marathi 1

माझी आवडती मराठी भाषा निबंध- वाचा येथे Essay on Importance of Marathi Language in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना

आमच्या भारत देशात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मराठी ही भाषा २२ भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा मुख्यत: महाराष्ट्रात आणि गोवा याठिकाणी थोड्या प्रमाणात बोलली जाते. मराठी भाषा आपल्या भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे.

मराठी भाषेच्या मुख्य चार भाषा आहेत – वऱ्हाडी. कोंकणी, मालवणी, कोळी. ही भाषा भरपूर वर्षांपासून अस्तित्वात आहे. मराठी भाषा महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा आणि एकमेकांशी स्वंवाद करण्याची भाषा आहे.

मराठी भाषेची परंपरा MARATHI IMAGE

मराठी भाषेची महान परंपरा आहे. कारण ती अतिशय जुनी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये एक सुंदर कविता आहे. ती म्हणजे –

                      “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

                       जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी”.

ज्याचा अर्थ होतो कि, आपण सगळे खरच किती भाग्यवान आहोत. कारण आपली मराठी ही मातृभाषा आहे. मराठी भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. त्याच बरोबर मराठी माणसाची विशेषता अशी आहे कि, तो हिंदी व संस्कृत ही भाषा सहजपणे बोलू शकतो.

मराठी भाषेचा इतिहास Marathi history

मराठी भाषेचा इतिहास खूप पुराना आहे. मराठी ही भाषा प्रामुख्याने इंडो – आर्यन कुटुंबातील मानली जाते. प्राचीन काळी साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख ७९५ सी.ई चे मानले जातात.

तसेच रायगड मध्ये सापडलेले शिलालेख आणि दिवे येथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे १०६० व १०८६ सी.ई चे आहेत. या सगळ्याचा अर्थ आ होतो कि, मराठी ही भाषा १२ व्या शतकापासून एक लिखित भाषा म्हणून वापरली जाऊ लागली होती.

मराठा साम्राज्याची सुरुवात shivaji

आज मराठी भाषा ज्या रुपात जिवंत आहे, ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.  यांच्या काळात मराठी भाषेला खरे महत्त्व प्राप्त झाले. या भाषेचा विस्तार बोली भाषा आणि शासकीय कामकाजासाठी झाला.

जसा मराठी साम्राज्याची सुरुवात झाली तसा मराठी भाषेचा सुद्धा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्या काळात मराठी भाषा हि मोडी लिपीत लिहिली गेली.

देशाला स्वातंत्र्य maratha1

जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा मराठी भाषेला ३४४ (१) आणि ३५१ नुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला. त्यांनतर सन १९६७ मध्ये झालेल्या घटना दुरुस्ती पर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा दिला गेला.

आताच्या सुधारणेनुसार कोंकणी, मणिपुरी, सिंधी आणि नेपाली इ. अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. काही काळातच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणार आहे.

वारकरी संप्रदायात मराठी भाषा sant dyaneshwar

संत ज्ञानेश्वर हे १३ शतकातील महान वारकरी संत होते. त्यांनी भगवद्गीतेवर मराठी भाषेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. संत नामदेव यांनी मराठी भाषेत आणि हिंदी भाषेत श्लोक व अभंग लिहिले. १६ व्या शतकात संत एकनाथ यांनी एकनाथी भागवत लिहिले.

तसेच संत एकनाथांनी भारुडे लिहिली. जी आजच्या युगात सुद्धा प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराजांनी मराठी भाषेला एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली.

नियतकालिके marathi 2 e1573110398953

आज देशामध्ये बहुतेक मराठी भाषेतून नियतकालिके सुरु करण्यात आली आहेत. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय नाटक संमेलन आयोजित केले जाते.

प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच संगीत, कला संस्कृती आणि मराठी भाषेचा गौरव केला जातो.

निष्कर्ष

मराठी ही एक सुंदर आणि प्राचीन भाषा आहे. जर आम्हा सर्वाना मराठी भाषेला देशात आणि जगात मान आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला अन्य भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

कोणीही मराठी माणसाने आपल्या मातृ भाषेला विसरता कामा नये. सगळ्यांनी स्वातंत्र्य वीर यांची आठवण ठेवावी. ज्यांनी परदेशातून आपल्या माय भूमीत येण्यासाठी सागरा प्राण तळमळला असे म्हणत प्रवेश केला.

For any other query regarding the Essay on Importance of Marathi Language in Marathi, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment