मोबाइल फोन मराठी निबंध – वाचा येथे Essay on Mobile Phone in Marathi

प्रस्तावना:

आजचे युग हे विज्ञानाचे युग म्हटले जाते. या विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे मानवाचे जीवन अगदी सोपे बनले आहे.

त्या सर्व शोधांपैकी मोबाइल फोन हा एक विज्ञानाचा एक शोध आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचा नकाशा बदलला आहे. त्याच बरोबर लोकांना समजण्याचा आणि मानवाचा विचार करण्याचा आहे. आज मानवाची सर्व कामे ही मोबाइल फोन द्वारे होऊ लागली आहेत.

आज जगातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाइल फोन आहे आणि सध्या मोबाइल फोन ला स्मार्ट फोनचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळे याला ‘छोटा संगणक’ देखील म्हटला जातो.

मोबाईल फोनचा शोध

आपल्या देशामध्ये मोबाइल फोन येण्याआधी रेडिओचा शोध लावला होता. तसेच या आधी दूरध्वनीचा शोध लावला होता.

सर्वात प्रथम मोबाईल फोन चा शोध हा सन १९७३ मध्ये मोटोरोला नावाच्या कंपनीने लावला होता. जो जॉन एफ मिशेल आणि मार्टिन कूपर यांनी तयार केला होता.

मोबाइल फोन चे लाभ

आज मोबाइल फोनमुळे अनेक फायदे होत आहेत. त्यातील काही फायदे हे पुढीलप्रमाणे:

बोलण्यासाठी फायदेशीर

आज कोणतीही व्यक्ती मोबाईल फोन द्वारा जगातील कोणत्याही व्यक्तीशी बोलू शकते. मोबाईल फोन हा मानव आपल्या सोबत कुठेही घेऊन जाऊ शकतो. कारण याचे वजन कमी असते आणि कमी आकारामुळे हा पॅन्टच्या किंवा शर्टाच्या खिशात ठेऊ शकतो.

मनोरंजनाचे साधन

आजच्या युगामध्ये मोबाईल फोन हा बोलण्या व्यतिरिक्त एक मनोरंजनाचे साधन देखील बनले आहे. कारण आपण मोबाईल फोन द्वारा गाणी ऐकू शकतो, फिल्म बघू शकतो, गेम खेळू शकतो तसेच जगातील वतमानपत्र देखील वाचू शकतो.

इंटरनेट चालविण्याचे साधन

मोबाईल फोनच्या साहाय्याने आपण कधीही आणि सहजपणे कुठेही इंटरनेट चालवू शकतो. याच्या मदतीने आपल्याला जगभरातील कोणत्याही ठिकाणची माहिती मिळू शकते आणि पाहू देखील शकतो.

व्यवसाय क्षेत्रात मदत

आज बहुतेक व्यवसाय हा मोबाईल फोनच्या साहाय्याने चालत आहे. त्यामुळे काही मिनिटात एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याशी कोणताही व्यवहार करू शकतो. तसेच आपला व्यवसाय हा दुप्पट पटीने देखील वाढू शकतो.

छायाचित्रण करण्यासाठी उपयुक्त

प्राचीन काळी मानव व्हिडीओ किंवा फोटो काढायचे असेल तर फोटोग्राफरला बोलावयाचे. त्यामुळे खूप पैसे हा खर्च करावा लागत असे.

परंतु आज मोबाईल फोनच्या मदतीने आपण फोटो काढू शकतो तसेच व्हिडीओ देखील बनवू शकतो. यासाठी आपल्याला आता कोणत्याही छायाचित्रकारांची गरज भासत नाही.

बँक सुविधा

आज आपल्याला बँकेच्या समोर रांगेत उभ राहावं लागत नाही. तसेच आपल्याला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज लागत नाही.

कारण आज मानव मोबाईल फोन च्या साहाय्याने बँकेचा कोणताही व्यवहार करू शकतो. त्याच प्रमाणे कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण मोबाईल फोनच्या मदतीने ऑनलाईन मागवू शकतो.

मोबाईल फोनचे दुष्परिणाम

बहुतेक लोक हे मोबाईल फोनचा अतिवपर करतात. म्हणून त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. काही लोक हे कार्यालयात काम करत असताना अडचणीत असतात. तसेच बहुतेक लोक हे वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलत असतात.

त्याच बरोबर मोबाईल फोनचा योग्य प्रकारे वापर न केल्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील मानवाला निर्माण होतात.

जे लोक जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करतात त्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो. मोबाईल फोनचा सर्वात हा मुलांवर सुद्धा होतो. कारण मुले दिवसभर मोबाईल फोन घेऊन गेम खेळत असतात.

निष्कर्ष:

मोबाईल फोनचा जर योग्य वापर केला तर ते वरदानापेक्षा कमी नाही. परंतु त्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर आपल्यासाठी रोगांचे घर आहे.

या मोबाईलचा फोनचा योग्य वापर करून यातून काहीतरी शिकले पाहिजे. परंतु मोबाईल फोनला आपले आयुष्य नाही बनवले पाहिजे.म्हणून आपण सर्वांनी मोबाईल फोनचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे.

Updated: December 13, 2019 — 12:27 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *