प्रस्तावना:
एका वडीलांसारखी दुसरी कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात संघर्ष करू शकत नाही. एक वडीलच आपल्या सर्व अडचणी विसरून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतो. ते आपले जीवन जीवन संघर्ष करून संपूर्ण कुटुंबाचे पालन – पोषण करतो.
वडील हे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतात त्याच बरोबर नैतिक जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडत असतात. वडील बाहेरून आपल्याला कठोर दर्शवितो. परंतु वडिलांसारखा दयाळू कोणीच असू शकत नाही.
माझे बाबा
माझे बाबा हे जगातील सर्वोत्त्कृष्ट व्यक्ती आहेत. माझे बाबा हे माझ्यासाठी एक आदर्श आहेत. माझ्या बाबांचे नाव रामशंकर असे आहे आणि त्यांचे वय ५५ वर्ष इतके आहे. माझे बाबा एक परिपूर्ण वडील आहेत.
ते माझे चांगले बाबाच नाही तर एक मित्र सुद्धा आहेत. माझे बाबा खूप कष्टकरी आहेत. पूर्वी आमचे कुटुंब खूप गरीब होते. परंतु माझ्या वडिलांनी खूप कष्ट करून घरची परिस्थिती सुधारली. त्यामुळे आज मला चांगल्या शाळेत शिक्षण मिळू शकले आहे.
माझे बाबा घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते जास्त शिक्षण घेऊ शकले नाहीत. परंतु नेहमीच त्यांना वाटतं कि चांगला शिक्षण घेऊन एक चांगली व्यक्ती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मी माझ्या बाबांकडून यशाचा मंत्र शिकला आहे. ते मला नेहमी कार्य करतच राहायला सांगतात आणि कार्याचे मिळणारे फळ याच चिंता करायची नाही असं सांगतात.
संयम
माझ्या बाबांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे – संयम. ते आपली सर्व कामे संयम ठेवून करतात. तसेच ते आपला स्वभाव कधी गमावत नाहीत. प्रत्येक परिस्थिती अत्यंत धीर आणि संयम ठेवतात.
मी माझ्या बाबांकडून शिकलो आहे की, काहीही झाले तरी स्वतःवर नियंत्रण ठेवायचे. माझे बाबा शुल्लक गोष्टींवरून कोणत्याही व्यक्तीवर राग धरत नाही.
पैशांचा उपयोग
माझे बाबा मला पैशांचा योग्य वापर करायला सांगतात. कारण मी पूर्वी खूप पैसे वाया घालवत होतो. परंतु माझ्या वडिलांनी मला स्पष्टीकरण दिल्यापासून मी नेहमीच पैशांचा चांगल्या प्रकारे उपयोग करू लागलो.
माझे बाबा कुटुंबाचे पालन – पोषण करण्यासाठी कष्ट करतात आणि कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कधीही काही कमी पडू देत नाही.
धैर्यवान आणि समजदार
माझे बाबा एक शिस्त प्रेम करणारे व्यक्ती आहेत. ते नेहमीच सर्वाना शिस्तीचे पालन करायला शिकवतात. हे तसेच माझे बाबा हे खूप धैर्यवान आहेत.
ते कोणतेही कार्य करत असताना ते दैत्याने आणि समजदारीने करतात. म्हणून ते कोणत्याही कार्यात नेहमी यशस्वी होतात. माझ्या बाबांची दररोजची कार्य क्षमता पाहून मला धैर्य मिळते.
माझ्या बाबांचे हृदय खूप मोठे आहे. कारण ते आपल्या गरजा विसरून सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतात. जर कोणी चूक केली तर थोड्या वेळासाठी रागावतात आणि त्या व्यक्तीला क्षमा करतात.
जीवनामध्ये महत्त्व
आपल्या जीवनामध्ये आई – वडिलांचे स्थान हे सर्वात महत्वाचे असते. माझे वडील हे आपली कोणतीच समस्या घरात सांगत नाही. त्या उलट ते घरातील माणसांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतात. या सर्व गोष्टींमुळे माझ्या वडिलांचे मोठेपण अधिकाधिक वाढते.
या धरतीवर प्रत्येक मुलासाठी बाबा हे एक देवाचा चेहरा आहे. आपल्या मुलांना ते आनंद देण्यासाठी आपलं सर्व सुख विसरतात. ते आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात.
निष्कर्ष:
आपल्या जीवनात आई – वडील हे एका जुन्या वट वृक्षाप्रमाणे असतात. जो पर्यंत आपल्या डोक्यावर वडिलांचा हात असतो तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची आवश्यकता नसते.
म्हणून आपण सर्वानी कधी वडिलांचे संघर्ष विसरू नयेत. म्हणून माझे बाबा हे जगातील सर्वात महत्वाचे आहेत. मी माझ्या बाबांवर खूप – खूप प्रेम करतो आणि अशा माझ्या बाबांबद्दल मला खूप अभिमान वाटतो.