प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान पुरुषांचा आणि स्त्रियांचा देश आहे. अनेक महान पुरुषांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले तन – मन – धन आत्मसमर्पण केले.
त्यापैकी महात्मा गांधी हे एक महान स्वतंत्रता सेनानी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. भारत देशातील प्रत्येक व्यक्ती त्यांना ‘बापू’ किंवा ‘राष्ट्रपिता’ या नावाने ओळखत असे.
महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण जीवन हे भारतीय जनतेसाठी समर्पित केले. म्हणून त्यांना ‘भारतीय स्वातंत्र्य शिल्पकार’ असे म्हटले जाते.
महात्मा गांधीजींचा जन्म
आपल्या भारत देशाला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.
त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्याचे वडील हे राजकोटचे दिवाण होते.
शिक्षण
महात्मा गांधीजींनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथून पूर्ण केले. तसेच सन १८८८ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांना बॅरिस्टर ही पदवी मिळाली.
सन १८९१ मध्ये भारतात परतल्यावर वकिलीला सुरुवात केली. परंतु त्यांच्या जीवनारा असे एक वळण आले की, त्यांना दक्षिण आफ्रिकेला जावे लागले आणि तेथे जाऊन त्यांनी वकिली केली.
पण तिथे पाहिलं तर ब्रिटिश लोक भारतीयांवर खूप अत्याचार आणि अन्याय करत असत. म्हणून त्यांनी भारतीय लोकांची साथ दिली.
जातीभेद आणि वर्णभेद
महात्मा गांधीजींनी भारतीय समाजातील अस्पृश्यांची परंपरा नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. म्हणून त्यांनी अस्पृश्यांना ‘हरिजन’ हे नाव दिले. हरिजन या शब्दाचा अर्थ होतो – देवाचे लोक.
खेडा सत्याग्रह
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. असे होऊन सुद्धा ब्रिटिश सरकारने त्यांना करातून मुक्ती दिली नाही. शेतकऱ्याचे पीक वाया गेले म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्याकडून कर वसूल करणे सोडले नाही.
हे सर्व ऐकताचमहात्मा गांधी खूप दुःखी झाले. त्यांनी खेडा गावातून ब्रिटिशांविरुद्ध अहिंसात्मक आंदोलन केले. त्यामुळे ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि शेतकऱ्याचे कर माफ झाले.
आंदोलनांची सुरुवात
महात्मा गांधीजींनी अनेक आंदोलनांची सुरुवात केली. त्यांनी सन १९२० साली असहयोग आंदोलन, सन १९३० यामध्ये नागरी अवज्ञा आंदोलन आणि अखेरीस सन १९४२ साली भारत छोडो हे आंदोलन केले.
महात्मा गांधीजींच्या या सर्व चळवळी भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी प्रभावी ठरल्या. अखेरीस महात्मा गांधींच्या संघर्षामुळे भारत देशाला ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.
महात्मा गांधी एक थोर पुरुष
आजही लोकांना महात्मा गांधीजींच्या जीवनाचे उदाहरण दिले जाते. महात्मा गांधी हे जन्मापासून सत्य आणि अहिंसक नव्हते. परंतु त्यांनी स्वतःला अहिंसक बनवले होते.
मृत्यू
महात्मा गांधी ३० जानेवारी, १९४८ ला दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांसोबत फिरत असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून त्यांची हत्या केली. नथुराम गोडसे हा पुरोगामी हिंदूच होता. त्याचे संबंध हे जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. त्याला १५ नोव्हेंबर, १९४९ ला फाशीची शिक्षा देण्यात आली.
निष्कर्ष:
महात्मा गांधीजी हे के महान समाज सुधारक आणि भारतीय स्वतंत्रता सेनानी होते. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत असे म्हटले आहे की, असा कुणी माणूस या धर्तीवर निर्माण झाला होता.