tree1

वृक्ष वरती निबंध मराठी – येथे वाचा Essay on Importance of Trees in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

निसर्ग आणि मानव यांचा जुना संबंध आहे. या निसर्गातून मनुष्याला भरपूर गोष्टी मिळाल्या आहेत. मानवाला निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत तीन गरजा आहेत.

माणसाच्या मुलभूत गरजा पुरवणार निसर्गच देण म्हणजे वृक्ष. मनुष्याच्या जीवनात वृक्षांच खूप महत्व आहे. तसेच भारतीय संस्कृती मध्ये सुद्धा झाडांना विशेष महत्व आहे.

मानव आणि निसर्ग

मानवता का उद्देश्य

मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. निसर्ग आणि मानव हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. वृक्षांपासून मनुष्याला शुद्ध हवा मिळते.

तसेच वृक्ष मानवाला जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सीजन देतात आणि स्वतः कार्बन डाय ऑक्साइड हानिकारक वायुला अवशोषित करतात. अशा तर्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व सजीव सृष्टी आपले जीवन सुखाने जगतात.

वृक्षांचा उपयोग

Tree Plantation या धरतीवर वृक्ष निसर्गाचा एक महत्वाचा हिस्सा आहे. वृक्षापासून मनुष्याला भरपूर काही मिळते. जस कि फळ, फुल, भोजन, इंधन इ. या सर्वांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.

वृक्ष हे प्राणी आणि पक्षी निवास स्थान आहे. पक्षी वृक्षांवर आपला घरटा बनून राहतात. तसेच मानव वृक्षांपासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी आणि इंधनच्या रूपाने करतात. तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि लाकडी खेळणी तयार करण्यासाठी करतो.

वृक्ष देखील वृक्षांपासून कागद, रबर आणि उद्योगांना लागणारा कच्चा माल तयार करतात. तसेच वृक्षांचे औषधी उपयोग देखील आहेत. वृक्षांपासून विविध प्रकारची औषधे पण तयार केली जातात.

वृक्षांचे महत्व

Tulsi Plant मानवाच्या जीवनात वृक्षांचे फार महत्व आहे. वृक्ष जमिनीला सुपीक बनवण्यासाठी सहायता करतात. त्यामुळे चांगली शेती होते. तसेच उन्हाळ्यात मानव आणि प्राणी वृक्षांच्या सावलीत आपला निवारा करतात.

वृक्ष प्रदूषण आणि जमिनीची झीज टाळण्यासाठी रक्षण करतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल सुरक्षित राहतो. वृक्ष वादळी वारे आणि तुफान यांपासून आपले संरक्षण करतात.

वृक्षांची तोडणी

पेड़ों की कटाईवृक्ष मानवाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावतात. परंतु आज मानव आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी वृक्षांची तोड करायला लागला आहे.

वृक्षांची तोड केल्यामुळे प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण होऊ लागली आहे. तसेच जंगलांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मानव वृक्षांची तोड करून इमारती, घर बांधणे आणि उद्योग धंद्यांची निर्मिती करत आहे.

हिंदू धर्मात वृक्षांची पूजा

पेड़ों की पूजाभारतीय हिंदू धर्मात बऱ्याच काही वृक्षांची पूजा केली जाते. जसे तुलसी, पिंपळ, वड इ. वृक्षाना पूजिले जाते. भारतीय संस्कृतीत वृक्षप्रेम हे प्राचीन काळापासून आहे. आयुर्वेदाचे जनक महर्षी ऋषीनी चरक मध्ये वातावरणाच्या शुद्धतेसाठी वृक्षांचे महत्व सांगितले आहे.

हिंदू धर्माच्या संस्कृती मध्ये वृक्ष आपले मानाचे स्थान मिळवून आहेत. तसेच भारतीय सणांमध्ये आणि उत्सवांमध्ये वृक्षाना अधिष्ठान प्राप्त आहे.

विश्व वन दिवस 

बरगद पेड़आमच्या भारत देशामध्ये दरवर्षी २१ मार्चला विश्व वन दिवस साजरा केला जातो. या दिवशीं वैयक्तिक स्तरावर दरवर्षी भरपूर वृक्ष लावले जातात.

जर सर्वांनी मिळून एक जरी वृक्ष लावला तर एका गावात एक वन तयार होईल. त्याचबरोबर सगळ्या लोकांमध्ये वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाते. त्यांना वृक्षांचे महत्व समजून सांगितले जाते.

निष्कर्ष:

वृक्षांचा आपल्या जीवनात महत्वाची भूमिका निभावतात. म्हणूनच चला तर मग आपण सर्वांनी मिळून शपथ घेऊया कि, झाडे लावूया, झाडे जगवूया आणि आपल्या सुजलाम सुफलाम सश्य श्यामलाम मातृभूमीला तिचे जुने वैभव परत मिळवून देऊया.

For any other query regarding the Essay on Importance of Trees in the Marathi Language, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment