प्रस्तावना:
भारत देश हा सर्वात प्राचीन आणि महान देश आहे. भारत हा जगातील सर्वात प्रसिद्ध देशांपैकी एक आहे. हा देश आपल्या संस्कृती आणि विविधता यामुळे ओळखला जातो.
कारण भारत देशाची संस्कृती आणि सभ्यता ही हजारो वर्षांपूर्वीची आहे. तसेच या देशाची संस्कृती अन्य देशांपेक्षा सर्वात वेगळी आहे.
संपूर्ण जगात भारत देशाचा जनसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागते आणि जगात भारताचा सातवा क्रमांक असल्याचे दिसते. भारत देश हा एक समृद्ध आणि गौवशाली देश आहे.
लोकतांत्रिक देश
भारत हा एक असा देश आहे जिथे विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे एकसाथ राहतात. जसे की हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध, फारसी इत्यादि.
म्हणून या देशाला धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो. तसेच या भारत देशात विविध प्रकारच्या भाषा या बोलल्या जातात. जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, कन्नड, तेलगू इत्यादि.
भारत देशाची नावे
प्राची काळी भारत देशाला ‘आर्यव्रत’ या नावाने ओळखले जात होते. तसेच एके काळी या भारत देशाला ‘सोन्याचा किंवा सुवर्ण पक्षी’ देखील म्हटले जात होते.
परंतु या भारत देशाला भारत हे नाव राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत याच्या नावावरून ठेवण्यात आले. तसेच या देशात राहणारे काही लोक हे या देशाला इंडिया, भारत, हिंदुस्थान इ नावानी पुकारतात.
भारताचा इतिहास
भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. तसेच २६ जानेवारी, १९५० साली भारत देशाचे संविधान लागू झाले. या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली तर काहींनी आपले संपूर्ण जीवन या देशासाठी त्याग केले. जसे की महात्मा गांधी, भगत सिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादि.
तसेच या भूमीवर अनेक महान संतांनी, ऋषी – मुनींनी, वैज्ञानिकांनी, समाज – सुधारकांनी जन्म घेऊन या भूमीला अधिक पवित्र बनविले आहे. म्हणून हा भारत भूमीला महान पुरुषांची भूमी मनाली जाते.
भारताची शान
तिरंगा हा भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. तिरंगा हा राष्ट्रध्वज असून त्यामध्ये भगवा, पंधरा आणि हिरवा हे तीन रंग आहेत. तसेच या तिरंग्याच्या मध्यभागी २४ चक्रांचे एक अशोक चक्र आहे. हे नीतीमत्तेचे प्रतीक मानले जाते.
जन – गण – मन हे भारत देशाचे राष्ट्रगान आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे. तसेच हिंदी ही भारत देशाची राष्ट्रभाषा, कमळ हे राष्ट्रीय फुल, राष्ट्रीय पक्षी – मोर, राष्ट्रीय प्राणी – वाघ आहे.
भारताचा भूगोल
या भारत देशात निसर्गाची खाण आहे. भारत देश हा तीन महासागरानी वेढलेला आहे. जसे की भारत देशाच्या पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला भारतीय महासागर आहे.
तसेच भारताच्या उत्तरेला गगनाला भिडणारा हिमालय पर्वत आहे. त्याच प्रमाणे भारत देशाला लांबलचक समुद्र किनारा लाभला आहे.
या भारत देशातून अनेक पवित्र नद्या वाहतात. जसे की यमुना, गोदावरी, नर्मदा, तापी, कृष्णा, रावी, सतलज इत्यादि. गंगा हि भारत देशाची पवित्र नदी आहे.
ऐतिहासिक स्मारके
भारत देश हा ऐतिहासिक स्मारकांचा देश आहे. या भारत देशात अनेक ऐतिहासिक स्मारके, वारसा इत्यादि दृश्ये आहेत.
जसे की आग्र्याचा ताजमहल, लाल – किल्ला, अजिंठा लेणी, कुटूंब मिनार, फतेहपूर सिकरी, स्वर्ण मंदिर, किल्ले व गड इत्यादि. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून काश्मीर हे सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे. या सर्वांमुळे दरवर्षी अन्य देशातील लोकांच्या मनाला आकर्षित करतात.
निष्कर्ष:
भारत देश हा जगातील सर्वात सुंदर देश आहे. हा देश आपल्या विविधतेमुळे आणि सौंदर्यामुळे संपूर्ण जगाच्या काना – कोपऱ्यातील लोकांना आकर्षित करतो. दरवर्षी देश – विदेशातील लोक भारतात फिरण्यासाठी येतात.