भारत देश की राष्ट्रीयत्वता

माझा देश मराठी निबंध – येथे वाचा Essay on Maza Desh in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

माझ्या देशाचे नाव भारत आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे. तसेच माझा भारत देश हा जगातील प्राचीन आणि महान देशांपैकी एक आहे.

भौगोलिक दृष्ट्या माझा भारत देश आशिया खंडाच्या दक्षिणेस आहे. माझा भारत देश अधिक जनसंख्या असलेला देश आहे.

त्याच बरोबर माझा देश हा विविधतावाला आणि संस्कृतीवाला देश आहे. कारण या देशाची संस्कृती अन्य देशांपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणून मजाही भारत देश विश्व प्रसिद्ध आहे.

विविध धर्माचे लोक

अलग अलग धर्म के लोगमाझा भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. माझ्या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध पारसी इ.

प्रत्येक धर्माची संस्कृती आणि उत्सव हे वेगवेगेळे आहेत. परंतु सर्व धर्माचे लोक भारत देशातील प्रत्येक उत्सव हा एकसाथ आणि आनंदाने मिळून साजरे करतात.

विविध नावे

माझ्या भारत देशाला विविध नावानी ओळखले जाते. जसे कि प्राचीन काळी भारत देशाला आर्यव्रत आणि सुवर्ण पक्षी म्हणून ओळखले जात असे. तसेच माझ्या भारत देशाला इंडिया, हिंदुस्थान आणि भारत या नावानी पुकारले जाते.

कृषिप्रधान देश

किसानों के लिए योजनामाझा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हा आहे. माझ्या भारत देशातील बहुतांश लोक हे खेड्यात राहतात. माझ्या भारताची भौगोलिक परिस्थिती ही भिन्न आहे.

भारताचा इतिहास

भारत देश के नाममाझा भारत देशाचा इतिहास हा संघर्षवादी आहे. माझ्या भारत देशावर ३०० वर्ष विदेशी आक्रमण झाले. त्यामुळे या देशाला गुलामगिरीचे जीवन जगावे लागले.

माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आणि नेत्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देशाला स्वातंत्र्य केले. भारत देशासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना फाशीची शिक्षा झाली.

या सर्व नेत्यांच्या बलिदानामुळे माझा भारत देश १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य झाला आणि २६ जानेवारी, १९५० साली माझा भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला.

महान पुरुषांची भूमी

महान पुरुषमाझी भारत भूमी ही महान पुरुषांची, संतांची आणि ऋषी – मुनींची भूमी आहे. या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांचा आणि स्त्रियांचा जन्म झाला आहे.

जसे कि पार्वती, कृष्ण, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, रवींद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बोस, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, संत कबीर, संत तुलसीदास इ साहित्य, कला आणि विज्ञान या क्षेत्रात मोठे लोक जन्माला आले.

समुद्र आणि नद्या

समुद्री तटमाझा भारत देश हा तिन्ही बाजूंनी महासागरांनी वेढलेला देश आहे. माझ्या भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. तसेच माझ्या भारत देशाला लांबलचक समुद्र किनारा लाभला आहे. माझ्या भारत देशातून काही पवित्र नद्या वाहतात.

जसे कि गंगा, यमुना, नर्मदा, ब्रह्मपुत्रा, कावेरी आणि बंगालचा उपसागर व अरबी समुद्र अशा पवित्र नद्या आणि समुद्र वाहतात. या सर्वांमुळे माझा भारत देश संपन्न झाला आहे.

भारताची संस्कृती

भारतीय संस्कृतिमाझ्या भारत देशाची संस्कृती ही सगळ्यात वेगळी आहे. म्हणून माझ्या भारत देशाला संस्कृती आणि विविधतावाला देश असे म्हटले जाते. परदेशातील लोक भारतीय संस्कृतीचा खूप आदर करतात.

तसेच ते पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी परदेशातून भारतात येतात. माझ्या भारत देशामध्ये देवी – दैवतांचीच पूजा केली जात नाही तर वृक्षांची, प्राण्यांची आणि नद्यांची सुद्धा पूजा केली जाते.

निष्कर्ष:

माझा भारत देश हा विविधतेने भरलेला देश आहे. माझा भारत देश आज सर्व संकटांवर मात करून प्रगतीच्या दिशेने जात आहे. म्हणून माझा भारत देश मला माझ्या जिवापेक्षा अत्यंत प्रिय आहे आणि मला खूप – खूप आवडतो. मला विश्वास आहे की, माझा भारत देश एक ना एक दिवस परिपूर्ण विकसनशील देश बनेल.

Leave a Comment