mother teresa

मदर टेरेसा मराठी निबंध – वाचा येथे Essay on Mother Teresa in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपली भारत भूमी ही महान पुरुषांची आणि स्त्रियांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भारत भूमीवर अनेक महान नेत्यांचा आणि स्त्रियांचा जन्म झाला आहे. या सर्वांनी या देशासाठी अनेक कार्य करून आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.

जसे की काही या देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढले, तर काहींनी समाज कार्य करून लोकांना नवीन मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी आपले संपूर्ण आयुष्य हे लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. अशा या सर्व महान व्यक्तीसारखी एक आहे ती म्हणजे – मदर टेरेसा.

जी केवळ गरीब लोकांच्या जीवनासाठी आयुष्यभर झटत राहिली. मदर टेरेसा ने आपले संपूर्ण जीवन हे दुसऱ्यांची सेवा करण्यात घालविले. म्हणून मदर टेरेसा आपल्या महान कार्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

जन्म

mother teresa मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट, १९१० साली मॅसेडोनियाची राजधानी असलेल्या स्कोप्जे या शहरात झाला. मदर टेरेसा हिचे संपूर्ण नाव अगनेस गोंझा बोयाजिजू असे होते. गोंझा या शब्दाचा अर्थ अल्बेनियन भाषेमध्ये ‘फुलाची कळी’ असा होतो.

ही एक अशी कळी होती जिने आपले संपूर्ण आयुष्य वेचून गरीब आणि अत्याचार लोकांच्या जीवनात आनंद भरला. तिच्या वडिलांचे नाव ‘निकोला बोयाजु’ आणि आईचे नाव ‘द्राणा बोयाजु’ असे होते.

जीवन परिचय

Mother Teresa मदर टेरेसा ही पाच बहिणींमध्ये सर्वात धाकटी बहीण होती. ती एक सुंदर, कष्टकरी आणि अभ्यासू मुलगी होती. तिला वाचण्याचा आणि गाणी गाण्याचा छंद होता.

मदर टेरेसा हिच्या जीवनाचा एकच मुख्य उद्देश होता आणि तो म्हणजे असहाय्य व गरीब लोकांची मदत करणे. मदर टेरेसा ने पारंपरिक कपड्यांचा त्याग करून निळ्या रंगाचा काठ असलेली साडी घालायचा निर्णय घेतला आणि मानव जातीसाठी कार्य करण्यास सुरुवात केली.

नन बनण्याचा निर्णय

Mother Teresa मदर टेरेसा ने वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित केला. संपूर्ण विश्वामध्ये निस्वार्थपणे गरीब लोकांची सेवा करणारी ही सर्वोच्च व्यक्ती होती. तिने आपल्या वयाच्या १८ व्या वर्षी ‘नन’ बनण्याचा निर्णय घेतला.

ती आयर्लंड मध्ये गेली आणि ‘लॉरेटो नन्सच्या’ केंद्रात सहभागी झाली. सन १९२९ मध्ये लोरेटो अटेली स्कूलमध्ये शिक्षक होण्यासाठी कलकत्ता येथे गेली. तिथे राहून तिने शिक्षिका म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली.

आश्रमांची स्थापना

मदर टेरेसा इनका जीवनसन १९६० साली मदर टेरेसा ने महारोग्यांसाठी ‘शांतीनगर’ या आश्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘निर्मल हृदय’ आणि ‘निर्मला शिशु भवन’ अशा दोन आश्रमांची सुरुवात केली.

निर्मल हृदय या आश्रमात आजारी व पीडित लोकांची सेवा करण्यात आली. तर निर्मला शिशु भवन या आश्रमात अनाथ आणि बेघर मुलांची मदत करण्यात आली.

मिशनरीज ऑफ चॅरिटी ब्रदर्स

मिशनरीज ऑफ चॅरिटी ब्रदर्सतसेच मदर टेरेसा ने मिशनरी ऑफ चॅरिटी ब्रदर्स हा आश्रम काढला आणि याच्या अनेक शाखा देखील आहेत.

आज देश – विदेशात सुद्धा या आश्रमाच्या शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये ४५० ब्रदर्स, ५००० सिस्टर्स आणि ६००० मिशन स्कूल्स व धर्मशाळा १२० देशात विस्तारल्या आहेत.

पुरस्काराने सन्मानित

मदर टेरेसा हिला मानवतेची सेवा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. सन १९६२ साली समाज सेवा आणि लोककल्याणासाठी ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच १९८० साली भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांनी गरीब लोकांची मदत केल्याबद्दल त्यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला.

निष्कर्ष:

मदर टेरेसा ही खरोखरच दयाळू, सेवा आणि आपुलकीची मूर्ती होती. आजही संपूर्ण जगामध्ये त्यांना शांतीचे प्रतीक मानले जाते.

ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज सेवा करण्यासाठी वाहिले. मदर टेरेसा आज आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या मिशनरी आजही सामाजिक कार्य करण्यातही कार्यरत आहेत.

Leave a Comment