माझा आवडता मित्र मराठी निबंध – वाचा येथे Essay on My Best Friend for Class 6 in Marathi

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मैत्री ही खूप महत्वाची असते. मैत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल असणारा आदर, प्रेम आणि आपुलकी. एक मित्रांशिवाय आपले जीवन हे अधुरे आहे.

एक चांगला हा आपल्या सुख – दुःखात आपल्याला साथ देतो. जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असतो तेव्हा तो आपल्या पाठीशी खंभीरपणे उभा राहतो. तसेच तो आपल्या समस्या दूर करतो आणि सांत्वन देतो.

माझा आवडता मित्र

अनुराग हा माझा आवडता आणि जिवलग मित्र आहे. आम्ही दोघे लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होतो. तो एक आदर्श विद्यार्थी आहे. तो सर्वांशी अगदी चांगल्या प्रकारे आणि प्रेमाने बोलतो.

तो कधी कोणाशी भांडत नाही. जेव्हा आम्ही दोघे शाळेत जायचो तेव्हा संध्याकाळी मी त्यांच्या घरी जात असे. त्याची आई मला आपल्या मुलाप्रमाणे मानते आणि खूप प्रेम करते.

अनुराग सुद्धा माझ्या घरी येत असे. अनुरागला कोणी बहीण – भाऊ नाहीत. म्हणून त्याला माझे लहान भाऊ आवडतात.

आमच्या गावात एक छोटीशी नदी आहे. तिथे आम्ही दोघे दर रविवारी दुपारी नदीच्या काठावर फिरायला जातो. अनुरागला चित्रकला खूप आवडते. तो खूप सुंदर चित्रे काढतो.

जसा एक मित्र नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. त्याच प्रमाणे अनुराग सुद्धा माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी राहतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो.

आमच्या दोघांचं घर हे जवळ – जवळ आहे. म्हणून आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत. आम्ही दोघे आमच्या सुरुवातीच्या शिक्षणाद्वारे जोडलेले आहोत.

एके दिवशी मला खूप ताप येत होता. मी आजारी आहे हे पाहून अनुराग रडू लागला आणि तो दोन दिवस शाळेत गेला नाही. आम्ही दोघे एकमेकांची खूप काळजी घेतो. त्यामुळे आमच्या दोघांची मैत्री ही आणखीनच मजबूत होते.

मजेदार मित्र

अनुराग हा एक खूप मजेदार मित्र आहे. मला कविता लिहिण्याची खूप आवड आहे आणि तो मझ्या कविता अगदी काळजीपूर्वक ऐकतो. मी लिहिलेल्या कविता त्याला खूप आवडतात.

तसेच त्याने काढलेली चित्रे सुद्धा मला फार आवडतात. अनुरागने काढलेली चित्रे मी माझ्या घराच्या भिंतीवर लावली आहेत. त्याच बरोबर त्याने अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये पुरस्कार सुद्धा प्राप्त केले आहेत.

प्रेरणास्रोत

माझा प्रिय मित्र अनुरागचे शब्द खरोखरच मला प्रेरणा देतात. तो म्हणतो कि, ज्या आई – वडिलांनी आपल्याला घडवलं आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगले कार्य केले पाहिजे. सुरुवातीच्या काळात शिक्षणाच्या वेळी मी अभ्यासामध्ये फारसा चांगला नव्हता.

परंतु अनुराग सोबत राहून माझे शिक्षण फार सुधारले. त्याच बरोबर मी मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केली. आजही माझे करियर घडविण्यासाठी तो माझ्यासाठी एक प्रेरणा आहे.

कठोर परिश्रम  

अनुराग आपले स्वप्न पूर्ण कारण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तसेच तो मला सुद्धा तास करायला सांगतो. त्याचे सहकार्य मला माझे ध्येय प्राप्त करण्यासाठी नक्कीच मदत करेल. त्याचे कुटुंब आणि माझे कुटूंब हे सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात.

निष्कर्ष:

माझा पूर्ण विश्वास आहे की, आमच्या दोघंही मैत्री ही अशीच कायम राहील. तसेच आम्ही दोघे एकमेकांच्या विचारांचे कौतुक करतो. आमची मैत्री कितीही काही झालं तरी संपणार नाही. ती एक सदाहरित आहे. असे म्हटले जाते की एक खरा मित्र मित्र म्हणजे देवाकडून मिळालेली अमूल्य भेट आहे. मला या मित्र आणि मैत्रीचा खूप अभिमान आहे.

Updated: दिसम्बर 13, 2019 — 1:04 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *