प्रस्तावना:
आमची भारत भूमी ही थोर नेत्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भारतभूमीवर अनेक महान नेत्यांचा जन्म झाला आहे. या सर्व नेत्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आणि या भारत देशाला आजादी मिळवून दिली आहे.
तर काहींनी समाज कार्य केले. जसे कि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग इ. अनेक महान नेते आहेत. या सर्वांमधील महत्तम गांधी हे माझे आवडते नेता आहेत.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. तसेच त्यांना ‘भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार’ असे म्हटले जाते.
महात्मा गांधी यांचा जन्म
त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते. त्यांच्या वडिल हे राजकोटच्या दिवाण होते. आमच्या भारत देशामध्ये महात्मा गांधी यांना ‘बापू’ व ‘राष्ट्रपिता’ या नावाने ओळखले जात असे.
शिक्षण
सन १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी आपली वकिलीला सुरुवात केली. परंतु त्यांच्या जीवन एक दिवस असे वळण आले कि, त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले आणि तेथे जाऊन वकिली करू लागले.
परंतु तेथे जाऊन त्यांनी बघितलं तर ब्रिटिश लोक भारतीय लोकांवर भरपूर अत्याचार आणि अन्याय करत होते. तेव्हा त्यांनी भारतीयांची सहायता केली.
महात्मा हि संज्ञा
महात्मा गांधीजींना महात्मा हि संज्ञा दिली कारण त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात महान कार्य केले. ते एक स्वतंत्रता सेनानी आणि एक अहिंसक कार्यकर्ता होते. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश शासनापासून भारतीय स्वातंत्र्यासाठी नेत्तृत्व केले आणि अहिंसेचे पालन केले.
चम्पारण्य आंदोलन
जेव्हा महात्मा गांधी सन १९१५ मध्ये भारतात परतले तेव्हा संपूर्ण देश अत्याचारी ब्रिटिशांच्या ताब्यात होता. ब्रिटिश लोकांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उपजाऊ जमिनीवर नीळ आणि इतर पिके उगवण्यास भाग पाडले. त्यानंतर हि पिके स्वस्त दरात विकली जाऊ लागली.
खराब हवामानाच्या परिस्थितीमुळे आणि अधिक करांमुळे शेतकऱ्यांना गरिबीचा सामना करावा लागला. हे एकटाच महात्मा गांधीजींनी सन १९४७ मध्ये शेतकऱ्याच्या हक्कांसाठी आंदोलन केले. तसेच ब्रिटिश जमीनदारांच्या विरोधात हडताळ केली आणि त्यांना झुकण्यास भाग पाडले.
भारत छोडो आंदोलन
गांधीजींनी भारतीय काँग्रेस समितीकडे आग्रह केल्यामुळे भारतीयांकडून भारत देश सोडण्याची विनंती केली त्यांनी ‘करो या मरो’ असा नारा दिला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्याच्या आगाखान पॅलेस येथे ठेण्यात आले.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १५ ऑगस्ट, १९४७ साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यांच्याच एका हिंदू कार्यकर्त्याने ३० जानेवारी, १९४८ साली त्यांना गोळी मारून हत्या केली.
निष्कर्ष:
महात्मा गांधीजींनी आपले संपूर्ण जीवन या मातृभूमीसाठी बलिदान केले. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षानंतर लोकांच्या मनात ‘बापू’ आणि ‘राष्ट्रपिता’ म्हणूनच जिवंत आहेत.
म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत असे म्हटल कि, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता.