माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Essay on My Best Friend in Marathi

प्रस्तावना:

मैत्री ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक महत्वाची भूमिका निभावते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात एक मित्राची किंवा मैत्रिणीची गरज असते.

मैत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल असणार प्रेम, आपुलकी आणि आदरभाव. मैत्रीशिवाय व्यक्तीचे जीवन हे निरर्थक आहे. कारण एक मित्र आपल्या सर्वात आवडत्या मित्राला आपले सुख – दुःख सांगतो.

मैत्री हे एक नातं आहे जे कुटुंबाशी किंवा रक्ताशी संबंधित नसून ज्यामध्ये सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो. म्हणून कार्य अर्थाने पाहिले तर मैत्री जीवन पूर्ण करते.

माझा मित्र

friend

माझे खूप सारे मित्र आहेत. परंतु त्या सर्व मित्रांपैकी राहुल हा माझा सर्वात आवडता मित्र आहे. राहुल हा एक अत्यंत हुशार आणि साधा मुलगा आहे.

त्याचा चेहरा हा हसरा आहे. राहुल नेहमी माझ्या सुख – दुःखात माझ्या सोबत असतो. तो कधी माझ्यावर विनोद सांगून हसतो तर कधी एखादी मजेशीर गोष्ट सांगून हसतो. तो आमच्या घरी कधी – कधी येतो.

राहुल माझ्या घरी आल्यावर माझी आई मला सांगते की, बघ तुझा हसणारा मित्र आलाय. राहुलचा चेहरा हा नेहमी हसरा असतो.

हुशार विद्यार्थी

Friendship

राहुल हा एक हसताच मुलगा नाही तर तो एक हुशार विद्यार्थी सुद्धा आहे. त्याची एकाग्रता ही अभ्यासाच्या वेळी केली जाते.

तो संपूर्ण वर्गामध्ये हुशार आहे आणि ते नेहमी प्रथम क्रमांकावर येतो. राहुल गणित विषयाचे प्रश्न ५ मिनिटांमध्ये सोडवतो. आमच्या शाळेतील शिक्षक हे त्याच्या गुणांचे कौतुक करतात.

गणित हा विषय

गणित हा विषय

आज मला राहुलच्या मैत्रीमुळेच गणितासारखा कठीण विषय सोपा वाटू लागला आहे. मला  गणित हा विषय अत्यंत कठीण वाटत असे.

परंतु राहुल सोबत राहून त्याने मला गणिते कशी सोडवायची हे सांगितलं. त्यामुळे आता मी अत्यंत चांगल्या प्रकारे गणित सोडवायला लागलो. अशा बऱ्याच गोष्टींसाठी मी त्याचे आभार मानतो.

राहुल हा माझा आवडता मित्र आहे कारण त्याचे आणि माझे विचार हे एकसारखे आहेत. तो एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. परंतु मनाने खूप चांगला आहे.

व्यायामाची सवय

Yoga

राहुल हा सकाळी लवकर उठतो आणि आपल्या शेतामध्ये फिरायला जातो. तसेच तो मोकळ्या शेतात हलका व्यायाम देखील करतो.

कधी – कधी मी पण त्याच्या सोबत असतो. त्याच्यामुळेच मला सकाळी – सकाळी उठून फिरायची आणि व्यायाम करायची सवय लागली.

तो मला नेहमी म्हणतो की, सकाळी लवकर उठून फिरणे किन्वा व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी योग्य असते. तसेच सकाळी आपल्याला शुद्ध हवा मिळते.

जातिभेदाला विरोध

जाती भेदभाव

आम्ही दोघे सुद्धा जाती आणि धर्मच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावाला विरोध करतो. तसेच माझा मित्र हा, दुर्बल असहाय्य, वृद्ध आणि गरीब लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो. तो स्वतः गरीब असून सुद्धा त्याच्या मनात स्वार्थाची भावना कधीच नसते.

चित्रकला आणि कविता

राहुलला चित्रकलेची खूप आवड आहे. तसेच मला कविता लिहिण्याची खूप आवड आहे. मी लिहिलेल्या कविता राहुलला खूप आवडतात. त्याच प्रमाणे त्याने काढलेली चित्रे मला सुद्धा खूप आवडतात. त्याने काढलेली काही चित्रे ही माझ्या घराच्या भिंतीवर लावली आहेत. तसेच राहुलने अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

निष्कर्ष:

मला माझ्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे की, आमची मैत्री आयुष्यभर तशीच राहील. आमची मैत्री ही कधीच संपणार नाही ती अशीच सदाहरित राहील. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला राहुल सारखा चांगला मित्र मिळाला.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *