प्रस्तावना:
माझा भारत देश हा सर्वात महान आणि प्राचीन आहे. माझा भारत देश आपल्या संस्कृती आणि विविधतावाला देश आहे.
माझ्या भारत देशाची संस्कृती आणि सभ्यता ही सर्वात प्राचीन आहे. तसेच माझा भारत देश हा सर्व देशांचा मुकुट आहे. एक काळ असा होता या माझ्या भारत देशाला ‘सुवर्ण पक्षी’ असे म्हटले जात होते.
माझा भारत देश हा जगातील सर्वात सुंदर आणि प्रिय देश आहे. तसेच माझ्या भारत देशाचा जनसंख्या दृष्टीने जगात दुसरा क्रमांक लागतो.
भारत देशाची विविध नावे
वाचे येथै माझा देश वर मराठी निबंध – वाच येथे My Country Essay in Marathi
माझ्या भारत देशाला अनेक नावांनी ओळखले जाते. जसे कि हिंदुस्थान आणि इंडिया या नावाने ओळखले जाते. तसेच माझ्या भारत देशाला भारत हे नाव राजा दुष्यन्त आणि शकुंतला यांचा पुत्र भरत याच्या नावावरून पडले. त्याच प्रमाणे प्राचीन काली माझ्या भारत देशाला ‘आर्यव्रत’ या नावाने सुद्धा ओळखले जात असे.
विविध धर्माचे लोक
माझा भारत देश हा एक असा देश आहे, जिथे विविध धर्माचे, पंथाचे आणि जातीचे लोक राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध म्हणून या भारत देशाला धर्मनिरपेक्ष देश असे म्हटले जाते.
भारत देशाला स्वातंत्र्य
वाचे येथै प्रजासत्ताक दिन मराठी निबंध – वाचे येथे 26 January Essay in Marathi
यादिवशी माझ्या स्वतंत्र भारत देशाचे संविधान लागू झाले. त्याच प्रमाणे तिरंगा हे भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. या तिरंग्यातील तीन रंग जसे कि केशरी, सफेद आणि हिरवा हे विविधतामध्ये एकता दर्शवितात.
भारत एक कृषिप्रधान देश
अन्नाच्या दृष्टिकोनातून माझा भारत देश हा स्वावलंबी देश आहे. या देशामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात.
भारताचा भूगोल
माझा भारत देशाचा भूगोल सांगायचा तर उत्तर दिशेला गगनाला भिडणारा हिमालय पर्वत आहे. भारत देशाच्या मुकुटावरील हिमालय पर्वताच्या पर्वतरांग मुकुट जगभरातील लोकांना आकर्षित करते.
तसेच माझा भारत देश हा तिन्ही बाजूनी महासागरांनी वेढलेला आहे. भारत देशाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर,दक्षिणेस हिंदी महासागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. तसेच माझ्या भारत देशातून अनेक पावित्र्य नद्या वाहतात.
वाचे येथै स्वतंत्रता दिवस मराठी निबंध – वाचा येथे Swatantrata Diwas Essay in Marathi
गंगा ही भारत देशाची सर्वात पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. त्याच प्रमाणे यमुना, गोदावरी, नर्मदा, तापी, सतलज, कृष्णा या पवित्र नद्या वाहतात.
महान पुरुषांची भूमी
तसेच महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग यांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी या भारत भूमीला अधिक पवित्र बनविले आहे.
भारत देशातील पर्यटन स्थळे
माझ्या भारत देशात अनेक पर्यटन स्थळे आहेत. जिथे दरवर्षी हजारो पर्यटक देश – विदेश मधून भारतात येतात. जसे कि आग्ऱ्याच्या ताजमहाल, लाल किल्ला, कुतुब मिनार यांसारख्या ऐतिहासिक इमारती आहेत. ज्या संपूर्ण विश्वामध्ये सात चमत्कारांमध्ये मोजल्या जातात.
निष्कर्ष:
माझा हा भारत देश या सर्व थोर माणसांमुळे स्वतंत्र झाला आणि अशी ही थोर माणसे माझ्या देशाला लाभली. असा हा विविधतेने भरलेला माझा भारत देश मला खूप – खूप आवडतो आणि तो मला माझ्या जिवापेक्षा सर्वात जास्त प्रिय आहे. आजही माझा भारत देश विविध प्रकारच्या संकटांवर मात करून प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे.