता संघ जातो.
मला का आवडतो हा खेळ
या साठी मला हा खेळ आवडतो कारण लहानपण पासून मी पहिले आमच्या घराच्या जवळ एक मैदान होते तिथे काही मुले क्रिकेट, कब्बड्डी, खेळताना आम्ही पाहायचो. त्याच प्रमाणे मी आणि माझे मित्र सुद्धा घराच्या अंगणात हा खेळ खेळायचो. या बद्दल तर काहीच माहित न्हवते आणि लहान असल्यामुळे नुसते कबड्डी कबड्डी बोलून एक मेकाचे पाय खेचायचो.
त्या नादात कधी कधी कपडे सुद्धा फाटायचे, आणि मग घरी जाऊन आई चा मार.
कबड्डी विषयी प्रेम
जस जसे मोठे होत गेलो, तस तसे या खेळाची आवड वाढत गेली, आणि त्या साठी तो पूर्णपणे शिकता यावा म्हणून एक मंडळात जाऊन दाखल घेलता व त्याचा सराव सुरु केला. पुढे जसे हा खेळ खेळात राहिलो तसे त्या विषयी आधीक माहिती मिळू लागली.
जगप्रसिद्द खेळाला जाणारा हा खेळ
अर्जुन पुरस्कार, शिव छत्रपती पुरस्कार अश्या पुस्कारां विषयी खूप ऐकले होते, आणि ते मिळवण्याची इच्छा पण होती, पण त्या साठी खूप मेहनत आणि त्या साठी जीव ओतण्याची गरज होती. कारण मलाही हा पुरस्कार घेताना माझ्या परिवारांने अभिमानाने बोलले पाहिजे होते कि, हा आमचा मुलगा आहे.
कबड्डी खेळाचे फायदे
या मुळे शारीरिक क्षमाता वाढते, बुद्धी चपळता वाढते. धैर्य वाढते, हिम्मत वाढते, कारण दुसऱ्या गटात जाऊन आपल्याला कसे वाचवून गन घेता येईल याची धडपड होत असते.
माझे यश
आज मी अर्जुन पुस्काराने नावाजलेला नसलो तरी मी जे या खेळणे मिळवले ते आज अर्जुन पुरस्कार पेक्षाही खूप जास्त आहे. या खेळामुळे आज मी स्वतःला एक पूर्ण खेळाडू मानतो. माझा मी स्वतःचा एक मुलांचा व मुलीचा संघ उभा केला आहे, आणि ते हि माझ्यासारखे स्वतःला या खेळामध्ये झोकुन देत आहेत.
शीर्षक:
काही मिळविण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात.