दादी माँ

माझी आई वर मराठी निबंध – येथे वाचा Essay on Majhi Aai in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ हे अगदी खरे आहे. आई हा शब्द खूप सोपा आहे. परंतु या शब्दामागे अप्रतिम माया दडलेली आहे. ईश्वराने आईला यासाठी बनवलं आहे कारण ईश्वर हा प्रत्येक मुलासोबत नाही राहू शकत. म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे.

आई या शब्दात संपूर्ण जग सामावलेल आहे. आपल्याला जन्म देऊन या जगात आणणारी ही आईच असते. आपल्या जवळ खूप पैसे आहे. परंतु आपल्या डोक्यावर मायेन हाथ फिरवणारी आईच जर नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे.

जेव्हा आई मुलाला जन्म देते त्यानंतर ते मुलं जसेजसे मोठ होत जाते आणि बोलायला लागते तेव्हा तो पहिला शब्द आई हा उच्चारतो.

आई म्हणजे –

dadi maa आई म्हणजे वात्सल्याचा वाहणारा झरा असतो. आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संबंध होय. आई म्हणजे हृदयाच्या पेटीत कोरलेली दोन अक्षरे असतात.

तसेच आपल्याला लहानपणापासून ओंजारून – गोंजारून तसेच खायला – प्यायला देणारी, लाड करणारी आई ही प्रत्यक्ष एक अन्नपूर्णा देवी असते.

माझी आई

maata त्याच प्रमाणे माझी आई सुद्धा एक सामान्य आहे. माझी आई हि माझ्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. ती प्रत्येक क्षणी आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर माझी साथ देते.

माझ्या आईचे नाव उज्ज्वला राऊत आहे आणि तिचे वय ४० वर्ष आहे. लहान पणापासून मी बघितले तिला घरात काबाड कष्ट करत असते.

ती पहाटे सर्वांच्या आधी उठून सगळ्यांसाठी जेवण करून ठेवायची आणि जेव्हा मी बिछान्यातून झोपून उठायचो तेव्हा मला गरमागरम चहा आणि नाश्ता खायला मिळायचा. माझी आई घरातील सर्वांची खूप काळजी घेते.

मी माझ्या आईच्या नैतिक शिक्षणात वाढलो. माझ्या आईने मला जीवनाच्या प्रत्येक पावलावर योग्य मार्गदर्शन केले. माझी आई माझ्या प्रत्येक भावना समजते आणि संकटाच्या वेळी माझा आधार म्हणून खंबीरपणे उभी राहते. माझी आई माझ्या चांगल्या वेळी प्रेरणा देते.

कुटुंबातील वृक्ष

संयुक्त परिवारमाझी आई ही आमच्या कुटुंबातील एक वृक्ष आहे. एखादा वृक्ष जसा सगळ्याना सावली प्रदान करतो त्याच प्रमाणे माझी आईसुद्धा आम्हाला छाया प्रदान करते. माझी आई काठी परिस्थितीत सुद्धा आपला राग आणि धैर्य गमावत नाही.

 

माझे कुटुंब

संयुक्त परिवार का नुकसान आमच्या कुटुंबात ऐकून ६ सदस्य आहेत. माझे आई – वडील, आजी – आजोबा, माझी लहान बहीण आणि मी. पण माझी आई ही कुटुंबातील सर्वात एकमेव सदस्य आहे. माझी आई आमच्या सगळ्यांची काळजी घेतेच.

त्याच बरोबर ती आम्हाला मधुर अन्न बनवून खायला घालते. माझ्या आईला कुटूंबातील प्रत्येक सदस्यांची आवड व नावड माहित आहे. माझे आजोबा माझ्या आईला कुटुंबाचा व्यवस्थापक म्हणतात. आमच्या कुटुंबात जर कोणी आजारी पडले तर माझी आई त्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेते.

शिक्षकाची भूमिका

essay on teachers 1 1 माझी आई मला नैतिक मूल्य शिकवते. कधी – कधी जेव्हा मी अभ्यास करताना अडकलो की, माझी आई शिक्षकांची भूमिका निभावते.

माझी आई प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी ती माझी मदत करते. तसेच ती आम्हाला सुलभ आणि सोप्या पद्धतीने जगभरातील चांगल्या आणि ज्ञानी गोष्टी समजावून सांगते.

माझी आई माझी प्रेरणा

माझी आई ही माझ्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. माझ्या आईने माज्या आयुष्यात मला खूप प्रभावित केले आहे. प्रेमाच्या आणि काळजीच्या बाबतीत माझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

निष्कर्ष:

मी माझ्या आईचा खूप आदर करतो आणि माझी आई माझ्यासाठी पहिली शिक्षक आणि गुरु आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि मला माझी आई खूप – खूप आवडते. तसेच मी आईच्या दीर्घायुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो.

Leave a Comment