प्रस्तावना:
आंबा हा आपला फळांचा राजा. त्याला खूप महत्व आहे आणि तो सर्वांचा प्रिय असा आहे. आंबे हे फक्त उन्हाळ्यात म्हणजे मी महिन्यात खायला मिळतात. पण आता हा १२ महिने आपल्याला उपलब्ध होतो. असे म्हणायला हरकत नाही.
मी फळांचा राजा
मी फळांचा राजा आंबा. आंबाच्या खूप जाती आहेत. हापूस, पायरी, लंगडा असे त्याचे आणि खूप हजारो जाती आहेत. हा खूप गोड असा खायला लागतो. हा औषधीचे पण काम करतो. आणि याचा उपयोग लोणची बनविण्यासाठी पण होतो.
का म्हणतात फळांचा राजा ?
आंबा हे फळ फक्त मी महिन्यात उन्ह्याळ्यात खायला मिळतो. खूप गोड आंबट अशी याची चव आहे. लहानमुलांपासून ते वयस्कर व्यक्तींना सुद्धा हा खूप आवडतो. आंबा हा जास्त महाराष्ट्रात पिकवला जातो. रत्नागिरी, कोकण, सातारा, अश्या ठिकाणी आंब्याचे उत्पादन जास्त आहे.
हा एक गाभा भरलेले फळ आहे. हा पिवळा, नारंगी, लाल रंगात आपणास दिसून येतो. दिसायला जितका सुंदर खाण्यासाठी तितकाच गॉड.
आंब्याची लागवड कशी होते
आंबा हा सहसा जून नंतर लावला जातो म्हणजे जरा पाऊस पडला तरी खूप पुष्कळ असते या साठी. त्याला खास अश्या जमिनीची गरज नसते हा कुठे हि आणि कोणत्याही जमिनीवर सहजरित्या पीकवीला जाऊ शकतो.
आंब्या मध्ये कोय असते. त्यातूनच पुन्हा आंबा जन्माला येतो. या कोयी साठवून ठेवल्या जातात. आणि त्याची लागवड केली जाते. या कोयी जमिनीत रोवल्या जातात. त्यातूनच रोप जन्माला येते.
आणि मग त्याची काळजी घ्यायला सुरवात होते. आधी याला खूप काळ लागायचा पण आता नवनवीन तंत्र न्यान आले आहेत. त्यामुळे सर्व सहज झाले आहे.
कैरी कि आंबा
या कोयांना नंतर पालवी फुटू लागते, हलकी तपकिरी रंगाची नाजूक पान याला फुटतात. हे झाड हळू हळू मोठे होऊ लागते तसे एक मोठा याचा घुमट तयार होतो. पानांचा आणि याला हलकी पिवळी
फुलांची मोहरे येतात. आणि मग याला छोट्या छोट्या कैऱ्या लागतात. आपण या कैऱ्याही खातो. उन्हाळ्यात या कैऱ्यांची लोणची बनवून आपण वर्षभर साठवून ठेऊ शकतो. आणि वर्षभर या लोणच्याचा आनंद लुटू शकतो.
आणि हा आंबा नंतर पिकला जाऊन बाजारात विकला जातो. याची खूप किंमत जास्त असते. काही आंबे गोड तर काही अंबड गोड लागतात. पण तरीही आपण ते खूप आवडीने खातो.
सर्वांचा आवडता आणि गुणकारी
आंबा हा जगप्रसिद्ध आहे. तो देश देशात पोहचला आहे. यात व्हिटॅमिन ए, बी, सि आणि इ आहेत. हा उष्ण आहे म्हणून जास्त खाल्ले कि चेहऱ्यावर दाणे सुद्धा येतात. मोठं मोठ्या कंपन्यांनी सुद्धा आता आंब्याचे उत्पादन हातात घेतले आहे.
मँगो ज्युस म्हणून बॉटल मध्ये हि वर्ष वर्ष भर साठविणे सील पॅक करून बाजारात विकली जातात. म्हणून आपणास आंबा हा बारही महिने उपलब्ध होत आहे.
लहान मुले मोठी माणसे अशी पेय आवडीने पितात. आपल्या जेवणात जर आंबा नसेल तो पण त्या काळात तर जेवणाला चव येत नाही. घरात जेवणाचे ताट समोर आले कि समोर आंब्याच्या फोडी बघून मन अगदी भारावून जाते. वरण भात सोबत लोणचे असेल तर जेवणाची मज्जाच न्यारी असते.
काही आंबे चोखून खातात, फोडी करून खातात तर कोण आमरस तयार करून खातात. मुरंबा, आंब्याचे पन्हे, हे उन्हाळ्यात खूप गुणकारी असतात शरीराला. म्हणून आपल्या घरातील स्त्रिया हे सर्व घरी बनवितात.
कारण उन्हाळ्यात आपल्या शरीराला या मधील व्हिटॅमिन ची गरज असते. आंबा खाण्यासाठी जितका गोड आहे तितकाच त्या साठी शेतकरी मेहनत पण करतो.
सारांश:
आंब्यासारखे गोड बना आणि दुसऱ्याला सुद्धा आपल्या रसात मिसळवून घ्या.