LOKMANY TILAK

लोकमान्य टिळक मराठी निबंध – येथे वाचा Essay on Lokmanya Tilak in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमची भारत भूमी ही महान नेत्यांची भूमी आहे. या भारत भूमीवर अनेक महान नेत्यांच्या जन्म झाला आहे आणि त्या सर्वांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले आहे.

त्या सर्व महान नेत्यांपैकी एक म्हणजे स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ब्रिटीश सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक हे एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हे तर शिक्षक, समाज सुधारक आणि वकील सुद्धा होते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची सर्वात मोठी कामगिरी आहे.

लोकमान्य टिळकांचा जन्म

Bal Gangadhar Tilak लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै, १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील ‘चिखली’ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.

त्यांच्या वडिलांचे नाव ‘गंगाधर टिळक’ आणि आईचे नाव ‘पार्वतीबाई’ असे होते. लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव ‘केशव’ होते. परंतु त्यांना बाळ या नावानेच ओळखले जात असे.

शिक्षण

bal tilak लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. म्हणून कुशाग्र बुद्धीमुळे शिक्षक त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ असे म्हणत असत. टिळकांनी आपले शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.

सन १८७२ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

त्याच कॉलेज मधून त्यांनी सन १८७७ मध्ये बी. ए ची परीक्षा पास केली. सन १८७९ मध्ये ते एल. एल. बी च्या वर्गात असताना त्यांचा परिचय आगरकरांशी झाला.

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी दोन व्यक्तींनी आपल्या मातृभूमीची पारतंत्र्यातून सुटका करण्यासाठी जण जागृती आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहून नेण्याचा प्रयत्न केला.

राजकीय जीवनाचा आरंभ

bal ganga dhar tilak e1572671165147 सन १८८० मध्ये लोकमान्य टिळक, चिपळूणकर आणि आगरकर यांनी मिळून ‘न्यू इंग्लिश स्कुल’ ची स्थापना केली. तसेच सन १८८५ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजचे काम सुरु केले.

त्याच बरोबर त्यांनी आगरकरांच्या मदतीने ‘मराठा’ आणि ‘केसरी’ हि दोन वृत्तपत्रे काढली. आगरकर हे केसरीचे संपादक झाले आणि लोकमान्य टिळक मराठा चे संपादक बनले. परंतु पुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद झालेत.

त्यामुळे आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि टिळक केसरीचे संपादक झाले. टिळकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केल्यानंतर कॉग्रेसच्या कार्यात सहभागी झाले.

लोकमान्य टिळकांनी जनतेला एकत्र आणून त्यांच्या मनामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी ‘गणेश उत्सव’ आणि ‘शिव जयंती’ हे दोन उत्सव सुरु केले.

राजद्रोहाचा खटला

lokmanya tilak महाराष्ट्रामध्ये सन १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. तेव्हा रँड प्रशासनाने लोकांची निर्जंतुकीच्या नावाखाली खूप छळवणूक केली होती. रँड व त्याच्या सहकाऱ्यांच्या हत्येनंतर कर्फ्यू लावण्यात आला होता.

टिळकांनी केसरी या वृत्तपत्रात असे उद्गारले कि, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राज्य करणे म्हणजे सूद उगवणे नव्हे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा दोन खटले भरले. तसेच त्यांना दोषी ठरवत १८ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सन १९०८ मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी त्यांनी तुरुंगवास भोगत असताना मंडाले तुरुंगात ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला.

मृत्यू

Baal Ganga Dhar Tilak टिळकांची शेवटची काही वर्षे हि आजारपणात गेली. लोकमान्य टिळक यांचे देशासाठी कार्य करता – करता १ ऑगस्ट, १९२० साली या भारताच्या महान नेत्याचे निधन झाले.

हि बातमी जेव्हा पंडित नेहरू यांना समजताच त्यांनी असे उदगार काढले कि, भारतातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला.

निष्कर्ष:

लोकमान्य टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय लोकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी अर्पण केले. म्हणून लोकमान्य टिळक यांना ‘असंतोषाचे जनक’ असे म्हटले जाते.

असे हे थोर व्यक्तिमत्व असणारे लोकमान्य टिळक महाराष्ट्राला लाभले. म्हणून सर्व लोकांना अभिमान आहे.

Leave a Comment