makar

मकर संक्रांति मराठी निबंध – येथे वाचा Essay on Makar Sankranti in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

भारत देशाला उत्सवानाचा देश महणून ओळखले जाते. या देशामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. भारत देशात राहणारे विविध धर्माचे लोक प्रत्येक उत्सव एकसाथ साजरे करतात. भारतातील साजरे केले जाणार्या उत्सवांपैकी मकर संक्रांति हा एक महत्वाचा सण आहे.

या देशामध्ये प्रत्येक सणाचा धार्मिक महत्व आहे. तर काही सणांना शास्त्रीय दृष्टीकोनातून पहिले जाते. मकर संक्रांति हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. जो सूर्य प्रकाशात चढताना साजरा केला जातो.

मकर संक्रांति केव्हा साजरी केली जाते –

मकर संक्रांतिमकर संक्रांतीचा हा सन भारतात दरवर्षी १४ जानेवारी या १५ जानेवारीला साजरा केला जातो. दक्षिणी भारतामध्ये हा सण पोंगल या नावाने साजरा करतात.

जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात ज्या दिवशी प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रांति दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते. या दिवसापासून सूर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकताना दिसते.

मकर संक्रांतीची कथा

मकर संक्रांति मनाने का उद्देशफार काही वर्षांपूर्वी लोकांना त्रास देणारा संकासूर नावाचा राक्षस होता. त्याला मारणे कठीण होते. त्यामुळे देवीने संक्रांतिचे रूप धारण करून संकासूराला ठार मारले आणि सगळ्या जनतेला सुखी केले. म्हणून हा दिवस मकर संक्रांति या नावाने साजरा केला जातो.

मकर संक्रांतीची तयारी

मकर संक्रांति का महत्वभारत देशाची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. मकर संक्रांति दिवशी सगळ्या स्त्रिया आपल्या शेतामध्ये व मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात.

या दिवशी स्त्रिया एका सुगडात हरभरे, उस, बोरे, गव्हाची ओम्बी आणि तीळ इ. वस्तू सुगडात भरून देवाला अर्पण करतात. याशिवाय तीळ आणि गुल लाडू हे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात मकर संक्रांति हा सण तीन दिवस साजरा केला जातो.

संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी – कुंकू करतात आणि वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून शुभकामना देतात.

मकर संक्रांतीचे महत्व

मकर संक्रांतिभारत देशामध्ये मकरसंक्रांत या सणाला खूप महत्त्व आहे. उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना सूर्याच्या उत्तरायणामध्ये झालेल्या संक्रमणामुळे त्यांना अधिक प्रकाश आणि उष्णतेचा लाभ मिळतो.

मकर संक्रांति हा सण भारतच्या बहुतेक भागात मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी कंक्रांत साजरी केली जाते. स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात.

देवाला तांदूळ, तीळ अर्पण करून सौभाग्याचे वाण लुटतात. थंडीच्या काळामध्ये तिळाचे भरपूर महत्व समजले जाते. थंडीच्या दिवसात तीळ खाल्याने अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी सहायता होते.

विविध प्रांतात मकर संक्रांति सण

भारत देशाच्या विविध प्रांतात मकर संक्रांति हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये या सणाला संक्रांति या नावाने संबोधले जाते.

पंजाब आणि हरियाणामध्ये हा सण नवीन पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. तर आसाम मध्ये हा सण बिहुच्या रुपात साजरा केला जातो.

यात्रा

Makar Sankranti मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात. यामध्ये सर्वात पमुख म्हणजे कुंभमेळा. हा कुंभमेळा हर १२ वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जैन इ. जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. यादिवशी यात्रेकरू पवित्र नद्यामध्ये स्नान करतात.

या दिवशी दान केल्याने असे मानले जाते की, सूर्यदेव आनंदात होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. यादिवशी आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडताना दिसतात.

निष्कर्ष:

मकर संक्रांति हा भारतातील एक शेती संबंधित सण आहे. तसेच मकर संक्रांतीला लहान – थोरांना तिळगुळ वाटून नात्यांमधील गोडवा वाढतो. तसेच मकर संक्रांति हा सण लहान – मोठ्यांना मिळून – मिसळून राहण्याचा संदेश देतो.

Leave a Comment