प्रस्तावना:
मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे आणि त्यामुळे त्याचे अनेक मित्र असतात. प्रत्येक व्यक्तीचे खूप सारे मित्र असतात. परंतु त्या सर्व मित्रांपैकी सर्वात प्रिय मित्र हा एकाच असतो.
कारण आपण आपल्या प्रिय मित्रावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो. म्हणून मैत्रीचे नाते हे एक असे नाते आहे जे रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासावर जास्त टिकून असते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मित्रता ही सर्वात महत्वाची भूमिका निभावते.
कारण एक मित्र आपल्या प्रिय मित्राला आपले सुख – दुःख आणि अडचणी सांगतो. तसेच तो आपल्या दुःखाचे समर्थन करतो. जेव्हा आपण कोणत्याही संकटात असतो तेव्हा तो आपल्या पाठीशी अगदी खंभीरपणे उभा राहतो.
माझा प्रिय मित्र
माझे खूप सारे मित्र आहेत पण त्या सर्व मित्रांपैकी अनुराग हा माझा सर्वात आवडता आणि जिवलग मित्र आहे. आम्ही दोघे लहान पणापासून एकाच वर्गात शिकत आलो आहोत. अनुराग हा एक आदर्श विद्यार्थी आहे आणि तो वर्गात सर्वात आघाडीवर असतो.
त्याचा स्वभाव एकदम शांत आणि सरळ आहे. तो कधी कोणाशी भांडत नाही. जेव्हा आंहा दोघे शाळेत जायचो तेव्हा तो रोज संध्याकाळी माझ्या घरी येत असे. आम्ही दोघे एकत्र अभ्यास करायचो आणि खेळायचो सुद्धा. अनुरागची आई माझ्यावर खूप प्रेम करते.
अनुरागचे कुटुंब
अनुरागच्या कुटुंबात त्याचे आई – वडील आणि तो राहतो. अनुरागला कोणी भाऊ – बहीण नाहीत. म्हणून तो माझ्या भावंडाना आपले लहान भाऊ मानतो आणि त्याला माझा लहान भाऊ खूप आवडतो.
कधी – कधी मी सुद्धा अनुरागच्या घरी जातो. अनुरागची आई मला आपल्या मुलाप्रमाणेच मानते. आमच्या गावामध्ये एक छोटीशी नदी आहे. त्या नदीवर दर रविवारी आम्ही फिरायला जातो.
आम्ही दोघे एकदम घरा – घराजवळ राहतो. त्यामुळे आम्ही लहान पणापासून चांगले मित्र आहोत. आम्ही दोघेजण सुरुवातीच्या शिक्षणाद्वारे जोडले गेले आहोत.
एके दिवशी मला खूप ताप येत होता आणि माझी हालत बघून अनुराग रडायला लागला. तो २ दिवस माझ्यासाठी शाळेत गेला नाही. आम्ही दोघे एकमेकांबद्दल खूप होते . त्यामुळे आमच्या दोघांची मैत्री ही आणखीनच मजबूत होते.
कॉलेजचे शिक्षण
आम्ही दोघेजण एकाच महाविद्यालयात शिकलो. परंतु कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी आम्ही दोघांनी वेगवेगळे विषय निवडलेत. त्यामुळे आम्ही दोघेही वेगवेगळ्या वर्गात शिकू लागलो. परंतु आम्ही कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून एकत्रच घरी परतलो.
मजेदार मित्र
अनुराग हा खूप मजेदार मित्र आहे. मला कविता लिहिण्याची आवड आहे आणि अनुरागला माझ्या कविता खूप आवडतात. तो माझ्या कविता खूप काळजीपूर्वक ऐकतो.
त्याच प्रमाणे अनुरागला चित्रकलेची खूप आवड आहे आणि तो खूप सुंदर चित्रे काढतो. त्याने काढलेली काही चित्रे मी माझ्या घराच्या भिंतीवर लावली आहेत. तसेच अनुरागने चित्रकला स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
प्रेरणास्रोत
अनुरागने सारे शब्द मला खरोखरच खूप प्रेरणा देतात. तो मला सांगतो कि ज्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट केलेत आणि आपल्याला मोठं करून घडवलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगले कार्य केलं पाहिजे.
सुरुवातीच्या शिक्षणाच्या वेळी माझा अभ्यास चांगला नव्हता. परंतु अनुराग बरोबर राहिल्याने माझे शिक्षण खूप सुधारले. आजही तो माझे करियर घडविण्यासाठी माझ्यासाठी एक प्रेरणास्रोत आहे. अनुराग आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतो आणि मी सुद्धा तसेच करावे अशी त्याची इच्छा असते.
निष्कर्ष:
माझा पूर्ण विश्वास आहे की आमची दोघांची मैत्री ही अशीच कायम राहील. आमची मैत्री कधी तुटणार नाही ती सदाहरित आहे. म्हणून मला या मित्राचा आणि मैत्रीचा खूप अभिमान आहे.