मानवाचे जीवन हे नदीच्या वाहत्या पाण्यासारखे आहे. ज्या प्रमाणे नदीचा प्रवाह हा उंच – सखल भूमीला ओलांडून पुढे जात असतो.
त्याच प्रकारे मानवाच्या जीवन हे अनेक प्रकारचे सुख – दुःख भोगून पुढे जात असते. जीवनाचा मुख्य उद्देश हा निरंतर पुढे जात राहणे हा आहे. तयाच सर्व सुख आणि आनंद आहे. ज्याला पुढे जाण्यास मदत करते त्याला वेळ असे म्हटले जाते. वेळ ही आपल्या जीवनातही सर्वात महत्वाची आणि मौल्यवान गोष्ट आहे.
जर एकदा का वेळ हातातून निघून गेली तर ती पुन्हा मिळू शकत नाही. वेळेचा योग्य वापर करणे ही विकास आणि यशाची गुरुकिल्ली आहे.
वेळ एक मौल्यवान वस्तू
आपण पैसा आज नाहीतर उद्या कमावू शकतो. पण एकदा जर का वेळ निघून गेली तरी कितीही पैसा दिला तरी परत येऊ शकत नाही. म्हणून मानवाने वेळेचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करणे गरजेचे आहे.
वेळेचे महत्त्व
ती सतत चालू राहते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ध्येय असते आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण वेळचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. जो माणूस आजच्या दिवसाची कामे ही उद्यावर सोडतो तो आपल्या जीवनात कधीच यशस्वी होत नाही.
त्याच बरोबर जी व्यक्ती आपल्या जीवनात वेळेचा सदुपयोग करते आणि त्याचे महत्त्व समजते ती व्यक्ती आपल्या आयुष्यात सफल होते. जर कोणतेही काम वेळेवर केले जात नाही ज्यामुळे आयुष्य अभिशाप बनून जाते.
महात्मा गांधीजींनी आपल्या वेळेचा योग्य वापर करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे ते एक महान नेता बनले. तसेच काही वैज्ञानिकांनी वेळेचा योग्य प्रकारे वापर केला म्हणून ते वैज्ञानिक बनले.
कामामध्ये सफलता
एखाद्या कामाचे यश हे कार्याच्या कार्यक्षमतेपेक्षा अधिक तत्परतेवर अवलंबून असते. वेळेचाच योग्य वापर करणे हे यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
आळशीपणा चा त्याग
वेळेचा सर्वात मोठा शत्रू आळशीपणा हा आहे. कारण हा एक किडा आहे. जर का हा किडा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लागला तर त्याचे संपूर्ण जीवन उध्वस्त करून टाकतो.
निष्कर्ष:
आपण सर्व हे देशाचे भविष्य आहोत. म्हणून आपण सर्वानी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग हा देशाच्या प्रगतीसाठी उपयोग केला पाहिजे.
प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की, गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही. म्हणून वेळेचा उपयोग करून त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. कारण वेळ ही खूप मूल्यवान गोष्ट आहे.