प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे मिळतात. त्यापैकी आंबा हे एक विषुवृत्तीय प्रदेशात आढळणार झाड आणि फळ आहे.
हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाड आहे. आंबा या फळाला फळांचा राजा असे म्हटले जाते. तसेच अवीट गोडीमुळे या फळाला कोंकणचा राजा असेही म्हणतात. आंबा या झाडावर वर्षभर पाने टिकून राहतात.
आंब्याचे झाड हे भरपूर मोठे असते. या झाडाची विशेषता म्हणजे वारा आंबा या झाडाची पाने कठीण खंडित करू शकत नाही.
आंब्याच्या झाडाचे वर्णन
या झाडाच्या कोवळ्या पानांचा रंग हा काहीसा केशरी असतो. जसजशी ही पाने मोठी होत जातात तसतसा या पानांचा रंग गडद हिरवा होतो.
आंब्याचा मोहर
आंब्याचा उगम
असे मानले जाते कि, आंब्याच्या झाडाचा उगम हा दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणात जैव विविधता पाहता इथेच झाला असे मानण्यात आले.
कारण हे झाड उष्णदेशीय देशांमध्ये आढळते. एप्रिल ते मे या फळाचा हंगाम आहे. या महिन्यामध्ये आंब्याच्या झाडाला भरपूर फळे लागतात.
हिंदू धर्मात महत्त्व
भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. कारण हिंदू धर्मा मध्ये आंब्याच्या झाडाची पाने पूजेमध्ये आणि अन्य हिंदू कार्यक्रमांमध्ये वापरली जातात.
हिंदू धर्मात सणाच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण करून दरवाजावर बांधले जाते. तसेच कलश पूजन हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवली जातात.
आंब्याची वाढी व माच
कच्चा आंबा पिकवण्यासाठी आंब्याचा माच किंवा आंब्याची आढी लावली जाते. एखाद्या खोली वाळलेले तणस किंवा भाताचे वाळलेले गवत पसरून त्यावर कैऱ्या ठेवल्या जातात.
कैऱ्या या गवताने झाकल्या गेल्यामुळे त्यांना उष्णता मिळते आणि त्या उष्णतेने आंबा पिकतो. परंतु काही लोक आंबा हे फळ लवकर पिकण्यासाठी त्यावर रसायने टाकून पिकवला जातो. त्याने ३-४ दिवसातच आंबा पिकू लागतो.
आंब्याचा उपयोग
कच्च्या आंब्यांचा उपयोग हा लोणचे टायर करण्यासाठी केला जातो. लोणचे हे चवीला खूप चविष्ट लागते. तसेच पिकलेल्या आंब्याचा आमरस बनवला जातो आणि त्याच्या फोडी करून खाल्ला जातो.
परंतु कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात, तिला साटे असे म्हटले जाते. तसेच कैरीच्या फोडी करून उन्हात वाळवून त्याचा उपयोग आमटी मध्ये करतात. कच्च्या कैऱ्यांना किसून त्याचा आमचूर तयार केला जातो.
हा आमचूर मसाल्यासारखा वर्षभर वापरला जातो. तसेच कैरची चटणी सुद्धा बनवली जाते. त्याच बरोबर राजापुरी कैऱ्यापासून मुरांबा आणि साखरांबा बनवला जातो.
आंब्याच्या जाती
भारत देशामध्ये आंबा या फळाच्या अनेक जाती पाहायला मिळतात. जसे कि, हापूस आंबा हा महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आणि देवगड तालुक्यात होणारा आंबा सर्वश्रेष्ठ समजला जातो. तसेच पायरी, लंगडा, सफेदा, बंगलोरा, रायवळ, राजापुरी, इ अनेक आंब्याच्या जाती आहेत.
राष्ट्रीय फळ आणि झाड
निष्कर्ष:
आंबा हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय फळ आहे. लहान मुले आणि मोठी माणसे आंबा हे फळ आनंदाने खातात. परंतु हे फळ खाण्यात एप्रिल ते मी महिन्यात खूप मजा येते.
For any other query regarding the Essay on Mango Tree in the Marathi Language, you can ask us by leaving your comment below.