प्रस्तावना:
आमच्या भारत देशाला आजादी मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यापैकी बाळ गंधाधर टिळक हे स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक मानले जातात.
ते आपल्या विचारधारा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अतूट देशभक्तीची ओळखले जातात. लोकमान्य टिळक यांनी सर्व लोकांना एक्य आणि संघर्षाचा धडा शिकवला. लोकमान्य टिळक हे एक केवळ स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर शिक्षक, समाज सुधारक आणि वकील सुद्धा होते.
लोकमान्य टिळकांचा जन्म
त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्याच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे पार्वतीबाई असे होते. त्यांना सर्वजण ‘बाळ’ ना नावाने पुकारत असत.
लोकमान्य टिळकांचे शिक्षण
त्यांनी सन १८७३ मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी सन १८७७ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी. ए ची पदवी मिळवली. त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी एल. एल बी च्या शाखेची निवड केली.
राजकीय जीवन
त्याच प्रमाणे त्यांनी सर्व लोकांना एकत्र आणून त्या मनामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ‘गणेश उत्सव’ आणि ‘शिव जयंती’ हे दोन उत्सव सुरु केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिव जयंती हा उत्सव सर्वात पहिला सन १८९६ मध्ये रायगडावर झाला.
प्लेगची साथ
रँड व त्याचे सहकारी यांच्या हत्येनंतर पुण्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता आणि संशयितांची धरपकड केली जात होती. म्हणून लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे विचारले.
तसेच राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हा अग्रलेख लिहिला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याच्यावर राजद्रोहाचा दोन खटले भरले. तसेच त्यांना दोषी ठरवून १८ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
तुरुंगवास
हा तुरुंगवास भोगत असताना त्यांनी ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच ‘ओरायन’, ‘द आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ हे महत्तवपूर्ण ग्रंथ लिहिले.
लोकमान्य टिळकांचा मृत्यू
निष्कर्ष:
लोकमान्य टिळक हे एक महान देशभक्त होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यास एक नवीन चालना दिली. त्यांनी दिलेली घोषणा ही भारतीयांसाठी एक घोषणा आणि स्वाभिमानाची प्रेरणा आहे.
लोकमान्य टिळकांनी केलेल्या महान कार्यामुळे त्यांचे नाव हे भारताच्या इतिहासावर अजरामर आहे. असे हे थोर व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे.