प्रस्तावना:
आमची भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांचा जन्म झाला आहे.
त्या सर्व महान पुरुषांपैकी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी हे एक आहेत. त्यांचे देशासाठी केलेले योगदान फार मोठे आहे. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा संघर्ष फार मोलाचा आहे.
महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी यांना भारत देशातील सर्व लोक प्रेमाने ‘बापू’ असे म्हणत.
जन्म
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. महात्मा गांधी यांचे वडील पोरबंदर मध्ये दिवाण होते.
शिक्षण
परंतु एक दिवस असा आला कि, त्यांना दक्षिण आफ्रिकेला जाऊन आपली वकिली सुरु करावी लागली. या योगायोगानेच त्यांना भारतीय लोकांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. कारण त्यावेळी भारतीयांवर भरपूर अत्याचार केले जात होते.
त्यावेळी महात्मा गांधीनी भारतीय लोकांना साथ दिली आणि त्यांनी असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर सत्याग्रहाचा उपयोग त्यांनी सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये केला.
तसेच भारतीय लोकांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक आंदोलने केली.
सत्य आणि अहिंसेचा मार्ग
महात्मा गांधी हे स्वत: याच तत्त्वानुसार जगले. त्यांनी स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अस त्याचं साध राहणीमान होत.
सत्याग्रह आणि आंदोलने
सन १९२० ते सन १९२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन केले. महात्मा गांधी यांनी सन १९३० साली मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग ही चळवळ सुरु केली.
त्यांनी सन १९४२ साली ब्रिटीश सरकार विरुद्ध भारत छोडो हे आंदोलन सुरु केले. महात्मा गांधी यांना बहुतेक वेळा तुरुंगात ठेवण्यात आले.
गांधी जयंती
आमच्या भारत देशामध्ये दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती साजरी केली जाते. या दिवशी स्कूल, कॉलेज तसेच महाविद्यालांमध्ये गांधी जयंती साजरी करतात. गांधीजीच्या फोटोला हार घालून त्याची पूजा केली जाते.
तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे कि निबंध व भाषण इ. संपूर्ण जगात गांधी जयंती ही ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा’ दिवस म्हणून साजरी केली जाते.
मृत्यू
महात्मा गांधी ३० जानेवारी, १९४८ ला दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून त्यांची हत्या केली. नथुराम गोडसे हा पुरोगामी हिंदू होता आणि त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. १५ नोव्हेंबर, १९४९ ला त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.
निष्कर्ष:
महात्मा गांधी हे के असे महान पुरुष होते ज्यांनी आपल्या भारत देशासाठी संपूर्ण जीवनभर संगर्ष करून आणि प्राणांचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य दिले. भारत मातेचा हा सुपुत्र हरपून गेला. अशा या महान पुरुषा माझा शतश: प्रणाम.