प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे आढळून येतात. जसे कि सफरचंद, केळे, द्राक्षे, संत्रा, मोसंबी इ. या सर्व फळांमध्ये आंबा हे एक विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाड आणि फळ आहे.
आंबा हे फळ आपल्या गोडीमुळे सर्वात प्रसिद्ध आहे. म्हणून याला कोकणचा राजा आणि सर्व फळांचा राजा असे म्हटले जाते.
आंब्याचा हंगाम
आंबा या फळाचा हंगाम हा एप्रिल – जून महिन्यात असतो. अस असाल तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही.
परंतु दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणात जैव विविधता ही दिसून येते त्यामुळे इथेच उगम झाला असे मानण्यात आले आहे.
कच्चा आंबा
कच्च्या आंब्याला कैरी असे म्हटले जाते. कैरी ही चवीला खूप आंबट असते. पण तिओ जर आंबट नसेल तर तिला खोबरी कैरी असे म्हटले जाते.
उपयोग
कच्च्या आंब्यापासून लोणचे तयार केले जाते. ते चवीला खूप चविष्ट असते.
तसेच पिकलेल्या आंब्याचा आमरस बनवला जातो आणि फोडी करून काही लोक खातात.
कारवारी लोक पिक्लेलेया आंब्याची भाजी करतात. त्याला ‘साटे’ असे म्हटले जाते.
काही लोक हे कच्च्या आंब्याच्या फोडी करून त्या सुकवतात आणि आमटी करताना त्या फोडींचा उपयोग करतात.
राजापुरी आंब्यांपासून मुरंबा आणि साखरांबा तयार केला जातो.
आंब्याच्या झाडाची रचना
आंब्याचे झाड हे खूप मोठे असते. साधारणपणे ते ३० ते ४० मीटर उंच असते. आंब्याच्या झाडाचा घेर हा १० मीटर एवढा असतो.
आंब्याची पणे ही सदाबहार असतात त्यामुळे एका डहाळीला एकाआड एक पणे येतात. आंब्याची पाने ही लांबट असतात.
तसेच ती कोवळी असताना त्या पानांचा रंग केशरी – गुलाबी असतो व तो त्यानंतर गडद लाल होतो. आंब्याची पणे जसजशी मोठी होतात तसतसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.
आंब्याचे प्रकार आणि आकार
आमच्या भारत देशामध्ये आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर आणि रायवळ इ जाती आहेत. तसेच उत्तर प्रदेशात दशेरी, नीलम या वेगवेगळ्या जातीनुसार त्यांचा आकार व रंग, चव ही भिन्न – भिन्न असते.
आंब्याचा मोहर
आंब्याच्या झाडाला जी छोटी – छोटी फुले येतात त्यांना ‘मोहर’ असे म्हटले जाते. त्या मोहराला एक मंद सुवास येतो. तसेच आंबा या फळात बाहेरील भागात गार असून आतमध्ये कोय असते.
आंब्याची आढी
आंबा हे फळ पिकविण्यासाठी काही लोक ‘आंब्याची आढी’ किंवा ‘आंब्याचा माच’ लावतात. यासाठी एखाद्या खोली वाळलेले गावात पसरून त्यावर झाडावर झालेल्या सुरुवातीच्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गावात पसरतात.
अशाप्रकारे १० ते १५ दिवसात आंबा झाक्ल्यामुळे त्याला गवतापासून उष्णता मिळते आणि आंबा पिकतो. तसेच काही लोक आंबा लवकर पिकण्यासाठी झाडावर रासायनिक फवारणी करतात. त्यामुळे आंबा ३ ते ४ दिवसातच पिकू लागतो.
धार्मिक कार्यामध्ये उपयोग
भारतीय संस्कृतीमध्ये आणि दक्षिण आशियामध्ये आंब्याला विशेष महत्त्व दिले आहे. आंब्याची पाने व डहाळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येतात.
जसे कि कोणत्याही शुभ प्रसंगी, मंगल कार्यात, आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.
तसेच कलश पूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशामध्ये नेहमी आंब्याची पाने आणि डहाळ्या ठेवल्या जातात.
राष्ट्रीय फळ
आंबा हे फळ भारत आणि पाकिस्तान यांचे ‘राष्ट्रीय फळ’ आहे. तसेच आंब्याचे झाड हे बांगलादेशचे ‘राष्ट्रीय झाड’ आहे. त्याच बरोबर फिलिपाईन्सचे ‘राष्ट्रीय चिन्ह’ आहे.
निष्कर्ष:
आंबा हे सर्वात प्रसिद्ध फळ आहे. लहान – थोर माणसे आंबा हे फळ आनंदाने खातात. परंतु हे फळ खाण्यात एप्रिल महिन्यात खूप मजा येते. तसेच आंब्यामध्ये काही औषधी गुण सुद्धा असतात. आपल्या आरोग्यास फायदेशीर असतो.