प्रस्तावना:
आमच्या भारत देशावर ब्रिटीश सरकारने २०० वर्षे राज्य केले. त्यावेळी ते भारतीय लोकांना गुलामासाखे वागवत असत.
म्हणून काही महान नेत्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या घराचा आणि जीवनाचा त्याग केला. आपल्या प्राणाची आहुती दिली. अशाच महान नेत्यांपैकी आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे एक म्हणजे महात्मा गांधी.
महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते. ज्यांनी आपले संपूर्ण जीवन या देशासाठी अर्पण केले.
महात्मा गांधी यांचा जन्म
त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. महात्मा गांधीजींचे वडील हे पोरबंदर संस्थांचे दिवाण होते आणि त्यानंतर ते राजकोट संस्थानाचे दिवाण होते. महात्मा गांधीजींना भारत देशातील सर्व लोक त्यांना प्रेमाने ‘बापू’ असे म्हणत असत.
शिक्षण
महात्मा गांधीजी सन १८९१ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. पण त्यांच्या आयुष्यात एक असे वळण आले कि, त्यांना दक्षिण आफ्रिकेला जाऊन वकिली करू लागले.
तिथे जाऊन त्यांनी बघितलं तर ब्रिटीश लोक भारतीयांवर भरपूर अन्याय व अत्याचार करत असत. महात्मा गांधीजीनी भारतीयांची मदत केली आणि सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली.
आंदोलन आणि सत्याग्रह
सन १९३० पासून १९३२ पर्यंत दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. त्याच बरोबर त्यांचे सन १९४२ सालचे भारत छोडो हे आंदोलन साताऱ्यात झळाळून उठले. महात्मा गांधीजीनी ९ ऑगस्ट, १९४२ साली करो या मरो असे आव्हान दिले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि पुण्याच्या आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले.
त्यांनी अनेक वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटीश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना याह आले आणि १५ ऑगस्ट, १९४७ साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
स्वतंत्र भारताचे स्वप्न
त्यांनी अनेक लोकांना स्वावलंबी बनवले. गांधीजीनी स्वत: भारी वस्त्रांचा त्याग करून नुसते धोतर आणि अंगावर पंचा घेऊन असत. महात्मा गांधीजीनी सत्य, अहिंसा, शांती यांचा पुरस्कार केला.
गांधी जयंती
स्कूल आणि कॉलेज मध्ये विद्यार्थी गांधीजींवर भाषण करतात. तसेच महात्मा गांधी जयंती दिवशी भाषण, संभाषण विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
निष्कर्ष:
महात्मा गांधी हे एक महान स्वतंत्र सेनानी होते. त्यांनी असे दाखवून दिले आहे कि, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांची शिकवण ही सगळ्या लोकांना प्रेरणा देणारी आहे.
महात्मा गांधीजींनी देशासाठी दिलेले बलिदान कधीही विसरू शकत नाही. असे हे जगाला वंद्य असणारे आणि भारतीयांना अभिमान वाटणारे महात्मा गांधीजी एक महान पुरुष होते.