योगा – वर निबंध – वाचा येथे Essay On Importance Of Yoga In Marathi

प्रस्तावना:

योगा हा एक व्यायामाचा प्रकार आहे. ज्याने आपले स्नायू बळकट बनतात. ज्याने आपल्या शरीरातील स्नायूंना चालना मिळते. आणि ज्याने अनेक विचार दूर होऊ शकतात. असा योग अभ्यास आपण जाणून घेणार आहोत.

योगाचे विकास

योगा चे आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मोठ मोठे विद्वान सांगून गेले आहेत योगाचे महत्व. पंतप्रधान यांनी सुद्धा योगदिवस २१ जून साजरा करावा म्हणून देशाला आव्हान केले आहे.

आज काल लोक वजन कमी करण्यासाठी योग करतात. पण त्या सोबत आहार पण जरुरी असतो. हे कोणाच्या लक्षात येत नाही.

योगा चे फायदे

योग चे फायदे अनेक आहेत. त्यामुळे शरीराला एक ऊर्जा मिळते. स्नायू बळकट बनतात. मन शांत राहते. रक्त चालना सुरळीत होते. आपले शरीर व मन ताणतणावा पासून मुक्त राहते. योगा आपले दिनचर्या चे कार्य बनविले तर शरीराला चालना मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराचा लवचिक पण वाढतो

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला व आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे. पण वेळ नाही म्हणून आपण हे सर्व टाळतो.

पण स्वतःसाठी जर वेळ काढला तर ते आपल्याच फायद्याचे आहे. कारण दिवस भाराच्या ताणातून आपल्याला थोडा वेळ आराम मिळतो. आणि मानसिक क्षमता पण वाढते.

घ्यावयाची काळजी

योगा करण्याआधी आपले पोट रिकामी हवे, म्हणजे शौचास जाऊन आल्या नंतरच योग करावा. योग करताना सतत मध्ये पाणी पिऊ नये. कारण योगा करताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जा अर्थात आपले शरीर गरम झालेले असते.

आणि त्यावर जर आपण पाणी पित राहिलो तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. सर्दी, खोकला, ताप सांधे दुखी सारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

योगा नेहमी मोकल्या जागेत करावा. गादीवर किंवा बेड वर करू नये.

सपाट जमिनीवर नेहमी योगा करावा. बगीचे किंवा मोकळ्या मैदानात योगा करणे फायदेशीर असते. योगा करताना नेहमी मोकळे कपडे घालावे. त्यामुळे आसने करताना सहज होते.

योगासनाचे प्रकार

जर आपण पहिल्यांदा योगा करणार असाल तर, आधी साधी सोपी योगासने करायची. कारण आपल्या शरीराला त्याची सवय व्हायला पाहिजे. नंतर हळू हळू आसने वाढवणे योग्य असते. १)पश्चिमोत्तानासन २) पश्चिमोत्तानासन ३) वीरभद्रासन ४) मार्जारासन ५) शिशूआसन, ६) अर्ध चक्रासन हे सुरवातीला केली जाणारी असणे आहे जी सोपी पण आहेत. अनुलोम विलोम हा पण एक योगा प्रकार आहे. जो आपले हवे ते आजार दूर करू शकतो.

योग कोणी करावा

योग हा ३ वर्षा पासून ची मुले मुली करू शकतात ते ६० वर्षा पर्यंतचे वृद्ध लोक सुद्धा. पण ज्यांना हाडांचा त्रास आहे, किंवा मणक्याचे त्रास आहेत. अश्या व्यक्तींनी फक्त योग हा एका योग्य व्यक्ती सोबतच करावा. कारण चुकीची आसने आणखी आपल्याला त्रास देऊ शकतात.

योगासन करताना अनुलोम विलोम हा योग प्रकार खूप फायदे कारक आहे. त्याने आपल्या शरीरातील फुफ्फुसांना चालना मिळते. आणि फुफ्फुसे सुदृढ राहतात. मस्तक शांत राहते.

योगा कधी करू नये.

जर मासिक पाळी चालू असेल तर योगा करणे टाळावे. ताप, किंवा कोणताही आजार झाला असेल किंवा त्यातून नुकतेच बरे झाला असला तरी थोडे नियंत्रण ठेवावे.

पतंजली योग

आपणा सर्वास माहित आहे पतंजली चे निर्माते बाबा रामदेव यांची रोज सकाळी आस्था वहिनीला योगा संबधीत माहिती व प्रकार दाखविले जातात. त्यांनी योगाची अशी उदाहरणे दिली आहेत कि, ज्या स्त्रियांना मूल होत न्हवते ते सुद्धा अगदी शक्य झाले आहे. ते फक्त या योग साधनेने.

निष्कर्ष:

योगा मुळे आज पर्यंत कोणाचे नुकसान झालेले नाही. फक्त झाले ते फायदेच. म्हणून आपला नित्यक्रम बनवा. योगा शिका आणि याचा प्रचार करा.

Updated: मार्च 17, 2020 — 7:49 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *