कमळ फुल मराठी निबंध – वाचा येथै Essay on Lotus Flower in Marathi

प्रस्तावना:

आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारची फुले ही आढळून येतात. जसे की गुलाब, मोगरा, जाई – जुई, सोनचाफा, रातराणी इत्यादी. प्रत्येक फुलाचे विशेष महत्त्व असते.

फुलांचा उल्लेख झाला की, सगळ्यात प्रथम नाव कमळ या फुलाचे घेतले जाते. कमळ हे फुल दिसायला खूप सुंदर आणि पवित्र फुल  असते. तसेच आपल्या भारत देशाचे हे राष्ट्रीय फुल आहे.

कमळ फुल कुठे उगवते –

कमळ हे फुल मुख्यतः गोड्या किंवा उथळ पाण्यात वाढते. तसेच ते नेहमी दलदली भागात, सरोवरे, तलाव किंवा चिखलात उगवताना दिसून येते. कमळ हे फुल १ मीटर उंच पर्यंत वाढते आणि पाण्याच्या तळाशी पसरत जाते.

कमळ फुलांची रचना

कमळ हे फुल आकाराने खूप मोठे असते आणि या फुलाला अनेक पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग गुलाबी किंवा सफेद असतो.

कमळ या फुलाला लांब देठ असतो. जेव्हा कमळ हे फुल पाण्यातून बाहेर येते तेव्हा लांबलचक देठावर कमळाचे फुल हे शोभून दिसते. या फुलाला मंद सुंगंध येतो. कमळ या फुलाचा रंग जातीनुसार वेगवेगळा असतो. कमळाची पाने ही गोल असतात.

ज्यांचा व्यास सुमारे ६० ते ९० सेमी एवढा असतो. कमळाची पाने ही कधीही ओली होत नाहीत. त्यांच्यावर पडलेले पाण्याचे थेंब हे जणू काही मोत्यांसारखे वाटतात.

कमळाच्या जाती

कमळ या फुलाच्या जगभरात ऐकून १०० हुन अधिक जाती आहेत. कमळ ही वनस्पती मुळची भारत, चीन आणि जपान येथील आहे. भारत देशात जवळ – जवळ सर्व प्रदेशात कमळ हे फुल सापडते.

कमळाची फुले ही पांढरी, गुलाबी, लाल, निळी, जांभळी आणि पिवळी असतात. भारत देशामध्ये मुख्यतः कमळ हे फुल पांढऱ्या आणि गुलाबी रंगांमध्ये आढळून येते.

ज्ञानाचे प्रतीक

कमळाचे फुल हे धनाची देवी लक्ष्मी, ब्रह्मा आणि देवी सरस्वती यांचे वाहन मानले जाते. तसेच धन आणि संपत्तीचे, सौंदर्याचे सुद्धा प्रतीक मानले जाते. ब्रह्माजीं सोबत कमळ या फुलावर देवी सरस्वती विराजमान झाली आहे.

म्हणून ते ज्ञानाचे प्रतीक देखील आहे. हिंदू संस्कृतीत कमळाचे फुल हे अतिशय पवित्र मानले जाते. कमळाच्या फुलाचा उपयोग हा पूजेमध्ये केला जातो. काही लोक हे कमळ या फुलाची लागवड करून आपला उदार निर्वाह करतात.

कमळ फुलाचा उपयोग

कमळाच्या फुलाची सुंदरता आणि कोमलता खूपच भिन्न आहे म्हणून या फुलाचा उपयोग हा सजावटीमध्ये सुद्धा केला जातो.

आयुर्वेदिक औषधांमध्ये कमळ या फुलाच्या विविध भागांचा उपयोग हा केला जातो. या फुलापासून बरीच औषधे तयार केली जातात. हृदय रोगांमध्ये टॉनिक म्हणून कमळ फुलाचा उपयोग केला जातो.

कमळ हे फुल चिखलात उगवून सुद्धा आपल्या सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या या फुलाला प्राचीन संस्कृती आणि काव्यांमध्ये सर्वात उच्च स्थान आहे.

कमल फुलाच्या पाकळ्या

कमळ हे फुल फक्त तीन दिवस उमलते आणि तीन दिवसानंतर या फुलाच्या सर्व पाकळ्या या एकामागून एक पाण्यात पडतात.

केवळ फुलांचा मधला भाग हा पाण्याबाहेर राहतो. कमळाचे फुल हे पाण्यात उगवते म्हणून त्या फुलाला कोणी सहज तोडू शकत नाही. कमळाच्या फुलांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे त्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

कमळाची फुले ही दिवस उमलतात आणि रात्रीची बंद होतात. कमळाची फुले उबदार असतात. इजिप्शियन लोक कमळाचा आणि सूर्याचा संबंध आहे असे मानतात. त्यांच्या मते सूर्याची उत्पत्ती कमलापासून झाली. तसेच कमळ या फुलाला उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते.

निष्कर्ष:

कमळाचे फुल हे सौंदर्य, ज्ञान, कला, संस्कृती आणि अभिमानाचे प्रतीक मानले जाते. कमळाचे फुल आपल्याला खूप काही शिकवते.

हे फुल जरी चिखलात उगवले तरी चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही. चिखलात उगवले तरी आपले सौंदर्य टिकवून ठेवते. कमळ ही फुल आपल्या देशाचा अभिमान आणि प्रतीक आहे.

Updated: नवम्बर 20, 2019 — 6:58 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *