आई मराठी निबंध – वाचा येथै Essay on Mother in Marathi Language

प्रस्तावना:

आई हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक मूल या जगात आल्यावर सर्वात प्रथम घेत. आई आणि वडील या दोघांमध्ये ईश्वराचं रूप आहे.

म्हणून म्हटलं आहे कि, ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही’. कारण आईशिवाय कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही.

जर आईच नसेल तर या धरतीवर आपले अस्तित्व नसते. ईश्वर हा प्रत्येक मुलासोबत राहू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.

आई हा शब्द खूप सोपा आहे. परंतु या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं आहे. आई ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ रचना आहे. म्हणून आईला ‘विश्वाची जननी’असे म्हटले जाते.

आई म्हणजे – Grandmother

आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झरा आहे. आई ही एक कल्पवृक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत कोरलेली दोन अक्षरे आहेत.

आई म्हणजे योग्य संस्कार करणारी आणि आपापल्या जीवनाचा सर्वात पहिला गुरु होय. या आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात.

त्याग आणि समर्पण

Mother Esaay in Hindi 2 आई ही एक अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांसाठ आपलं सर्वस्व अर्पण करते. ती आपल्या मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार करते आणि त्याला सुपीक जमिनीसारखी बनवते.

आईला कोणत्याही प्रकारची धन – दौलत नको असते तिला फक्त मुलांच्या प्रेमाची गरज असते. आई ही नेहमी आपल्या कुटुंबासाठी झटत असते. म्हणून आईसारखे सरपण आणि त्याग दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकत नाही.

आई आणि ईश्वर

Mother Esaay in Hindi 1 आईचे प्रेम मिळविण्यासाठी या धरतीवर ईश्वराने सुद्धा जन्म घेतला आहे. आईच्या प्रेमाचे उदाहरण स्पष्ट केले आहे. जसे कि भगवान श्रीकृष्ण यांनी या धरतीवर जन्म घेतला आहे. भगवान श्रीकृष्णाला एक नव्हे तर दोन आईचे प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. यावरून असे स्पष्ट होते कि देवसुद्धा आईची पूजा करतो.

जीवनात आईचे महत्त्व

maa प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईला खूप महत्त्व आहे. कारण तिच्याशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. आई आपल्याला या जगात आणते आणि अनेक दुःख सहन करते.

ती प्रत्येक व्यक्तीच्या बालपणापासून त्याची काळजी घेते, संगोपन करते आणि प्रत्येक गरज पूर्ण करते. ती कधी – कधी स्वतः भूकही राहते पण आपल्याला भर्पुईं अन्न पुरवते. ती आपल्या जीवनाचा सर्वात गुरु असते.

आई आपल्या मुलाला त्याच्या पायावर चालायला शिकवते. ती आपल्यासाठीच नेहमीच आपली दुःखे विसरून आमच्या आनंदाचा किंवा सुखाचा विचार करते.

आईसाठी आपले कर्तव्य

Dadi Maa आई ही आपल्यासाठी संपूर्ण जीवनाचे बलिदान करते. त्या बदल्यात आपण तिला दोन वेळेची भाकर सुद्धा देऊ शकत नाही.

आई आपल्यासाठी अनेक वेदना सहन करून आपल्याला जीवन देते. तसेच ती आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते. म्हणून आपण मोठे झाल्यावर आपल्या आईसाठी काही कर्तव्ये ही पार पाडली पाहिजेत. तिची प्रत्येक गरज पूर्ण केली पाहिजे.

वाचे येथै : माझी आजी मराठी निबंध – वाचा येथे My Grandmother Essay in Marathi

आईची वृद्ध काळात सेवा केली पाहिजे आणि तिला नेहमी आनंदित ठेवले पाहिजे. आईच्या आशिर्वादाशिवाय दुसरी कोणतीच संपत्ती नाही. म्हणून आपण नेहमीच तिचे आभार मानले पाहिजेत.

निष्कर्ष:

आई ही एक व्यक्तीच नसून ती आपल्या घराचा सर्वात महत्वाचा आधार स्तंभ असते. म्हणून म्हटले आहे कि ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ हे खऱ्या अर्थाने उमगले आहे.

आई म्हणजे एक मौल्यवान पैसा आहे. कारण जर का तो एकदा हरवला तर तो जीवनात कधीच पुन्हा सापडत नाही.

म्हणून आईसारखे पवित्र, धैर्यवान, परोपकारी आणि निर्भय या जगात कुणी असू शकत नाही. या अनमोल जीवनाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. म्हणून शक्य होईल तेवढी आईची सेवा केली पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *